ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
85 : 17

وَیَسْـَٔلُوْنَكَ عَنِ الرُّوْحِ ؕ— قُلِ الرُّوْحُ مِنْ اَمْرِ رَبِّیْ وَمَاۤ اُوْتِیْتُمْ مِّنَ الْعِلْمِ اِلَّا قَلِیْلًا ۟

८५. आणि हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात. (तुम्ही त्यांना) उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या हुकूमाने आहे. आणि तुम्हाला जे ज्ञान दिले गेले आहे ते फारच कमी आहे.१ info

(१) मूळ शब्द ‘रुह’ अर्थात आत्मा एक सूक्ष्म वस्तू आहे, जी कोणालाही दिसत नाही, तथापि प्रत्येक सजीवाचे शक्तीसामर्थ्य त्या आत्म्यातच सुप्त आहे याची हकीगत आणि वास्तविकता काय आहे? हे कोणीही जाणत नाही. यहूदी (ज्यू) लोकांनी एकदा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना याबाबत विचारले, तेव्हा ही आयत अवतरली. (सहीह बुखारी) आयतीचा अर्थ हाच की तुमचे ज्ञान, अल्लाहच्या ज्ञानापुढे काहीच नाही आणि ज्या आत्म्याविषयी तुम्ही विचारत आहात, त्याचे ज्ञान तर अल्लाहच्या पैगंबरांनाही दिले गेले नाही, फक्त एवढेच समजा की हा माझ्या पालनकर्त्याचा आदेश आहे, आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याची खरी हकीगत, वस्तुस्थिती केवळ अल्लाहच जाणतो.

التفاسير: