د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
95 : 4

لَا یَسْتَوِی الْقٰعِدُوْنَ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ غَیْرُ اُولِی الضَّرَرِ وَالْمُجٰهِدُوْنَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ بِاَمْوَالِهِمْ وَاَنْفُسِهِمْ ؕ— فَضَّلَ اللّٰهُ الْمُجٰهِدِیْنَ بِاَمْوَالِهِمْ وَاَنْفُسِهِمْ عَلَی الْقٰعِدِیْنَ دَرَجَةً ؕ— وَكُلًّا وَّعَدَ اللّٰهُ الْحُسْنٰی ؕ— وَفَضَّلَ اللّٰهُ الْمُجٰهِدِیْنَ عَلَی الْقٰعِدِیْنَ اَجْرًا عَظِیْمًا ۟ۙ

९५. जे ईमानधारक अकारण स्वस्थ बसून राहतील आणि जे अल्लाहच्या मार्गात आपल्या प्राणाने व धनाने जिहाद करत असतील तर दोघे समान ठरणार नाहीत. अल्लाहने त्यांना, जे आपले प्राण आणि धन लावून जिहाद करतात, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर दर्जाच्या दृष्टीने श्रेष्ठता प्रदान केली आहे. आणि तसे पाहता नेक मोबदल्याचा वायदा तर प्रत्येकाला दिला आहे. तथापि अल्लाहने जिहाद करणाऱ्यांना, स्वस्थ बसून राहणाऱ्यांवर महान मोबदल्याची श्रेष्ठता प्रदान केली आहे. info
التفاسير:

external-link copy
96 : 4

دَرَجٰتٍ مِّنْهُ وَمَغْفِرَةً وَّرَحْمَةً ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟۠

९६. आपल्यातर्फे दर्जाचीही, माफीचीही आणि दया-कृपेचीही, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
97 : 4

اِنَّ الَّذِیْنَ تَوَفّٰىهُمُ الْمَلٰٓىِٕكَةُ ظَالِمِیْۤ اَنْفُسِهِمْ قَالُوْا فِیْمَ كُنْتُمْ ؕ— قَالُوْا كُنَّا مُسْتَضْعَفِیْنَ فِی الْاَرْضِ ؕ— قَالُوْۤا اَلَمْ تَكُنْ اَرْضُ اللّٰهِ وَاسِعَةً فَتُهَاجِرُوْا فِیْهَا ؕ— فَاُولٰٓىِٕكَ مَاْوٰىهُمْ جَهَنَّمُ ؕ— وَسَآءَتْ مَصِیْرًا ۟ۙ

९७. जे लोक स्वतःवर अत्याचार करतात, जेव्हा फरिश्ते त्यांचे प्राण ताब्यात घेतात तेव्हा म्हणतात की तुम्ही कोणत्या अवस्थेत होते? ते म्हणतात, आम्ही धरतीवर कमजोर होतो. तेव्हा फरिश्ते विचारतात, काय अल्लाहची जमीन विशाल, व्यापक नव्हती की तुम्ही तिच्यात स्थलांतर केले असते. अशाच लोकांचे ठिकाण जहन्नम आहे आणि ते मोठे वाईट ठिकाण आहे. info
التفاسير:

external-link copy
98 : 4

اِلَّا الْمُسْتَضْعَفِیْنَ مِنَ الرِّجَالِ وَالنِّسَآءِ وَالْوِلْدَانِ لَا یَسْتَطِیْعُوْنَ حِیْلَةً وَّلَا یَهْتَدُوْنَ سَبِیْلًا ۟ۙ

९८. परंतु जे पुरुष, ज्या स्त्रिया आणि लहान मुले लाचार-विवश आहेत, जे कसलीही उपाययोजना करू शकत नाहीत आणि ना मार्ग जाणतात. info
التفاسير:

external-link copy
99 : 4

فَاُولٰٓىِٕكَ عَسَی اللّٰهُ اَنْ یَّعْفُوَ عَنْهُمْ ؕ— وَكَانَ اللّٰهُ عَفُوًّا غَفُوْرًا ۟

९९. तेव्हा फार शक्य आहे की अल्लाह त्यांना माफ करील आणि अल्लाह मोठा माफ करणारा, क्षमाशील आहे. info
التفاسير:

external-link copy
100 : 4

وَمَنْ یُّهَاجِرْ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ یَجِدْ فِی الْاَرْضِ مُرٰغَمًا كَثِیْرًا وَّسَعَةً ؕ— وَمَنْ یَّخْرُجْ مِنْ بَیْتِهٖ مُهَاجِرًا اِلَی اللّٰهِ وَرَسُوْلِهٖ ثُمَّ یُدْرِكْهُ الْمَوْتُ فَقَدْ وَقَعَ اَجْرُهٗ عَلَی اللّٰهِ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟۠

१००. आणि जो कोणी अल्लाहच्या मार्गात हिजरत (देश-त्याग) करील, तर त्याला धरतीवर निवासाकरिता खूप विस्तृत जागा मिळेल आणि खूप समृद्धीही. आणि जो आपल्या घरापासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराकडे हिजरत करील, मग त्याला मृत्युने येऊन गाठावे, तरीदेखील त्याचा मोबदला अल्लाहजवळ निश्चित आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दयावान आहे. info
التفاسير:

external-link copy
101 : 4

وَاِذَا ضَرَبْتُمْ فِی الْاَرْضِ فَلَیْسَ عَلَیْكُمْ جُنَاحٌ اَنْ تَقْصُرُوْا مِنَ الصَّلٰوةِ ۖۗ— اِنْ خِفْتُمْ اَنْ یَّفْتِنَكُمُ الَّذِیْنَ كَفَرُوْا ؕ— اِنَّ الْكٰفِرِیْنَ كَانُوْا لَكُمْ عَدُوًّا مُّبِیْنًا ۟

१०१. आणि जेव्हा जमिनीवर प्रवास करीत असाल तेव्हा नमाज कस्र करण्यात (चार रकअतची नमाज दोन रकअत पढण्यात) तुमच्यावर काही गुन्हा नाही, जर तुम्हाला हे भय असेल की काफिर (श्रद्धाहीन) तुम्हाला त्रास देतील. निःसंशय काफिर लोक तुमचे खुले वैरी आहेत. info
التفاسير: