د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
24 : 4

وَّالْمُحْصَنٰتُ مِنَ النِّسَآءِ اِلَّا مَا مَلَكَتْ اَیْمَانُكُمْ ۚ— كِتٰبَ اللّٰهِ عَلَیْكُمْ ۚ— وَاُحِلَّ لَكُمْ مَّا وَرَآءَ ذٰلِكُمْ اَنْ تَبْتَغُوْا بِاَمْوَالِكُمْ مُّحْصِنِیْنَ غَیْرَ مُسٰفِحِیْنَ ؕ— فَمَا اسْتَمْتَعْتُمْ بِهٖ مِنْهُنَّ فَاٰتُوْهُنَّ اُجُوْرَهُنَّ فَرِیْضَةً ؕ— وَلَا جُنَاحَ عَلَیْكُمْ فِیْمَا تَرٰضَیْتُمْ بِهٖ مِنْ بَعْدِ الْفَرِیْضَةِ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلِیْمًا حَكِیْمًا ۟

२४. आणि (तुमच्यासाठी) विवाहित स्त्रिया (अवैध) केल्या गेल्या आहेत तथापि जी (दासी) तुमच्या स्वतःच्या मालकीची असेल. हे आदेश अल्लाहने तुमच्यावर अनिवार्य केले आहेत आणि याखेरीज ज्या दुसऱ्या स्त्रिया तुमच्यासाठी हलाल (वैध) केल्या गेल्या आहेत की आपले धन (महर) अदा करून त्यांच्याशी विवाह करा, व्यभिचारासाठी नाही तर पावित्र्य कायम राखण्याकरिता, यास्तव ज्यांच्यापासून तुम्ही लाभ घ्याल त्यांना त्यांचा महर अदा करा आणि तुम्ही ठरलेल्या महर नंतर एकमेकांच्या मर्जीने जे वाटेल ते ठरवाल तर यात तुमच्यावर काही गुन्हा नाही. निःसंशय अल्लाह सर्व काही जाणणारा हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 4

وَمَنْ لَّمْ یَسْتَطِعْ مِنْكُمْ طَوْلًا اَنْ یَّنْكِحَ الْمُحْصَنٰتِ الْمُؤْمِنٰتِ فَمِنْ مَّا مَلَكَتْ اَیْمَانُكُمْ مِّنْ فَتَیٰتِكُمُ الْمُؤْمِنٰتِ ؕ— وَاللّٰهُ اَعْلَمُ بِاِیْمَانِكُمْ ؕ— بَعْضُكُمْ مِّنْ بَعْضٍ ۚ— فَانْكِحُوْهُنَّ بِاِذْنِ اَهْلِهِنَّ وَاٰتُوْهُنَّ اُجُوْرَهُنَّ بِالْمَعْرُوْفِ مُحْصَنٰتٍ غَیْرَ مُسٰفِحٰتٍ وَّلَا مُتَّخِذٰتِ اَخْدَانٍ ۚ— فَاِذَاۤ اُحْصِنَّ فَاِنْ اَتَیْنَ بِفَاحِشَةٍ فَعَلَیْهِنَّ نِصْفُ مَا عَلَی الْمُحْصَنٰتِ مِنَ الْعَذَابِ ؕ— ذٰلِكَ لِمَنْ خَشِیَ الْعَنَتَ مِنْكُمْ ؕ— وَاَنْ تَصْبِرُوْا خَیْرٌ لَّكُمْ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟۠

२५. आणि तुमच्यापैकी जो स्वतंत्र अशा मुलसमान स्त्रीशी विवाह करण्याचे सामर्थ्य बाळगत नसेल तर त्याने त्या मुसलमान दासीशी (विवाह करावा) जी स्वतःच्या मालकीची असावी. अल्लाह तुमच्या कर्माशी पूर्णतः जाणता आहे. तुम्ही आपसात एकमेकांचे जोडीदार आहात, यास्तव तुम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या परवानगीने त्यांच्याशी विवाह करा आणि नियमानुसार त्यांचा महर देऊन टाका. त्या सत्शील, सदाचारी असाव्यात, उघडपणे दुराचार करणाऱ्या नसाव्यात, न लपून छपून प्रेम-संबंध राखणाऱ्या असाव्यात, मग जेव्हा त्या विवाहित झाल्यानंतर पुन्हा व्यभिचार करतील तर त्यांच्यासाठी, स्वतंत्र स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या निम्मी शिक्षा आहे. हा विवाहाचा आदेश त्याच्यासाठी आहे ज्याला आपल्या हातून कुकर्म होईल अशी भीती आहे धीर धराल तर तुमच्यासाठी उत्तम आहे. आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
26 : 4

یُرِیْدُ اللّٰهُ لِیُبَیِّنَ لَكُمْ وَیَهْدِیَكُمْ سُنَنَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِكُمْ وَیَتُوْبَ عَلَیْكُمْ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

२६. अल्लाह इच्छितो की तुमच्यासाठी स्पष्ट आदेशांचे निवेदन करावे आणि तुम्हाला त्या लोकांच्या उचित मार्गावर चालवावे, जे तुमच्या पूर्वी होऊन गेलेत आणि तुमची क्षमा-याचना (तौबा) कबूल करावी आणि अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे. info
التفاسير: