ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
105 : 17

وَبِالْحَقِّ اَنْزَلْنٰهُ وَبِالْحَقِّ نَزَلَ ؕ— وَمَاۤ اَرْسَلْنٰكَ اِلَّا مُبَشِّرًا وَّنَذِیْرًا ۟ۘ

१०५. आणि आम्ही या (कुरआना) ला सत्यासह अवतरित केले आणि हा देखील सत्यासह अवतरित झाला आणि आम्ही तुम्हाला केवळ खूशखबर देणारा आणि सचेत करणारा बनवून पाठविले आहे. info
التفاسير:

external-link copy
106 : 17

وَقُرْاٰنًا فَرَقْنٰهُ لِتَقْرَاَهٗ عَلَی النَّاسِ عَلٰی مُكْثٍ وَّنَزَّلْنٰهُ تَنْزِیْلًا ۟

१०६. आणि कुरआनाला आम्ही थोडे थोडे करून अशासाठी उतरविले आहे की तुम्ही वेळ मिळेल त्यानुसार लोकांना ऐकवावे आणि आम्ही स्वतःदेखील याला थोडे थोडे करून उतरविले. info
التفاسير:

external-link copy
107 : 17

قُلْ اٰمِنُوْا بِهٖۤ اَوْ لَا تُؤْمِنُوْا ؕ— اِنَّ الَّذِیْنَ اُوْتُوا الْعِلْمَ مِنْ قَبْلِهٖۤ اِذَا یُتْلٰی عَلَیْهِمْ یَخِرُّوْنَ لِلْاَذْقَانِ سُجَّدًا ۟ۙ

१०७. तुम्ही सांगा, तुम्ही यावर ईमान राखा किंवा न राखा, ज्यांना याच्यापूर्वी ज्ञान दिले गेले आहे, त्यांच्याजवळ जेव्हा देखील याचे पठण केले जाते, तेव्हा ते माथा टेकून सजदा करू लागतात. info
التفاسير:

external-link copy
108 : 17

وَّیَقُوْلُوْنَ سُبْحٰنَ رَبِّنَاۤ اِنْ كَانَ وَعْدُ رَبِّنَا لَمَفْعُوْلًا ۟

१०८. आणि म्हणतात की आमचा पालनकर्ता पवित्र आहे, आमच्या पालनकर्त्याचा वायदा निश्चितच पूर्ण होणार आहे. info
التفاسير:

external-link copy
109 : 17

وَیَخِرُّوْنَ لِلْاَذْقَانِ یَبْكُوْنَ وَیَزِیْدُهُمْ خُشُوْعًا ۟

१०९. आणि ते माथा टेकून रडत रडत सजद्याच्या अवस्थेत खाली पडतात आणि हा कुरआन त्यांची नरमी आणि नम्रता आणखी जास्त वाढवितो. info
التفاسير:

external-link copy
110 : 17

قُلِ ادْعُوا اللّٰهَ اَوِ ادْعُوا الرَّحْمٰنَ ؕ— اَیًّا مَّا تَدْعُوْا فَلَهُ الْاَسْمَآءُ الْحُسْنٰی ۚ— وَلَا تَجْهَرْ بِصَلَاتِكَ وَلَا تُخَافِتْ بِهَا وَابْتَغِ بَیْنَ ذٰلِكَ سَبِیْلًا ۟

११०. तुम्ही सांगा की अल्लाहला अल्लाह म्हणून पुकारा आणि रहमान म्हणून, ज्या नावाने देखील पुकारा सर्व शुभ नामे त्याचीच आहेत. ना तुम्ही आपली नमाज फार उंच स्वरात पढत जा आणि ना अगदी हळू स्वरात किंबहुना यांच्या मधला मार्ग शोधा. info
التفاسير:

external-link copy
111 : 17

وَقُلِ الْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْ لَمْ یَتَّخِذْ وَلَدًا وَّلَمْ یَكُنْ لَّهٗ شَرِیْكٌ فِی الْمُلْكِ وَلَمْ یَكُنْ لَّهٗ وَلِیٌّ مِّنَ الذُّلِّ وَكَبِّرْهُ تَكْبِیْرًا ۟۠

१११. आणि सांगा, समस्त स्तुती- प्रशंसा अल्लाहकरिताच आहे, जो ना संतती बाळगतो आणि ना आपल्या राज्यसत्तेत दुसऱ्या कोणाला भागीदार ठेवतो, ना तो असा कमजोर आहे की त्याचा कोणी सहाय्यक असावा आणि तुम्ही त्याची परिपूर्ण महिमा वर्णन करण्यात मग्न राहा. info
التفاسير: