വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
11 : 39

قُلْ اِنِّیْۤ اُمِرْتُ اَنْ اَعْبُدَ اللّٰهَ مُخْلِصًا لَّهُ الدِّیْنَ ۟ۙ

११. (तुम्ही) सांगा की, मला हा आदेश दिला गेला आहे की अल्लाहची अशा प्रकारे उपासना करावी की त्याच्याचकरिता उपासनेला विशुद्ध (निर्भेळ) करून. info
التفاسير:

external-link copy
12 : 39

وَاُمِرْتُ لِاَنْ اَكُوْنَ اَوَّلَ الْمُسْلِمِیْنَ ۟

१२. आणि मला आदेश दिला गेला आहे की मी सर्वांत प्रथम आज्ञाधारक (मुस्लिम) व्हावे. info
التفاسير:

external-link copy
13 : 39

قُلْ اِنِّیْۤ اَخَافُ اِنْ عَصَیْتُ رَبِّیْ عَذَابَ یَوْمٍ عَظِیْمٍ ۟

१३. सांगा की मला तर आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) ची अवज्ञा करताना मोठ्या दिवसाच्या अज़ाब (शिक्षा - यातने) चे भय वाटते. info
التفاسير:

external-link copy
14 : 39

قُلِ اللّٰهَ اَعْبُدُ مُخْلِصًا لَّهٗ دِیْنِیْ ۟ۙۚ

१४. सांगा की मी तर अगदी सचोटीने (निखालसपणे) केवळ अल्लाहचीच उपासना करतो. info
التفاسير:

external-link copy
15 : 39

فَاعْبُدُوْا مَا شِئْتُمْ مِّنْ دُوْنِهٖ ؕ— قُلْ اِنَّ الْخٰسِرِیْنَ الَّذِیْنَ خَسِرُوْۤا اَنْفُسَهُمْ وَاَهْلِیْهِمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— اَلَا ذٰلِكَ هُوَ الْخُسْرَانُ الْمُبِیْنُ ۟

१५. तुम्ही त्याच्याखेरीज वाटेल त्याची भक्ती - उपासना करीत राहा, सांगा की वस्तुतः तोट्यात तेच आहेत, जे स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना कयामतच्या दिवशी हानीग्रस्त करतील. लक्षात ठेवा, उघड स्वरूपाचा तोटा हाच आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 39

لَهُمْ مِّنْ فَوْقِهِمْ ظُلَلٌ مِّنَ النَّارِ وَمِنْ تَحْتِهِمْ ظُلَلٌ ؕ— ذٰلِكَ یُخَوِّفُ اللّٰهُ بِهٖ عِبَادَهٗ ؕ— یٰعِبَادِ فَاتَّقُوْنِ ۟

१६. त्यांना वरून-खालून आगीच्या ज्वाला छतासारख्या झाकत असतील. हाच अज़ाब होय, ज्यापासून अल्लाह आपल्या दासांना भय दाखवित आहे. हे माझ्या दासांनो! माझे भय बाळगत राहा. info
التفاسير:

external-link copy
17 : 39

وَالَّذِیْنَ اجْتَنَبُوا الطَّاغُوْتَ اَنْ یَّعْبُدُوْهَا وَاَنَابُوْۤا اِلَی اللّٰهِ لَهُمُ الْبُشْرٰی ۚ— فَبَشِّرْ عِبَادِ ۟ۙ

१७. आणि जे लोक अल्लाहखेरीज तागूत (इतरां) ची उपासना करण्यापासून अलिप्त राहिले आणि तन-मनपूर्वक अल्लाहकडे आकर्षित राहिले, ते शुभ-समाचाराचे हक्कदार आहेत. तेव्हा माझ्या दासांना खूशखबर ऐकवा. info
التفاسير:

external-link copy
18 : 39

الَّذِیْنَ یَسْتَمِعُوْنَ الْقَوْلَ فَیَتَّبِعُوْنَ اَحْسَنَهٗ ؕ— اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ هَدٰىهُمُ اللّٰهُ وَاُولٰٓىِٕكَ هُمْ اُولُوا الْاَلْبَابِ ۟

१८. जे लोक कथनास कान लावून (लक्ष्यपूर्वक) ऐकतात, मग जी मोठी चांगली गोष्ट असेल, तिच्यानुसार आचरण करतात, हेच ते लोक होत, ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन केले आहे आणि हेच लोक बुद्धिमानही आहेत. info
التفاسير:

external-link copy
19 : 39

اَفَمَنْ حَقَّ عَلَیْهِ كَلِمَةُ الْعَذَابِ ؕ— اَفَاَنْتَ تُنْقِذُ مَنْ فِی النَّارِ ۟ۚ

१९. बरे, ज्या माणसाला अज़ाब (शिक्षे) चे फर्मान लागू झाले आहे तर काय तुम्ही त्याला, जो जहन्नमध्ये आहे, सोडवू शकता? info
التفاسير:

external-link copy
20 : 39

لٰكِنِ الَّذِیْنَ اتَّقَوْا رَبَّهُمْ لَهُمْ غُرَفٌ مِّنْ فَوْقِهَا غُرَفٌ مَّبْنِیَّةٌ ۙ— تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ۬— وَعْدَ اللّٰهِ ؕ— لَا یُخْلِفُ اللّٰهُ الْمِیْعَادَ ۟

२०. मात्र ते लोक, जे आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगत राहिले, त्यांच्यासाठी उच्च घरे आहेत. ज्यांच्यावर देखील मजले बनले आहेत आणि त्यांच्या खाली जलप्रवाह (झरे) वाहत आहेत. हा अल्लाहचा वायदा आहे आणि तो वचन भंग करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
21 : 39

اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ اَنْزَلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً فَسَلَكَهٗ یَنَابِیْعَ فِی الْاَرْضِ ثُمَّ یُخْرِجُ بِهٖ زَرْعًا مُّخْتَلِفًا اَلْوَانُهٗ ثُمَّ یَهِیْجُ فَتَرٰىهُ مُصْفَرًّا ثُمَّ یَجْعَلُهٗ حُطَامًا ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَذِكْرٰی لِاُولِی الْاَلْبَابِ ۟۠

२१. काय तुम्ही नाही पाहिले की अल्लाह आकाशातून पाणी अवतरित करतो आणि त्यास जमिनीच्या झऱ्यांमध्ये पोहचवितो, मग त्याच्याचद्वारे अनेक प्रकारची शेती उगवितो, मग ती (शेते) सुकतात आणि तुम्ही त्यांना पिवळ्या रंगात पाहतात, मग त्यांचा अगदी चुराडा करून टाकतो. यात बुद्धिमानांकरिता मोठा बोध आहे. info
التفاسير: