د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
99 : 20

كَذٰلِكَ نَقُصُّ عَلَیْكَ مِنْ اَنْۢبَآءِ مَا قَدْ سَبَقَ ۚ— وَقَدْ اٰتَیْنٰكَ مِنْ لَّدُنَّا ذِكْرًا ۟ۖۚ

९९. अशा प्रकारे आम्ही तुमच्यासमोर पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे वर्णन करतो, आणि निःसंशय आम्ही तुम्हाला आपल्याकडून बोध- उपदेश प्रदान केलेला आहे. info
التفاسير:

external-link copy
100 : 20

مَنْ اَعْرَضَ عَنْهُ فَاِنَّهٗ یَحْمِلُ یَوْمَ الْقِیٰمَةِ وِزْرًا ۟ۙ

१००. यापासून जो तोंड फिरवेल तो निश्चितच कयामतच्या दिवशी आपले अवजड ओझे लादलेल्या स्थितीत असेल. info
التفاسير:

external-link copy
101 : 20

خٰلِدِیْنَ فِیْهِ ؕ— وَسَآءَ لَهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ حِمْلًا ۟ۙ

१०१. ज्यात तो नेहमीच राहील आणि अशांकरिता कयामतच्या दिवशी (मोठे) भयंकर ओझे आहे. info
التفاسير:

external-link copy
102 : 20

یَّوْمَ یُنْفَخُ فِی الصُّوْرِ وَنَحْشُرُ الْمُجْرِمِیْنَ یَوْمَىِٕذٍ زُرْقًا ۟

१०२. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल आणि अपराधी लोकांना आम्ही त्या दिवशी (भीतीमुळे) निळ्या पिवळ्या डोळ्यांसह घेरून आणू. info
التفاسير:

external-link copy
103 : 20

یَّتَخَافَتُوْنَ بَیْنَهُمْ اِنْ لَّبِثْتُمْ اِلَّا عَشْرًا ۟

१०३. ते आपसात हळू हळू बोलत असतील की आम्ही तर (जगात) केवळ दया दिवसच राहिलो. info
التفاسير:

external-link copy
104 : 20

نَحْنُ اَعْلَمُ بِمَا یَقُوْلُوْنَ اِذْ یَقُوْلُ اَمْثَلُهُمْ طَرِیْقَةً اِنْ لَّبِثْتُمْ اِلَّا یَوْمًا ۟۠

१०४. जे काही ते बोलत आहेत, त्याची हकीगत आम्ही जाणतो. त्यांच्यातला सर्वांत चांगल्या मार्गाचा इसम म्हणत असेल, तुम्ही फक्त एकच दिवस राहिलेत. info
التفاسير:

external-link copy
105 : 20

وَیَسْـَٔلُوْنَكَ عَنِ الْجِبَالِ فَقُلْ یَنْسِفُهَا رَبِّیْ نَسْفًا ۟ۙ

१०५. ते तुम्हाला पर्वतांबद्दल विचारतात, तर (तुम्ही) सांगा की पर्वतांना माझा पालनकर्ता (अल्लाह) चूरेचूरे करून उडवून देईल. info
التفاسير:

external-link copy
106 : 20

فَیَذَرُهَا قَاعًا صَفْصَفًا ۟ۙ

१०६. आणि (जमिनी) ला समतल सपाट मैदान करून टाकील. info
التفاسير:

external-link copy
107 : 20

لَّا تَرٰی فِیْهَا عِوَجًا وَّلَاۤ اَمْتًا ۟ؕ

१०७. ज्यात ना कोठे वळण दिसेल, ना उंच सखल भाग. info
التفاسير:

external-link copy
108 : 20

یَوْمَىِٕذٍ یَّتَّبِعُوْنَ الدَّاعِیَ لَا عِوَجَ لَهٗ ۚ— وَخَشَعَتِ الْاَصْوَاتُ لِلرَّحْمٰنِ فَلَا تَسْمَعُ اِلَّا هَمْسًا ۟

१०८. ज्या दिवशी लोक पुकारणाऱ्याच्या मागे चालतील, ज्यात कसलीही कमी होणार नाही आणि दयावान अल्लाहच्या समोर सर्वांचे आवाज दबलेले असतील, कुजबुजखेरीज तुम्हाला काहीच ऐकू येणार नाही. info
التفاسير:

external-link copy
109 : 20

یَوْمَىِٕذٍ لَّا تَنْفَعُ الشَّفَاعَةُ اِلَّا مَنْ اَذِنَ لَهُ الرَّحْمٰنُ وَرَضِیَ لَهٗ قَوْلًا ۟

१०९. त्या दिवशी कोणाची शिफारस काहीच कामी येणार नाही, तथापि ज्याला दयावान अल्लाह तसा आदेश देईल, आणि त्याचे म्हणणे पसंत करील. info
التفاسير:

external-link copy
110 : 20

یَعْلَمُ مَا بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَلَا یُحِیْطُوْنَ بِهٖ عِلْمًا ۟

११०. जे काही त्यांच्या पुढे आणि मागे आहे, ते (अल्लाहच) जाणतो. त्याच्या निर्मितीपैकी कोणीही त्याला आपल्या ज्ञानकक्षेत घेऊ शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
111 : 20

وَعَنَتِ الْوُجُوْهُ لِلْحَیِّ الْقَیُّوْمِ ؕ— وَقَدْ خَابَ مَنْ حَمَلَ ظُلْمًا ۟

१११. आणि सर्वांचे चेहरे त्या चिरसजीव आणि चिरस्थायी अल्लाहसमोर मोठ्या नम्रतेने झुकलेले असतील. निःसंशय, जो आपल्या पाठीवर अत्याचाराचे ओझे लावून येईल तो असफल ठरेल. info
التفاسير:

external-link copy
112 : 20

وَمَنْ یَّعْمَلْ مِنَ الصّٰلِحٰتِ وَهُوَ مُؤْمِنٌ فَلَا یَخٰفُ ظُلْمًا وَّلَا هَضْمًا ۟

११२. आणि जो कोणी सत्कर्म करील, आणि ईमानधारकही असेल तर त्याला ना जुलूम अत्याचाराचे भय राहील, ना हक्क मारला जाण्याचे. info
التفاسير:

external-link copy
113 : 20

وَكَذٰلِكَ اَنْزَلْنٰهُ قُرْاٰنًا عَرَبِیًّا وَّصَرَّفْنَا فِیْهِ مِنَ الْوَعِیْدِ لَعَلَّهُمْ یَتَّقُوْنَ اَوْ یُحْدِثُ لَهُمْ ذِكْرًا ۟

११३. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्यावर अरबी (भाषेत) कुरआन अवतरित केले आहे आणि अनेक प्रकारे त्यात शिक्षेची भीती सांगितली आहे, यासाठी की लोकांनी अल्लाहचे भय राखून दुराचारापासून अलिप्त राहणारे बनावे किंवा त्यांच्या मनात विचारचिंतन निर्माण व्हावे. info
التفاسير: