വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
32 : 39

فَمَنْ اَظْلَمُ مِمَّنْ كَذَبَ عَلَی اللّٰهِ وَكَذَّبَ بِالصِّدْقِ اِذْ جَآءَهٗ ؕ— اَلَیْسَ فِیْ جَهَنَّمَ مَثْوًی لِّلْكٰفِرِیْنَ ۟

३२. त्याहून जास्त अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहच्या संबंधाने खोटे बोलेल आणि सत्य (धर्म) त्याच्याजवळ आला असता, तो त्यास खोटे असल्याचे सांगेल? काय अशा काफिरांचे ठिकाण जहन्नम नव्हे? info
التفاسير:

external-link copy
33 : 39

وَالَّذِیْ جَآءَ بِالصِّدْقِ وَصَدَّقَ بِهٖۤ اُولٰٓىِٕكَ هُمُ الْمُتَّقُوْنَ ۟

३३. आणि जे लोक सत्य (धर्म) घेऊन आले, आणि ज्यांनी त्यास सत्य जाणले, हेच लोक अल्लाहचे भय बाळगणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
34 : 39

لَهُمْ مَّا یَشَآءُوْنَ عِنْدَ رَبِّهِمْ ؕ— ذٰلِكَ جَزٰٓؤُا الْمُحْسِنِیْنَ ۟ۚۖ

३४. त्यांच्यासाठी, त्याच्या पालनकर्त्याजवळ ती प्रत्येक गोष्ट आहे, जी ते इच्छितील नेक सदाचारी लोकांचा हाच मोबदला आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 39

لِیُكَفِّرَ اللّٰهُ عَنْهُمْ اَسْوَاَ الَّذِیْ عَمِلُوْا وَیَجْزِیَهُمْ اَجْرَهُمْ بِاَحْسَنِ الَّذِیْ كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

३५. यासाठी की अल्लाहने त्यांच्यापासून त्यांच्या दुष्कर्मांना दूर करावे आणि जी सत्कर्मे त्यांनी केली आहेत, त्यांचा उत्तम मोबदला त्यांना प्रदान करावा. info
التفاسير:

external-link copy
36 : 39

اَلَیْسَ اللّٰهُ بِكَافٍ عَبْدَهٗ ؕ— وَیُخَوِّفُوْنَكَ بِالَّذِیْنَ مِنْ دُوْنِهٖ ؕ— وَمَنْ یُّضْلِلِ اللّٰهُ فَمَا لَهٗ مِنْ هَادٍ ۟ۚ

३६. काय अल्लाह आपल्या दासांकरिता पर्याप्त नाही? हे लोक तुम्हाला अल्लाहखेरीज इतरांचे भय दाखवित आहेत, आणि ज्याला अल्लाह मार्गभ्रष्ट करील, त्याला मार्ग दाखविणारा कोणीही नाही. info
التفاسير:

external-link copy
37 : 39

وَمَنْ یَّهْدِ اللّٰهُ فَمَا لَهٗ مِنْ مُّضِلٍّ ؕ— اَلَیْسَ اللّٰهُ بِعَزِیْزٍ ذِی انْتِقَامٍ ۟

३७. आणि ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करील, त्याला कोणी मार्गभ्रष्ट करणारा नाही. काय अल्लाह वर्चस्वशाली आणि प्रतिशोध घेणार नाही? info
التفاسير:

external-link copy
38 : 39

وَلَىِٕنْ سَاَلْتَهُمْ مَّنْ خَلَقَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ لَیَقُوْلُنَّ اللّٰهُ ؕ— قُلْ اَفَرَءَیْتُمْ مَّا تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ اِنْ اَرَادَنِیَ اللّٰهُ بِضُرٍّ هَلْ هُنَّ كٰشِفٰتُ ضُرِّهٖۤ اَوْ اَرَادَنِیْ بِرَحْمَةٍ هَلْ هُنَّ مُمْسِكٰتُ رَحْمَتِهٖ ؕ— قُلْ حَسْبِیَ اللّٰهُ ؕ— عَلَیْهِ یَتَوَكَّلُ الْمُتَوَكِّلُوْنَ ۟

३८. जर तुम्ही त्यांना विचाराल की आकाशांना व धरतीला कोणी निर्माण केले आहे, तर ते निश्चित हेच उत्तर देतील की अल्लाहने! तुम्ही त्यांना सांगा की, बरे हे तर सांगा की ज्यांना तुम्ही अल्लाहखेरीज पुकारता, जर अल्लाह मला नुकसान पोहोचवू इच्छिल, तर काय हे त्याच्या नुकसानाला हटवू शकतात किंवा जर अल्लाह माझ्यावर कृपा करू इच्छित असेल तर काय हे त्याच्या कृपेला अडवू शकतात? (तुम्ही) सांगा की अल्लाह (महान) मला पुरेसा आहे. भरवसा राखणारे त्याच्यावरच भरवसा राखतात. info
التفاسير:

external-link copy
39 : 39

قُلْ یٰقَوْمِ اعْمَلُوْا عَلٰی مَكَانَتِكُمْ اِنِّیْ عَامِلٌ ۚ— فَسَوْفَ تَعْلَمُوْنَ ۟ۙ

३९. सांगा की, हे माझ्या जनसमुदाया (उम्मत) च्या लोकांनो! तुम्ही आपल्या जागी कर्म करीत राहा, मी आपल्या जागी कर्म करीत आहे.१ लवकरच तुम्ही (परिणाम) जाणून घ्याल. info

(१) अर्थात जर तुम्ही माझे एकेश्वरवादाचे आवाहन मान्य करीत नाही, ज्यासह अल्लाहने मला पाठविले आहे तर ठीक आहे, तुमची मर्जी तुम्ही आपल्या अवस्थेत राहा, जिच्यात तुम्ही आहात, मी त्या अवस्थेत राहतो, जिच्यात अल्लाहने मला ठेवले आहे.

التفاسير:

external-link copy
40 : 39

مَنْ یَّاْتِیْهِ عَذَابٌ یُّخْزِیْهِ وَیَحِلُّ عَلَیْهِ عَذَابٌ مُّقِیْمٌ ۟

४०. की कोणावर अपमानित करणारा अज़ाब अवतरतो आणि कोणावर निरंतर (कायमस्वरुपी) अपमानित करणारा अज़ाब अवतरित होतो. info
التفاسير: