د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
45 : 4

وَاللّٰهُ اَعْلَمُ بِاَعْدَآىِٕكُمْ ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ وَلِیًّا ؗۗ— وَّكَفٰی بِاللّٰهِ نَصِیْرًا ۟

४५. आणि अल्लाह तुमच्या शत्रूंना चांगल्या प्रकारे जाणणारा आहे आणि अल्लाह पुरेसा आहे दोस्त होण्यासाठी आणि अल्लाह पर्याप्त आहे मदतकर्ता होण्यासाठी. info
التفاسير:

external-link copy
46 : 4

مِنَ الَّذِیْنَ هَادُوْا یُحَرِّفُوْنَ الْكَلِمَ عَنْ مَّوَاضِعِهٖ وَیَقُوْلُوْنَ سَمِعْنَا وَعَصَیْنَا وَاسْمَعْ غَیْرَ مُسْمَعٍ وَّرَاعِنَا لَیًّا بِاَلْسِنَتِهِمْ وَطَعْنًا فِی الدِّیْنِ ؕ— وَلَوْ اَنَّهُمْ قَالُوْا سَمِعْنَا وَاَطَعْنَا وَاسْمَعْ وَانْظُرْنَا لَكَانَ خَیْرًا لَّهُمْ وَاَقْوَمَ ۙ— وَلٰكِنْ لَّعَنَهُمُ اللّٰهُ بِكُفْرِهِمْ فَلَا یُؤْمِنُوْنَ اِلَّا قَلِیْلًا ۟

४६. काही यहूदी, वाणी (कलाम) ला तिच्या योग्य स्थानापासून बदलून टाकतात. आणि म्हणतात की आम्ही ऐकले आणि अवज्ञा केली आणि ऐक त्याच्याविना की तुला ऐकले न जावे आणि आमची ताबेदारी कबूल करा (परंतु हे बोलताना) आपल्या जीभेला मोड देतात आणि दीन (धर्म) कलंकित करतात आणि जर हे लोक असे म्हणाले असते की आम्ही ऐकले आणि आम्ही मान्य केले आणि तुम्ही ऐका आणि आम्हाला पाहा तर हे त्यांच्यासाठी फार चांगले झाले असते आणि अधिक उत्तम ठरले असते. परंतु अल्लाहने त्यांच्या इन्कारामुळे त्यांचा धिःक्कार केला, तेव्हा हे फार कमी ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
47 : 4

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ اٰمِنُوْا بِمَا نَزَّلْنَا مُصَدِّقًا لِّمَا مَعَكُمْ مِّنْ قَبْلِ اَنْ نَّطْمِسَ وُجُوْهًا فَنَرُدَّهَا عَلٰۤی اَدْبَارِهَاۤ اَوْ نَلْعَنَهُمْ كَمَا لَعَنَّاۤ اَصْحٰبَ السَّبْتِ ؕ— وَكَانَ اَمْرُ اللّٰهِ مَفْعُوْلًا ۟

४७. हे ग्रंथधारकांनो! जे काही आम्ही अवतरित केले आहे, जे तुमच्याजवळ असलेल्या (ग्रंथा) ला सत्य असल्याचे सांगतो, त्यावर यापूर्वी ईमान राखा की आम्ही चेहरे बिघडवून टाकावेत आणि त्यांना फिरवून पाठीकडे करावे किंवा त्यांच्यावर धिःक्काराचा मारा करावा, जसा आम्ही शनिवारवाल्या लोकांवर केला आहे, आणि अल्लाहचा निर्णय पूर्ण झाल्याशिवाय राहात नाही. info
التفاسير:

external-link copy
48 : 4

اِنَّ اللّٰهَ لَا یَغْفِرُ اَنْ یُّشْرَكَ بِهٖ وَیَغْفِرُ مَا دُوْنَ ذٰلِكَ لِمَنْ یَّشَآءُ ۚ— وَمَنْ یُّشْرِكْ بِاللّٰهِ فَقَدِ افْتَرٰۤی اِثْمًا عَظِیْمًا ۟

४८. निःसंशय, अल्लाह आपल्यासह कोणाला सहभागी केले जाणे माफ करत नाही आणि याच्याखेरीज ज्याला इच्छिल माफ करील १ आणि जो अल्लाहसोबत दुसऱ्याला सहभागी करील तर त्याने अल्लाहवर फार मोठे असत्य रचले. २ info

(१) अर्थात असे अपराध की ज्यांची माफी मागितल्याविना ईमानधारकांनी मरण पावावे, तेव्हा अल्लाहने इच्छिल्यास एखाद्याला शिक्षा-यातना न देता माफ करील, परंतु बहुतेकांना शिक्षा दिल्यानंतर आणि बहुतेकांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिफारसीवर माफ करील, परंतु शिर्क (अल्लाहसह कोणाला सहभागी ठरविणे) कदापि माफ करणार नाही, कारण अनेकेश्ववाद्यांवर अल्लाहने जन्नतला हराम केले आहे. (२) अन्य एका ठिकाणी फर्माविले ‘1शिर्क फार मोठा अत्याचार आहे’ (लुकमान) हदीस वचनातही याला फार मोठे अपराध असल्याचे सांगितले गेले आहे.

التفاسير:

external-link copy
49 : 4

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ یُزَكُّوْنَ اَنْفُسَهُمْ ؕ— بَلِ اللّٰهُ یُزَكِّیْ مَنْ یَّشَآءُ وَلَا یُظْلَمُوْنَ فَتِیْلًا ۟

४९. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले जे स्वतला फार शुद्ध पवित्र असल्याचे सांगतात? किंबहुना अल्लाह ज्याला इच्छितो स्वच्छ, शुद्ध, पवित्र करतो, आणि कोणावर धाग्याइतकाही अत्याचार केला जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
50 : 4

اُنْظُرْ كَیْفَ یَفْتَرُوْنَ عَلَی اللّٰهِ الْكَذِبَ ؕ— وَكَفٰی بِهٖۤ اِثْمًا مُّبِیْنًا ۟۠

५०. पाहा, हे लोक अल्लाहवर कशा प्रकारे खोटा आरोप ठेवतात आणि हे फार मोठा गुन्हा साबीत होण्यास पुरेसे आहे. info
التفاسير:

external-link copy
51 : 4

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ اُوْتُوْا نَصِیْبًا مِّنَ الْكِتٰبِ یُؤْمِنُوْنَ بِالْجِبْتِ وَالطَّاغُوْتِ وَیَقُوْلُوْنَ لِلَّذِیْنَ كَفَرُوْا هٰۤؤُلَآءِ اَهْدٰی مِنَ الَّذِیْنَ اٰمَنُوْا سَبِیْلًا ۟

५१. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, ज्यांना ग्रंथाचा काही हिस्सा लाभला आहे जे मूर्त्यांवर आणि मिथ्या देवांवर ईमान (श्रद्धा) राखतात आणि इन्कारी लोकांच्या हक्कात म्हणतात की हे लोक ईमान राखणाऱ्यांपेक्षा अधिक सरळ आणि सत्य-मार्गावर आहेत. info
التفاسير: