د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

د مخ نمبر:close

external-link copy
88 : 20

فَاَخْرَجَ لَهُمْ عِجْلًا جَسَدًا لَّهٗ خُوَارٌ فَقَالُوْا هٰذَاۤ اِلٰهُكُمْ وَاِلٰهُ مُوْسٰی ۚۙ۬— فَنَسِیَ ۟ؕ

८८. मग त्याने लोकांसाठी एक वासरू घडविले अर्थात वासराची मूर्ती ज्याचा गायीसारखा आवाज होता, मग म्हणाले की हाच तुमचाही माबूद (उपास्य) आहे आणि मूसाचा देखील, परंतु मूसाला विसर पडला. info
التفاسير:

external-link copy
89 : 20

اَفَلَا یَرَوْنَ اَلَّا یَرْجِعُ اِلَیْهِمْ قَوْلًا ۙ۬— وَّلَا یَمْلِكُ لَهُمْ ضَرًّا وَّلَا نَفْعًا ۟۠

८९. काय हे वाट चुकलेले लोक हेही पाहत नाही की ते तर त्यांच्या बोलण्याला उत्तरही देऊ शकत नाही आणि न त्यांच्या कसल्याही चांगल्या वाईटाचा अधिकार बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
90 : 20

وَلَقَدْ قَالَ لَهُمْ هٰرُوْنُ مِنْ قَبْلُ یٰقَوْمِ اِنَّمَا فُتِنْتُمْ بِهٖ ۚ— وَاِنَّ رَبَّكُمُ الرَّحْمٰنُ فَاتَّبِعُوْنِیْ وَاَطِیْعُوْۤا اَمْرِیْ ۟

९०. आणि हारूनने यापूर्वीही त्यांना सांगितले होते की हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! या वासराद्वारे तर तुमची परीक्षा घेतली गेली आहे. तुमचा सच्चा पालनहार तर दयावान अल्लाहच आहे, तेव्हा तुम्ही सर्व माझे अनुसरण करा आणि माझे म्हणणे मानत जा. info
التفاسير:

external-link copy
91 : 20

قَالُوْا لَنْ نَّبْرَحَ عَلَیْهِ عٰكِفِیْنَ حَتّٰی یَرْجِعَ اِلَیْنَا مُوْسٰی ۟

९१. (त्यांनी) उत्तर दिले मूसाचे आगमन होईपर्यंत आम्ही तर याचेच पुजारी बनून राहू. info
التفاسير:

external-link copy
92 : 20

قَالَ یٰهٰرُوْنُ مَا مَنَعَكَ اِذْ رَاَیْتَهُمْ ضَلُّوْۤا ۟ۙ

९२. (मूसा) म्हणाले, हे हारून! यांना मार्गभ्रष्ट होत असलेले पाहून (त्यांना रोखण्यात) तुम्हाला कोणत्या गोष्टीने रोखून ठेवले होते? info
التفاسير:

external-link copy
93 : 20

اَلَّا تَتَّبِعَنِ ؕ— اَفَعَصَیْتَ اَمْرِیْ ۟

९३. की ज्यामुळे तू माझ्या पाठोपाठ आला नाही, काय तू देखील माझी अवज्ञा करणारा बनलास? info
التفاسير:

external-link copy
94 : 20

قَالَ یَبْنَؤُمَّ لَا تَاْخُذْ بِلِحْیَتِیْ وَلَا بِرَاْسِیْ ۚ— اِنِّیْ خَشِیْتُ اَنْ تَقُوْلَ فَرَّقْتَ بَیْنَ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ وَلَمْ تَرْقُبْ قَوْلِیْ ۟

९४. (हारून) म्हणाले, हे माझ्या मातेच्या पुत्रा! माझी दाढी धरू नका, आणि डोक्याचे केस ओढू नका. माझ्या मनात तर केवळ हाच विचार आला आहे की कदाचित तुम्ही असे न म्हणावे की तू इस्राईलच्या संततीत फूट पाडलीस आणि माझ्या बोलण्याची (आदेशाची) वाट पाहिली नाही. info
التفاسير:

external-link copy
95 : 20

قَالَ فَمَا خَطْبُكَ یٰسَامِرِیُّ ۟

९५. (मूसा यांनी) विचारले, सामरी तुझा काय मामला आहे? info
التفاسير:

external-link copy
96 : 20

قَالَ بَصُرْتُ بِمَا لَمْ یَبْصُرُوْا بِهٖ فَقَبَضْتُ قَبْضَةً مِّنْ اَثَرِ الرَّسُوْلِ فَنَبَذْتُهَا وَكَذٰلِكَ سَوَّلَتْ لِیْ نَفْسِیْ ۟

९६. (त्याने) उत्तर दिले, मला ते दिसले, जे त्यांना दिसले नाही, तेव्हा मी अल्लाहने पाठविलेल्या पाऊलखुणांतून एक मूठ भरून घेतली. तिला त्यात टाकले. अशा प्रकारे माझ्या मनाने माझ्यासाठी ही गोष्ट रचली. info
التفاسير:

external-link copy
97 : 20

قَالَ فَاذْهَبْ فَاِنَّ لَكَ فِی الْحَیٰوةِ اَنْ تَقُوْلَ لَا مِسَاسَ ۪— وَاِنَّ لَكَ مَوْعِدًا لَّنْ تُخْلَفَهٗ ۚ— وَانْظُرْ اِلٰۤی اِلٰهِكَ الَّذِیْ ظَلْتَ عَلَیْهِ عَاكِفًا ؕ— لَنُحَرِّقَنَّهٗ ثُمَّ لَنَنْسِفَنَّهٗ فِی الْیَمِّ نَسْفًا ۟

९७. सांगितले, ठीक आहे. जा, या जगाच्या जीवनात तुझी शिक्षा हीच की तू म्हणत राहावे, मला स्पर्श करू नका आणि एक दुसरा वायदाही तुझ्याशी आहे, जो तुझ्यावरून कधीही टाळणार नाही आणि आता तू आपल्या या दैवतालाही पाहा, ज्याचा तू पुजारी बनला होता, आम्ही त्याला जाळून टाकू, मग त्याला नदीत चूरेचूर उडवून देऊ.१ info

(१) तात्पर्य मूर्तीपूजेचे चिन्ह किंवा प्रतीक नष्ट करणे, त्याचे अस्तित्व नाहीसे करणे, मग ते कसेही असो, अवमान नाही. जसे अहले बिदअत, कबरींची पूजा करणारे आणि ताजिया वगैरेचे भक्त सांगतात. किंबहुना तौहीद (एकेश्वरवादा) चा हाच उद्देश आहे जसे की या घटनेत ‘असरिर्रसुली’ला पाहिले गेले नाही, ज्याद्वारे बाह्यतः अध्यात्मिक बरकतीचे अवलोकनही केले गेले, तरीही त्याची तमा बाळगली गेली नाही, कारण ते मूर्तीपूजेचे साधन बनले होते.

التفاسير:

external-link copy
98 : 20

اِنَّمَاۤ اِلٰهُكُمُ اللّٰهُ الَّذِیْ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ؕ— وَسِعَ كُلَّ شَیْءٍ عِلْمًا ۟

९८. निःसंशय, तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाहच आहे. त्याच्याखेरीज दुसरा कोणीही उपास्य नाही. त्याचे ज्ञान समस्त वस्तूंवर प्रभावी आहे. info
التفاسير: