३२. त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलेल आणि सत्य (धर्म) त्याच्याजवळ आला असता, तो त्यास खोटे असल्याचे सांगेल? काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नम नव्हे?
३६. काय अल्लाह आपल्या दासांकरिता पर्याप्त नाही? हे लोक तुम्हाला अल्लाहखेरीज इतरांचे भय दाखवित आहेत, आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही.
३८. जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले आहे, तर ते निश्चित हेच उत्तर देतील की अल्लाहने! तुम्ही त्यांना सांगा की, बरे हे तर सांगा की ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, जर अल्लाह मला नुकसान पोहोचवू इच्छिल, तर काय हे त्याच्या नुकसानाला हटवू शकतात किंवा जर अल्लाह माझ्यावर कृपा करू इच्छित असेल तर काय हे त्याच्या कृपेला अडवू शकतात? (तुम्ही) सांगा की अल्लाह (महान) मला पुरेसा आहे. भरवसा राखणारे त्याच्यावरच भरवसा राखतात.
३९. सांगा की, हे माझ्या जनसमुदाया (उम्मत) च्या लोकांनो! तुम्ही आपल्या जागी कर्म करीत राहा, मी आपल्या जागी कर्म करीत आहे.१ लवकरच तुम्ही (परिणाम) जाणून घ्याल.
(१) अर्थात जर तुम्ही माझे एकेश्वरवादाचे आवाहन मान्य करीत नाही, ज्यासह अल्लाहने मला पाठविले आहे तर ठीक आहे, तुमची मर्जी तुम्ही आपल्या अवस्थेत राहा, जिच्यात तुम्ही आहात, मी त्या अवस्थेत राहतो, जिच्यात अल्लाहने मला ठेवले आहे.