Ibisobanuro bya qoran ntagatifu - Ibisobanuro bya Qur'an Ntagatifu mu rurimi rw'ikimariti - Muhammad Shafii Answaari.

numero y'urupapuro: 19:2 close

external-link copy
127 : 2

وَاِذْ یَرْفَعُ اِبْرٰهٖمُ الْقَوَاعِدَ مِنَ الْبَیْتِ وَاِسْمٰعِیْلُ ؕ— رَبَّنَا تَقَبَّلْ مِنَّا ؕ— اِنَّكَ اَنْتَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟

१२७. जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल काबागृहाचा पाया (आणि भिंती) रचत होते आणि म्हणत जात होते की हे आमच्या पालनकर्त्या! तू आमच्याकडून (ही सेवा) स्वीकार कर. निःसंशय तूच ऐकणारा आणि जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
128 : 2

رَبَّنَا وَاجْعَلْنَا مُسْلِمَیْنِ لَكَ وَمِنْ ذُرِّیَّتِنَاۤ اُمَّةً مُّسْلِمَةً لَّكَ ۪— وَاَرِنَا مَنَاسِكَنَا وَتُبْ عَلَیْنَا ۚ— اِنَّكَ اَنْتَ التَّوَّابُ الرَّحِیْمُ ۟

१२८. हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला तुझा आज्ञाधारक बनव आणि आमच्या संततीमधून एका समूहाला तुझा आज्ञाधारक बनव आणि आम्हाला तुझ्या उपासनेच्या रीती शिकव आणि आमची तौबा (क्षमा-याचना) कबूल कर. निःसंशय तू तौबा कबूल करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
129 : 2

رَبَّنَا وَابْعَثْ فِیْهِمْ رَسُوْلًا مِّنْهُمْ یَتْلُوْا عَلَیْهِمْ اٰیٰتِكَ وَیُعَلِّمُهُمُ الْكِتٰبَ وَالْحِكْمَةَ وَیُزَكِّیْهِمْ ؕ— اِنَّكَ اَنْتَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟۠

१२९. हे आमच्या पालनकर्त्या! त्यांच्यात, त्यांच्यामधूनच एक रसूल (पैगंबर) पाठव. ज्यांनी त्यांच्याजवळ तुझ्या आयतींचे पठण करावे आणि त्यांना ग्रंथ व हिकमत शिकवावे१ आणि त्यांना स्वच्छ- पवित्र करावे. निःसंशय, तू वर्चस्वशाली आणि बुद्धीकौशल्य बाळगणारा आहे. info

(१) ग्रंथाशी अभिप्रेत पवित्र कुरआन आणि हिकमतशी अभिप्रेत हदीस.

التفاسير:

external-link copy
130 : 2

وَمَنْ یَّرْغَبُ عَنْ مِّلَّةِ اِبْرٰهٖمَ اِلَّا مَنْ سَفِهَ نَفْسَهٗ ؕ— وَلَقَدِ اصْطَفَیْنٰهُ فِی الدُّنْیَا ۚ— وَاِنَّهٗ فِی الْاٰخِرَةِ لَمِنَ الصّٰلِحِیْنَ ۟

१३०. आणि इब्राहीमच्या दीन (धर्मा) पासून तोच तोंड फिरविल, जो स्वतः मूर्ख असेल. आम्ही तर त्याला या जगातही पसंत केले आणि आखिरतमध्येही तो नेक-सदाचारी लोकांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
131 : 2

اِذْ قَالَ لَهٗ رَبُّهٗۤ اَسْلِمْ ۙ— قَالَ اَسْلَمْتُ لِرَبِّ الْعٰلَمِیْنَ ۟

१३१. जेव्हा (देखील) त्यांच्या पालनकर्त्याने फर्माविले की आत्मसमर्पण करा तेव्हा ते म्हणाले की मी समस्त विश्वाच्या पालनकर्त्यासाठी आत्मसमर्पण केले. info
التفاسير:

external-link copy
132 : 2

وَوَصّٰی بِهَاۤ اِبْرٰهٖمُ بَنِیْهِ وَیَعْقُوْبُ ؕ— یٰبَنِیَّ اِنَّ اللّٰهَ اصْطَفٰی لَكُمُ الدِّیْنَ فَلَا تَمُوْتُنَّ اِلَّا وَاَنْتُمْ مُّسْلِمُوْنَ ۟ؕ

१३२. याच गोष्टीची ताकीद इब्राहीम आणि याकूब यांनी आपल्या संततीला केली की हे आमच्या पुत्रांनो! अल्लाहने तुमच्यासाठी हा दीन (धर्म) निर्धारित केला आहे. तेव्हा खबरदार! तुम्ही मुस्लिम असण्याच्या स्थितीतच मरा. info
التفاسير:

external-link copy
133 : 2

اَمْ كُنْتُمْ شُهَدَآءَ اِذْ حَضَرَ یَعْقُوْبَ الْمَوْتُ ۙ— اِذْ قَالَ لِبَنِیْهِ مَا تَعْبُدُوْنَ مِنْ بَعْدِیْ ؕ— قَالُوْا نَعْبُدُ اِلٰهَكَ وَاِلٰهَ اٰبَآىِٕكَ اِبْرٰهٖمَ وَاِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ اِلٰهًا وَّاحِدًا ۖۚ— وَّنَحْنُ لَهٗ مُسْلِمُوْنَ ۟

१३३. काय तुम्ही (हजरत) याकूबच्या मृत्युसमयी हजर होते? जेव्हा त्यांनी आपल्या संततीला म्हटले की तुम्ही माझ्या मृत्युनंतर कोणाची उपासना कराल? तेव्हा सर्वांनी उत्तर दिले की तुमच्या पालनकर्त्याची आणि तुमचे वाडवडील इब्राहीम आणि इस्माईल आणि इसहाक यांच्या उपास्या (दैवता) ची, जो एकमेव आहे आणि आम्ही त्याचेच ताबेदार बनून राहू. info
التفاسير:

external-link copy
134 : 2

تِلْكَ اُمَّةٌ قَدْ خَلَتْ ۚ— لَهَا مَا كَسَبَتْ وَلَكُمْ مَّا كَسَبْتُمْ ۚ— وَلَا تُسْـَٔلُوْنَ عَمَّا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१३४. हा जनसमूह तर होऊन गेला, त्यांनी जे केले ते त्यांच्यासाठी आहे आणि तुम्ही जे कराल ते तुमच्यासाठी आहे. त्यांच्या कर्माविषयी तुम्हाला विचारले जाणार नाही. info
التفاسير: