Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

Pagina nummer:close

external-link copy
12 : 58

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا نَاجَیْتُمُ الرَّسُوْلَ فَقَدِّمُوْا بَیْنَ یَدَیْ نَجْوٰىكُمْ صَدَقَةً ؕ— ذٰلِكَ خَیْرٌ لَّكُمْ وَاَطْهَرُ ؕ— فَاِنْ لَّمْ تَجِدُوْا فَاِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

१२. हे ईमान राखणाऱ्यांनो! जेव्हा तुम्ही पैगंबराशी एकांतात बोलू इच्छित असाल तर आपल्या या एकांतात बोलण्यापूर्वी काही दान (सदका) करत जा, हे तुमच्यासाठी अधिक चांगले आणि पवित्र (निर्मळ) आहे, मात्र जर काहीच नसेल तर निःसंशय, अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 58

ءَاَشْفَقْتُمْ اَنْ تُقَدِّمُوْا بَیْنَ یَدَیْ نَجْوٰىكُمْ صَدَقٰتٍ ؕ— فَاِذْ لَمْ تَفْعَلُوْا وَتَابَ اللّٰهُ عَلَیْكُمْ فَاَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاٰتُوا الزَّكٰوةَ وَاَطِیْعُوا اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ ؕ— وَاللّٰهُ خَبِیْرٌ بِمَا تَعْمَلُوْنَ ۟۠

१३. काय तुम्ही कानगोष्टीपूर्वी दान करण्यास भ्याले तर जेव्हा तुम्ही असे केले नाही आणि अल्लाहने देखील तुम्हाला माफ केले तेव्हा आता (उचितपणे) नमाजांना कायम राखा, जकात देत राहा आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या आदेशाचे पालन करीत राहा आणि तुम्ही जे काही करता ते सर्व अल्लाह (चांगल्या प्रकारे) जाणून आहे. info
التفاسير:

external-link copy
14 : 58

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ تَوَلَّوْا قَوْمًا غَضِبَ اللّٰهُ عَلَیْهِمْ ؕ— مَا هُمْ مِّنْكُمْ وَلَا مِنْهُمْ ۙ— وَیَحْلِفُوْنَ عَلَی الْكَذِبِ وَهُمْ یَعْلَمُوْنَ ۟ۚ

१४. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिले, ज्यांनी त्या जनसमूहाशी मैत्री केली, ज्यांच्यावर अल्लाह नाराज झाला आहे, हे ना तुमच्यापैकी आहेत, ना त्यांच्यापैकी, आणि ज्ञान असतानाही खोट्या गोष्टींवर शपथ घेत आहेत. info
التفاسير:

external-link copy
15 : 58

اَعَدَّ اللّٰهُ لَهُمْ عَذَابًا شَدِیْدًا ؕ— اِنَّهُمْ سَآءَ مَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१५. अल्लाहने त्यांच्यासाठी कठोर शिक्षा यातना तयार करून ठेवली आहे. खात्रीने हे जे काही करीत आहेत, वाईट करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
16 : 58

اِتَّخَذُوْۤا اَیْمَانَهُمْ جُنَّةً فَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ فَلَهُمْ عَذَابٌ مُّهِیْنٌ ۟

१६. या लोकांनी आपल्या शपथांना ढाल बनवून ठेवले आहे आणि लोकांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात, तेव्हा त्यांच्यासाठी अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 58

لَنْ تُغْنِیَ عَنْهُمْ اَمْوَالُهُمْ وَلَاۤ اَوْلَادُهُمْ مِّنَ اللّٰهِ شَیْـًٔا ؕ— اُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ النَّارِ ؕ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟

१७. त्यांची धन-संपत्ती आणि त्यांची संतती अल्लाहसमोर काहीच उपयोगी पडणार नाही. हे तर जहन्नममध्ये जाणार आहेत, नेहमी तिच्यातच राहतील. info
التفاسير:

external-link copy
18 : 58

یَوْمَ یَبْعَثُهُمُ اللّٰهُ جَمِیْعًا فَیَحْلِفُوْنَ لَهٗ كَمَا یَحْلِفُوْنَ لَكُمْ وَیَحْسَبُوْنَ اَنَّهُمْ عَلٰی شَیْءٍ ؕ— اَلَاۤ اِنَّهُمْ هُمُ الْكٰذِبُوْنَ ۟

१८. ज्या दिवशी अल्लाह त्या सर्वांना उठवून उभे करील, तेव्हा हे ज्या प्रकारे तुमच्यासमोर शपथ घेतात, अल्लाहच्या समोरही शपथ घेऊ लागतील आणि समजतील की ते देखील एखाद्या (प्रमाणा) वर आहेत, विश्वास करा की निःसंशय तेच खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
19 : 58

اِسْتَحْوَذَ عَلَیْهِمُ الشَّیْطٰنُ فَاَنْسٰىهُمْ ذِكْرَ اللّٰهِ ؕ— اُولٰٓىِٕكَ حِزْبُ الشَّیْطٰنِ ؕ— اَلَاۤ اِنَّ حِزْبَ الشَّیْطٰنِ هُمُ الْخٰسِرُوْنَ ۟

१९. त्याच्यावर सैतानाने वर्चस्व प्राप्त केले आहे आणि त्यांना अल्लाहच्या स्मरणाचा विसर पाडला आहे. ही सैतानाची सेना आहे. ऐका! सैतानाची सेनाच तोट्यात राहणार आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 58

اِنَّ الَّذِیْنَ یُحَآدُّوْنَ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗۤ اُولٰٓىِٕكَ فِی الْاَذَلِّیْنَ ۟

२०. निःसंशय, अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा जे लोक विरोध करतात, तेच लोक सवार्धिक अपमानित होणाऱ्यांपैकी आहेत. info
التفاسير:

external-link copy
21 : 58

كَتَبَ اللّٰهُ لَاَغْلِبَنَّ اَنَا وَرُسُلِیْ ؕ— اِنَّ اللّٰهَ قَوِیٌّ عَزِیْزٌ ۟

२१. अल्लाहने लिहून टाकले आहे की निःसंशय, मी आणि माझे रसूल वर्चस्वशाली (विजयी) राहतील. निःसंशय, अल्लाह मोठा शक्तिशाली आणि वर्चस्वशाली आहे. info
التفاسير: