د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
52 : 20

قَالَ عِلْمُهَا عِنْدَ رَبِّیْ فِیْ كِتٰبٍ ۚ— لَا یَضِلُّ رَبِّیْ وَلَا یَنْسَی ۟ؗ

५२. उत्तर दिले, त्यांचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळ ग्रंथात आहे. माझा पालनकर्ताना चूक करतो, ना विसरतो. info
التفاسير:

external-link copy
53 : 20

الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ الْاَرْضَ مَهْدًا وَّسَلَكَ لَكُمْ فِیْهَا سُبُلًا وَّاَنْزَلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً ؕ— فَاَخْرَجْنَا بِهٖۤ اَزْوَاجًا مِّنْ نَّبَاتٍ شَتّٰی ۟

५३. त्यानेच तुमच्यासाठी जमिनीला अंथरुण (बिछाना) बनविले आहे आणि त्यात तुमच्या चालण्यासाठी रस्ते बनविले आहेत, आणि आकाशातून पर्जन्यवृष्टी देखील तोच करतो, मग त्या पावसाद्वारे अनेक प्रकारची पैदावारही आम्ही निर्माण करतो. info
التفاسير:

external-link copy
54 : 20

كُلُوْا وَارْعَوْا اَنْعَامَكُمْ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّاُولِی النُّهٰی ۟۠

५४. तुम्ही स्वतः खा आणि आपल्या जनावरांनाही चारा. निःसंशय यात बुद्धिमानांकरिता अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
55 : 20

مِنْهَا خَلَقْنٰكُمْ وَفِیْهَا نُعِیْدُكُمْ وَمِنْهَا نُخْرِجُكُمْ تَارَةً اُخْرٰی ۟

५५. त्याच धरतीमधून आम्ही तुम्हाला निर्माण केले आणि तिच्यातच पुन्हा परत पाठवू आणि तिच्यातूनच तुम्हा सर्वांना बाहेर काढून उभे करू. info
التفاسير:

external-link copy
56 : 20

وَلَقَدْ اَرَیْنٰهُ اٰیٰتِنَا كُلَّهَا فَكَذَّبَ وَاَبٰی ۟

५६. आणि आम्ही त्याला सर्व निशाण्या दाखविल्या, परंतु तरीही त्याने खोटे ठरविले आणि इन्कार केला. info
التفاسير:

external-link copy
57 : 20

قَالَ اَجِئْتَنَا لِتُخْرِجَنَا مِنْ اَرْضِنَا بِسِحْرِكَ یٰمُوْسٰی ۟

५७. तो म्हणाला, हे मूसा! काय तू आमच्याजवळ अशासाठी आला आहे की आम्हाला आपल्या जादूच्या सामर्थ्याने आमच्या देशातून बाहेर काढावे. info
التفاسير:

external-link copy
58 : 20

فَلَنَاْتِیَنَّكَ بِسِحْرٍ مِّثْلِهٖ فَاجْعَلْ بَیْنَنَا وَبَیْنَكَ مَوْعِدًا لَّا نُخْلِفُهٗ نَحْنُ وَلَاۤ اَنْتَ مَكَانًا سُوًی ۟

५८. ठीक आहे. मग आम्हीही तुमचा सामना करण्यासाठी अशीच जादू जरूर आणू. तेव्हा तुम्ही आमच्या आणि आपल्या दरम्यान वायद्याची वेळ निश्चित ठरवून घ्या की ना आम्ही त्याविरूद्ध करावे आणि ना तुम्ही. मोकळ्या मैदानात ही स्पर्धा व्हावी. info
التفاسير:

external-link copy
59 : 20

قَالَ مَوْعِدُكُمْ یَوْمُ الزِّیْنَةِ وَاَنْ یُّحْشَرَ النَّاسُ ضُحًی ۟

५९. (मूसा यांनी) उत्तर दिले, शोभा सजावट आणि समारंभाच्या दिवसाचा वायदा आहे, आणि हे की लोकांनी दिवस चढताच जमा व्हावे. info
التفاسير:

external-link copy
60 : 20

فَتَوَلّٰی فِرْعَوْنُ فَجَمَعَ كَیْدَهٗ ثُمَّ اَتٰی ۟

६०. नंतर फिरऔन परतला आणि त्याने आपले डावपेच गोळा केले मग आला. info
التفاسير:

external-link copy
61 : 20

قَالَ لَهُمْ مُّوْسٰی وَیْلَكُمْ لَا تَفْتَرُوْا عَلَی اللّٰهِ كَذِبًا فَیُسْحِتَكُمْ بِعَذَابٍ ۚ— وَقَدْ خَابَ مَنِ افْتَرٰی ۟

६१. मूसा त्याला म्हणाले की तुमचा नाश होवो, अल्लाहवर खोटे नाटे आणि लांछन लावू नका की (ज्यामुळे) त्याने तुमचा शिक्षा-यातनेद्वारे सर्वनाश करून टाकावा. लक्षात ठेवा! ज्याने असत्य रचले, तो कधीही सफल होणार नाही. info
التفاسير:

external-link copy
62 : 20

فَتَنَازَعُوْۤا اَمْرَهُمْ بَیْنَهُمْ وَاَسَرُّوا النَّجْوٰی ۟

६२. मग हे लोक आपसात सल्लामसलत करण्यात एकमेकांविरूद्ध मताचे झाले आणि लपून छपून कानगोष्टी करू लागले. info
التفاسير:

external-link copy
63 : 20

قَالُوْۤا اِنْ هٰذٰنِ لَسٰحِرٰنِ یُرِیْدٰنِ اَنْ یُّخْرِجٰكُمْ مِّنْ اَرْضِكُمْ بِسِحْرِهِمَا وَیَذْهَبَا بِطَرِیْقَتِكُمُ الْمُثْلٰی ۟

६३. म्हणाले, हे दोघे फक्त जादूगार आहेत आणि यांचा पक्का इरादा आहे की आपल्या जादूच्या शक्तीने तुम्हाला तुमच्या देशाबाहेर घालवावे आणि तुमच्या उत्तम धर्माचा सत्यानाश करून टाकावा. info
التفاسير:

external-link copy
64 : 20

فَاَجْمِعُوْا كَیْدَكُمْ ثُمَّ ائْتُوْا صَفًّا ۚ— وَقَدْ اَفْلَحَ الْیَوْمَ مَنِ اسْتَعْلٰی ۟

६४. तेव्हा तुम्ही देखील आपले कोणतेही डावपेच बाकी ठेवू नका, मग पंक्तीबद्ध होऊन रांगेत या, आज जो वर्चस्वशाली होईल तोच बाजी जिंकेल. info
التفاسير: