Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

Al-Moddassir

external-link copy
1 : 74

یٰۤاَیُّهَا الْمُدَّثِّرُ ۟ۙ

१. हे वस्त्र पांघरूण घेणारे! info
التفاسير:

external-link copy
2 : 74

قُمْ فَاَنْذِرْ ۟ۙ

२. उभे राहा आणि खबरदार करा. info
التفاسير:

external-link copy
3 : 74

وَرَبَّكَ فَكَبِّرْ ۟ۙ

३. आणि आपल्या पालनकर्त्याचीच महिमा वर्णन करा. info
التفاسير:

external-link copy
4 : 74

وَثِیَابَكَ فَطَهِّرْ ۟ۙ

४. आणि आपल्या वस्त्रांना पवित्र (स्वच्छ शुद्ध) राखत जा. info
التفاسير:

external-link copy
5 : 74

وَالرُّجْزَ فَاهْجُرْ ۟ۙ

५. आणि अपवित्रता (मलीनता) सोडून द्या. info
التفاسير:

external-link copy
6 : 74

وَلَا تَمْنُنْ تَسْتَكْثِرُ ۟ۙ

६. आणि उपकार करून जास्त प्राप्त करून घेण्याची इच्छा धरू नका. info
التفاسير:

external-link copy
7 : 74

وَلِرَبِّكَ فَاصْبِرْ ۟ؕ

७. आणि आपल्या पालनकर्त्याच्या मार्गात धैर्य-संयम राखा. info
التفاسير:

external-link copy
8 : 74

فَاِذَا نُقِرَ فِی النَّاقُوْرِ ۟ۙ

८. तर जेव्हा सूर (शंख) फुंकला जाईल. info
التفاسير:

external-link copy
9 : 74

فَذٰلِكَ یَوْمَىِٕذٍ یَّوْمٌ عَسِیْرٌ ۟ۙ

९. तर तो दिवस अतिशय कठीण दिवस असेल. info
التفاسير:

external-link copy
10 : 74

عَلَی الْكٰفِرِیْنَ غَیْرُ یَسِیْرٍ ۟

१०. (जो) काफिरांकरिता सहज - सोपा नसेल. info
التفاسير:

external-link copy
11 : 74

ذَرْنِیْ وَمَنْ خَلَقْتُ وَحِیْدًا ۟ۙ

११. मला आणि त्याला सोडून द्या, ज्याला मी एकटा निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
12 : 74

وَّجَعَلْتُ لَهٗ مَالًا مَّمْدُوْدًا ۟ۙ

१२. आणि त्याला खूप धन देऊन ठेवले आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 74

وَّبَنِیْنَ شُهُوْدًا ۟ۙ

१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील. info
التفاسير:

external-link copy
14 : 74

وَّمَهَّدْتُّ لَهٗ تَمْهِیْدًا ۟ۙ

१४. आणि मी त्याला पुष्कळशी व्यापकता (संपन्नता) देऊन ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 74

ثُمَّ یَطْمَعُ اَنْ اَزِیْدَ ۟ۙ

१५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त द्यावे. info
التفاسير:

external-link copy
16 : 74

كَلَّا ؕ— اِنَّهٗ كَانَ لِاٰیٰتِنَا عَنِیْدًا ۟ؕ

१६. कदापि नाही, तो आमच्या आयतींचा विरोधक आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 74

سَاُرْهِقُهٗ صَعُوْدًا ۟ؕ

१७. लवकरच मी त्याला कठीण चढ चढविन. info
التفاسير:

external-link copy
18 : 74

اِنَّهٗ فَكَّرَ وَقَدَّرَ ۟ۙ

१८. त्याने विचार करून एक गोष्ट योजिली. info
التفاسير:

external-link copy
19 : 74

فَقُتِلَ كَیْفَ قَدَّرَ ۟ۙ

१९. त्याचा नाश होवो! त्याने कशी गोष्ट योजिली. info
التفاسير:

external-link copy
20 : 74

ثُمَّ قُتِلَ كَیْفَ قَدَّرَ ۟ۙ

२०. तो पुन्हा नष्ट होवो! त्याने कशी गोष्ट योजिली! info
التفاسير:

external-link copy
21 : 74

ثُمَّ نَظَرَ ۟ۙ

२१. मग त्याने पाहिले. info
التفاسير:

external-link copy
22 : 74

ثُمَّ عَبَسَ وَبَسَرَ ۟ۙ

२२. मग तोंडावर (कपाळावर) आठ्या घातल्या आणि तोंड वाकडे केले. info
التفاسير:

external-link copy
23 : 74

ثُمَّ اَدْبَرَ وَاسْتَكْبَرَ ۟ۙ

२३. मग मागे सरकला आणि गर्व केला. info
التفاسير:

external-link copy
24 : 74

فَقَالَ اِنْ هٰذَاۤ اِلَّا سِحْرٌ یُّؤْثَرُ ۟ۙ

२४. आणि म्हणाला, ही तर फक्त जादू आहे, जी साध्य केली जाते. info
التفاسير:

external-link copy
25 : 74

اِنْ هٰذَاۤ اِلَّا قَوْلُ الْبَشَرِ ۟ؕ

२५. (हे) मानवी कथनाखेरीज आणखी काही नाही. info
التفاسير:

external-link copy
26 : 74

سَاُصْلِیْهِ سَقَرَ ۟

२६. मी लवकरच त्याला जहन्नममध्ये टाकीन. info
التفاسير:

external-link copy
27 : 74

وَمَاۤ اَدْرٰىكَ مَا سَقَرُ ۟ؕ

२७. आणि तुम्हाला काय माहीत की जहन्नम काय आहे? info
التفاسير:

external-link copy
28 : 74

لَا تُبْقِیْ وَلَا تَذَرُ ۟ۚ

२८. ती ना बाकी ठेवते आणि ना सोडते. info
التفاسير:

external-link copy
29 : 74

لَوَّاحَةٌ لِّلْبَشَرِ ۟ۚ

२९. त्वचेला होरपळून टाकते. info
التفاسير:

external-link copy
30 : 74

عَلَیْهَا تِسْعَةَ عَشَرَ ۟ؕ

३०. आणि तिच्यावर एकोणीस (फरिश्ते तैनात) आहेत. info
التفاسير:

external-link copy
31 : 74

وَمَا جَعَلْنَاۤ اَصْحٰبَ النَّارِ اِلَّا مَلٰٓىِٕكَةً ۪— وَّمَا جَعَلْنَا عِدَّتَهُمْ اِلَّا فِتْنَةً لِّلَّذِیْنَ كَفَرُوْا ۙ— لِیَسْتَیْقِنَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ وَیَزْدَادَ الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِیْمَانًا وَّلَا یَرْتَابَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ وَالْمُؤْمِنُوْنَ ۙ— وَلِیَقُوْلَ الَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ وَّالْكٰفِرُوْنَ مَاذَاۤ اَرَادَ اللّٰهُ بِهٰذَا مَثَلًا ؕ— كَذٰلِكَ یُضِلُّ اللّٰهُ مَنْ یَّشَآءُ وَیَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَمَا یَعْلَمُ جُنُوْدَ رَبِّكَ اِلَّا هُوَ ؕ— وَمَا هِیَ اِلَّا ذِكْرٰی لِلْبَشَرِ ۟۠

३१. आणि आम्ही जहन्नमचे रक्षक केवळ फरिश्ते ठेवले आहेत आणि आम्ही त्यांची संख्या केवळ काफिरांच्या कसोटीकरिता निर्धारित केली आहे. यासाठी की ग्रंथधारकांनी विश्वास करावा आणि ईमान राखणाऱ्यांच्या ईमानात वृद्धी व्हावी आणि ग्रंथधारक व मुस्लिमांनी संशय करू नये, आणि ज्यांच्या मनात रोग आहे त्यांनी व काफिरांनी म्हणावे की या अशा उदाहरणाने अल्लाहला काय अभिप्रेत आहे? अशा प्रकारे अल्लाह, ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो सन्मार्ग दाखवितो. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या लष्करांना त्याच्याखेरीज कोणीही जाणत नाही. हा समस्त मानवांकरिता (परिपूर्ण) बोध (आणि भलाई) आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 74

كَلَّا وَالْقَمَرِ ۟ۙ

३२. कदापि नाही. चंद्राची शपथ info
التفاسير:

external-link copy
33 : 74

وَالَّیْلِ اِذْ اَدْبَرَ ۟ۙ

३३. आणि रात्रीची जेव्हा ती पालटते. info
التفاسير:

external-link copy
34 : 74

وَالصُّبْحِ اِذَاۤ اَسْفَرَ ۟ۙ

३४. आणि प्रातःकाळची, जेव्हा तो प्रकाशमान व्हावा. info
التفاسير:

external-link copy
35 : 74

اِنَّهَا لَاِحْدَی الْكُبَرِ ۟ۙ

३५. की (निःसंशय ती जहन्नम) मोठ्या गोष्टींपैकी एक आहे. info
التفاسير:

external-link copy
36 : 74

نَذِیْرًا لِّلْبَشَرِ ۟ۙ

३६. माणसाला भयभीत करणारी info
التفاسير:

external-link copy
37 : 74

لِمَنْ شَآءَ مِنْكُمْ اَنْ یَّتَقَدَّمَ اَوْ یَتَاَخَّرَ ۟ؕ

३७. त्या माणसांकरिता, जे तुमच्यापैकी पुढे जाऊ इच्छितील किंवा मागे हटू इच्छितील. info
التفاسير:

external-link copy
38 : 74

كُلُّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ رَهِیْنَةٌ ۟ۙ

३८. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मांच्या ऐवजी गहाण आहे. info
التفاسير:

external-link copy
39 : 74

اِلَّاۤ اَصْحٰبَ الْیَمِیْنِ ۟ؕۛ

३९. परंतु उजव्या हाताचे info
التفاسير:

external-link copy
40 : 74

فِیْ جَنّٰتٍ ۛ۫— یَتَسَآءَلُوْنَ ۟ۙ

४०. (की) ते जन्नतींमध्ये (बसून) विचारत असतील info
التفاسير:

external-link copy
41 : 74

عَنِ الْمُجْرِمِیْنَ ۟ۙ

४१. अपराधी लोकांना info
التفاسير:

external-link copy
42 : 74

مَا سَلَكَكُمْ فِیْ سَقَرَ ۟

४२. तुम्हाला जहन्नममध्ये कोणत्या गोष्टीने टाकले? info
التفاسير:

external-link copy
43 : 74

قَالُوْا لَمْ نَكُ مِنَ الْمُصَلِّیْنَ ۟ۙ

४३. ते उत्तर देतील की आम्ही नमाज पढणारे नव्हतो. info
التفاسير:

external-link copy
44 : 74

وَلَمْ نَكُ نُطْعِمُ الْمِسْكِیْنَ ۟ۙ

४४. भुकेल्यांना जेवु घालत नव्हतो. info
التفاسير:

external-link copy
45 : 74

وَكُنَّا نَخُوْضُ مَعَ الْخَآىِٕضِیْنَ ۟ۙ

४५. आणि आम्ही निरर्थक गोष्ट (इन्कार) करणाऱ्यांसोबत निरर्थक गोष्टीत व्यस्त राहात होतो. info
التفاسير:

external-link copy
46 : 74

وَكُنَّا نُكَذِّبُ بِیَوْمِ الدِّیْنِ ۟ۙ

४६. आणि आम्ही मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवित होतो. info
التفاسير:

external-link copy
47 : 74

حَتّٰۤی اَتٰىنَا الْیَقِیْنُ ۟ؕ

४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला. info
التفاسير:

external-link copy
48 : 74

فَمَا تَنْفَعُهُمْ شَفَاعَةُ الشّٰفِعِیْنَ ۟ؕ

४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही. info
التفاسير:

external-link copy
49 : 74

فَمَا لَهُمْ عَنِ التَّذْكِرَةِ مُعْرِضِیْنَ ۟ۙ

४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत. info
التفاسير:

external-link copy
50 : 74

كَاَنَّهُمْ حُمُرٌ مُّسْتَنْفِرَةٌ ۟ۙ

५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत. info
التفاسير:

external-link copy
51 : 74

فَرَّتْ مِنْ قَسْوَرَةٍ ۟ؕ

५१. जे सिंहापासून पळत असावे. info
التفاسير:

external-link copy
52 : 74

بَلْ یُرِیْدُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ اَنْ یُّؤْتٰی صُحُفًا مُّنَشَّرَةً ۟ۙ

५२. किंबहुना त्यांच्यापैकी प्रत्येक मनुष्य इच्छितो की त्याला स्पष्ट ग्रंथ दिले जावेत. info
التفاسير:

external-link copy
53 : 74

كَلَّا ؕ— بَلْ لَّا یَخَافُوْنَ الْاٰخِرَةَ ۟ؕ

५३. असे कदापि (होऊ शकत) नाही, किंबहुना हे कयामतबाबत निर्भय आहेत. info
التفاسير:

external-link copy
54 : 74

كَلَّاۤ اِنَّهٗ تَذْكِرَةٌ ۟ۚ

५४. कदापि नाही! हा (कुरआन) एक उपदेश आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 74

فَمَنْ شَآءَ ذَكَرَهٗ ۟ؕ

५५. आता जो इच्छिल, त्यापासून बोध ग्रहण करील. info
التفاسير:

external-link copy
56 : 74

وَمَا یَذْكُرُوْنَ اِلَّاۤ اَنْ یَّشَآءَ اللّٰهُ ؕ— هُوَ اَهْلُ التَّقْوٰی وَاَهْلُ الْمَغْفِرَةِ ۟۠

५६. आणि हे त्याच वेळी बोध ग्रहण करतील, जेव्हा अल्लाह इच्छिल. तो या गोष्टीस पात्र आहे की त्याचे भय राखावे आणि यासही पात्र की त्याने माफ करावे. info
التفاسير: