ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
76 : 17

وَاِنْ كَادُوْا لَیَسْتَفِزُّوْنَكَ مِنَ الْاَرْضِ لِیُخْرِجُوْكَ مِنْهَا وَاِذًا لَّا یَلْبَثُوْنَ خِلٰفَكَ اِلَّا قَلِیْلًا ۟

७६. आणि हे तर तुमचे पाय या भूमीतून डगमगविण्याच्या तयारीला लागलेच होते की तुम्हाला देशाबाहेर घालवावे, मग हे सुद्धा तुमच्यानंतर फार कमी काळ राहू शकले असते. info
التفاسير:

external-link copy
77 : 17

سُنَّةَ مَنْ قَدْ اَرْسَلْنَا قَبْلَكَ مِنْ رُّسُلِنَا وَلَا تَجِدُ لِسُنَّتِنَا تَحْوِیْلًا ۟۠

७७. असाच नियम त्यांचा होता, जे तुमच्यापूर्वी पैगंबर आम्ही पाठविले, आणि तुम्हाला आमच्या नियमांमध्ये कधीही बदल दिसून येणार नाही. info
التفاسير:

external-link copy
78 : 17

اَقِمِ الصَّلٰوةَ لِدُلُوْكِ الشَّمْسِ اِلٰی غَسَقِ الَّیْلِ وَقُرْاٰنَ الْفَجْرِ ؕ— اِنَّ قُرْاٰنَ الْفَجْرِ كَانَ مَشْهُوْدًا ۟

७८. सूर्यास्तापासून रात्रीचा अंधार होईपर्यंत नमाज कायम राखा आणि प्रातःकाळी (फज्रच्या वेळी) कुरआनचे पठणही, निःसंशय प्रातःकाळी कुरआन पठण करणे हजर केले गेले आहे. info
التفاسير:

external-link copy
79 : 17

وَمِنَ الَّیْلِ فَتَهَجَّدْ بِهٖ نَافِلَةً لَّكَ ۖۗ— عَسٰۤی اَنْ یَّبْعَثَكَ رَبُّكَ مَقَامًا مَّحْمُوْدًا ۟

७९. आणि रात्रीच्या काही भागात तहज्जूद (च्या नमाजमध्ये कुरआन) पढत जात. ही अधिकता तुमच्यासाठी आहे. लवकरच तुमचा पालनकर्ता तुम्हाला महमूद नावाच्या (प्रशंसापूर्ण) स्थानावर उभा करेल. info
التفاسير:

external-link copy
80 : 17

وَقُلْ رَّبِّ اَدْخِلْنِیْ مُدْخَلَ صِدْقٍ وَّاَخْرِجْنِیْ مُخْرَجَ صِدْقٍ وَّاجْعَلْ لِّیْ مِنْ لَّدُنْكَ سُلْطٰنًا نَّصِیْرًا ۟

८०. आणि दुआ-प्रार्थना करीत राहा की हे माझ्या पालनकर्त्या! मला जिथेही न्यायचे असेल, चांगल्या प्रकारे ने आणि जिथूनही बाहेर काढायचे असेल चांगल्या प्रकारे काढआणि माझ्यासाठी आपल्या जवळून वर्चस्व आणि मदत निश्चित कर. info
التفاسير:

external-link copy
81 : 17

وَقُلْ جَآءَ الْحَقُّ وَزَهَقَ الْبَاطِلُ ؕ— اِنَّ الْبَاطِلَ كَانَ زَهُوْقًا ۟

८१. आणि या गोष्टीचे ऐलान करा की, सत्य येऊन पोहोचले आणि असत्य मिटले. निःसंशय असत्य मिटण्याच्याच योग्य होते. info
التفاسير:

external-link copy
82 : 17

وَنُنَزِّلُ مِنَ الْقُرْاٰنِ مَا هُوَ شِفَآءٌ وَّرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِیْنَ ۙ— وَلَا یَزِیْدُ الظّٰلِمِیْنَ اِلَّا خَسَارًا ۟

८२. आणि हा कुरआन जो आम्ही अवतरित करीत आहोत, ईमान राखणाऱ्यांसाठी रोगमुक्ती, स्वास्थ्य आणि दया-कृपा आहे, परंतु अत्याचारींसाठी नुकसानाशिवाय कसलीही वाढ होत नाही. info
التفاسير:

external-link copy
83 : 17

وَاِذَاۤ اَنْعَمْنَا عَلَی الْاِنْسَانِ اَعْرَضَ وَنَاٰ بِجَانِبِهٖ ۚ— وَاِذَا مَسَّهُ الشَّرُّ كَانَ یَـُٔوْسًا ۟

८३. आणि जेव्हा देखील माणसाला आम्ही आपली कृपा-देणगी प्रदान करतो, तेव्हा तो तोंड फिरवितो आणि कुशी बदलतो आणि जेव्हा देखील त्याला दुःख पोहोचते तेव्हा तो निराश होतो. info
التفاسير:

external-link copy
84 : 17

قُلْ كُلٌّ یَّعْمَلُ عَلٰی شَاكِلَتِهٖ ؕ— فَرَبُّكُمْ اَعْلَمُ بِمَنْ هُوَ اَهْدٰی سَبِیْلًا ۟۠

८४. सांगा की प्रत्येक मनुष्य आपल्या पद्धतीनुसार कार्य करतो. जे पूर्णतः मार्गदर्शनावर आहेत, त्यांना तुमचा पालनकर्ताच चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
85 : 17

وَیَسْـَٔلُوْنَكَ عَنِ الرُّوْحِ ؕ— قُلِ الرُّوْحُ مِنْ اَمْرِ رَبِّیْ وَمَاۤ اُوْتِیْتُمْ مِّنَ الْعِلْمِ اِلَّا قَلِیْلًا ۟

८५. आणि हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. (तुम्ही त्यांना) उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या हुकूमाने आहे. आणि तुम्हाला जे ज्ञान दिले गेले आहे ते फारच कमी आहे.१ info

(१) मूळ शब्द ‘रुह’ अर्थात आत्मा एक सूक्ष्म वस्तू आहे, जी कोणालाही दिसत नाही, तथापि प्रत्येक सजीवाचे शक्तीसामर्थ्य त्या आत्म्यातच सुप्त आहे याची हकीगत आणि वास्तविकता काय आहे? हे कोणीही जाणत नाही. यहूदी (ज्यू) लोकांनी एकदा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना याबाबत विचारले, तेव्हा ही आयत अवतरली. (सहीह बुखारी) आयतीचा अर्थ हाच की तुमचे ज्ञान, अल्लाहच्या ज्ञानापुढे काहीच नाही आणि ज्या आत्म्याविषयी तुम्ही विचारत आहात, त्याचे ज्ञान तर अल्लाहच्या पैगंबरांनाही दिले गेले नाही, फक्त एवढेच समजा की हा माझ्या पालनकर्त्याचा आदेश आहे, आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याची खरी हकीगत, वस्तुस्थिती केवळ अल्लाहच जाणतो.

التفاسير:

external-link copy
86 : 17

وَلَىِٕنْ شِئْنَا لَنَذْهَبَنَّ بِالَّذِیْۤ اَوْحَیْنَاۤ اِلَیْكَ ثُمَّ لَا تَجِدُ لَكَ بِهٖ عَلَیْنَا وَكِیْلًا ۟ۙ

८६. आणि जर आम्ही इच्छिले तर जी वहयी (प्रकाशना) तुमच्याकडे आम्ही अवतरित केली आहे, सर्व परत घेऊ, मग तुम्हाला त्याच्यासाठी आमच्यासमोर कोणीही हिमायत करणारा लाभू शकणार नाही. info
التفاسير: