(१) यात अनेकेश्वरवादी आणि एकेश्वरवादीचे उदाहरण दिले गेले आहे. अर्थात असा एक गुलाम, जो अनेक मालकांचा दास आहे, जे आपसात भांडत असतात आणि एक दुसरा गुलाम, ज्याचा केवळ एकच मालक आहे. त्याच्या मिळकतीत त्याचा कोणीही भागीदार नाही, तर काय हे दोन्ही गुलाम समान ठरू शकतात? नाही, कदापि नाही. त्याचप्रमाणे तो अनेकेश्वरवादी जो अल्लाहसोबत इतर उपास्यांचीही उपासना करतो आणि दुसरा निखालस ईमान राखणारा जो फक्त अल्लाहची उपासना करतो व त्याच्यासोबत कोणालाही सहभागी बनवित नाही, दोघे समान ठरू शकत नाही.
(१) अर्थात हे पैगंबर! तुम्ही स्वतःही आणि तुमचे विरोधकही मेल्यानंतर या जगातून आमच्याजवळ आखिरत (परलोका) मध्ये येतील नश्वर जदात तर एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवादचा फैसला तुमच्या दरम्यान होऊ शकला नाही आणि तुम्ही याविषयी आपसात भांडत राहिले, परंतु या ठिकाणी मी याचा फैसला करीन आणि विशुद्ध एकेश्वरवाद बाळगणाऱ्यांना जन्नतमध्ये आणि इन्कार करणाऱ्या खोट्या अनेकेश्वरवाद्यांना जहन्नमध्ये टाकीन. या आयतीद्वारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मृत्युचा पुरावा मिळतो. जसा सूरह आले इम्रानच्या आयत क्र. १४४ द्वारेही मिळतो आणि याच आयतीपासून अर्थ काढून हजरत अबु बक्र सिद्दीक यांनी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा मृत्यु सिद्ध केला. यास्तव नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याच्याविषयीही श्रद्धा राखणे की त्यांना बरजख (मृत्युनंतर कयामतपावेतोच्या दरम्यानचा अवधी) मध्ये तसेच जीवन लाभले आहे जसे जिवंत पाणी जगात लाभले होते, पवित्र कुरआनच्या विपरित आहे. त्यांचाही अन्य माणसांसारखा मृत्यु झाला. त्यांनाही गाडले गेले. कबरीत त्यांना बरजख (दरम्यान) चे जीवन अवश्य लाभले आहे ज्याच्या अवस्थेचे ज्ञान आम्हाला नाही, परंतु कबरीत त्यांना दुसऱ्यांदा या जगाचे जीवन दिले गेले नाही.