Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

Al-Infitaar

external-link copy
1 : 82

اِذَا السَّمَآءُ انْفَطَرَتْ ۟ۙ

१. जेव्हा आकाश विदीर्ण होईल. info
التفاسير:

external-link copy
2 : 82

وَاِذَا الْكَوَاكِبُ انْتَثَرَتْ ۟ۙ

२. आणि जेव्हा तारे झडतील (गळून पडतील) info
التفاسير:

external-link copy
3 : 82

وَاِذَا الْبِحَارُ فُجِّرَتْ ۟ۙ

३. आणि जेव्हा समुद्र वाहून जातील. info
التفاسير:

external-link copy
4 : 82

وَاِذَا الْقُبُوْرُ بُعْثِرَتْ ۟ۙ

४. आणि जेव्हा कबरींना (फाडून) उखडून टाकले जाईल. info
التفاسير:

external-link copy
5 : 82

عَلِمَتْ نَفْسٌ مَّا قَدَّمَتْ وَاَخَّرَتْ ۟ؕ

५. त्या वेळी प्रत्येक मनुष्य, त्याने जे काही पुढे पाठविले आणि मागे सोडले (अर्थात आपल्या पुढच्या मागच्या कर्मांना) जाणून घेईल. info
التفاسير:

external-link copy
6 : 82

یٰۤاَیُّهَا الْاِنْسَانُ مَا غَرَّكَ بِرَبِّكَ الْكَرِیْمِ ۟ۙ

६. हे मानवा! तुला आपल्या दयाळू पालनकर्त्याबाबत कोणत्या गोष्टीने बहकविले?१ info

(१) अर्थात कोणत्या गोष्टीने तुला धोक्यात ठेवले की तू आपल्या पालनकर्त्या (अल्लाह) चा इन्कार केला, ज्याने तुला अस्तित्व प्रदान केले. तुला सुज्ञता प्रदान केली आणि तुझ्यासाठी जीवनोपयोगी साधनसामुग्री तयार केली.

التفاسير:

external-link copy
7 : 82

الَّذِیْ خَلَقَكَ فَسَوّٰىكَ فَعَدَلَكَ ۟ۙ

७. ज्या (पालनकर्त्याने) तुला निर्माण केले, मग यथायोग्य केले, मग (सुयोग्यरित्या) व्यवस्थित घडविले. info
التفاسير:

external-link copy
8 : 82

فِیْۤ اَیِّ صُوْرَةٍ مَّا شَآءَ رَكَّبَكَ ۟ؕ

८. ज्या रूपात इच्छिले तुला बनविले आणि तुला घडविले. info
التفاسير:

external-link copy
9 : 82

كَلَّا بَلْ تُكَذِّبُوْنَ بِالدِّیْنِ ۟ۙ

९. मुळीच नाही, किंबहुना तुम्ही तर शिक्षा आणि मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरविता. info
التفاسير:

external-link copy
10 : 82

وَاِنَّ عَلَیْكُمْ لَحٰفِظِیْنَ ۟ۙ

१०. निःसंशय, तुमच्यावर रक्षक (पहारेकरी) info
التفاسير:

external-link copy
11 : 82

كِرَامًا كٰتِبِیْنَ ۟ۙ

११. सन्मानित लिहिणारे नियुक्त आहेत. info
التفاسير:

external-link copy
12 : 82

یَعْلَمُوْنَ مَا تَفْعَلُوْنَ ۟

१२. जे काही तुम्ही करता, ते जाणतात. info
التفاسير:

external-link copy
13 : 82

اِنَّ الْاَبْرَارَ لَفِیْ نَعِیْمٍ ۟ۙ

१३. निःसंशय, नेक - सदाचारी लोक (जन्नतचे ऐषआराम आणि) देणग्यांनी लाभान्वित असतील. info
التفاسير:

external-link copy
14 : 82

وَاِنَّ الْفُجَّارَ لَفِیْ جَحِیْمٍ ۟ۙ

१४. आणि निश्चितच वाईट (दुराचारी) लोक जहन्नममध्ये असतील. info
التفاسير:

external-link copy
15 : 82

یَّصْلَوْنَهَا یَوْمَ الدِّیْنِ ۟

१५. मोबदल्याच्या दिवशी तिच्यात प्रवेश करतील. info
التفاسير:

external-link copy
16 : 82

وَمَا هُمْ عَنْهَا بِغَآىِٕبِیْنَ ۟ؕ

१६. ते तिच्यातून कधीही गायब होऊ शकणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
17 : 82

وَمَاۤ اَدْرٰىكَ مَا یَوْمُ الدِّیْنِ ۟ۙ

१७. आणि तुम्हाला काही माहीतही आहे की मोबदल्याचा दिवस काय आहे? info
التفاسير:

external-link copy
18 : 82

ثُمَّ مَاۤ اَدْرٰىكَ مَا یَوْمُ الدِّیْنِ ۟ؕ

१८. मी दुसऱ्यांदा (सांगतो की) तुम्हाला काय माहीत की मोबदल्याचा (आणि शिक्षेचा) दिवस काय आहे? info
التفاسير:

external-link copy
19 : 82

یَوْمَ لَا تَمْلِكُ نَفْسٌ لِّنَفْسٍ شَیْـًٔا ؕ— وَالْاَمْرُ یَوْمَىِٕذٍ لِّلّٰهِ ۟۠

१९. (तो असा की) ज्या दिवशी कोणी मनुष्य, कोणा माणसाकरिता कसल्याही गोष्टीचा अधिकार बाळगणारा नसेल आणि समस्त आदेश त्या दिवशी अल्लाहचेच असतील. info
التفاسير: