Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

external-link copy
97 : 3

فِیْهِ اٰیٰتٌۢ بَیِّنٰتٌ مَّقَامُ اِبْرٰهِیْمَ ۚ۬— وَمَنْ دَخَلَهٗ كَانَ اٰمِنًا ؕ— وَلِلّٰهِ عَلَی النَّاسِ حِجُّ الْبَیْتِ مَنِ اسْتَطَاعَ اِلَیْهِ سَبِیْلًا ؕ— وَمَنْ كَفَرَ فَاِنَّ اللّٰهَ غَنِیٌّ عَنِ الْعٰلَمِیْنَ ۟

९७. ज्यात स्पष्ट निशाण्या आहेत. ‘मुकामे इब्राहीम’ (एक दगड आहे, ज्यावर काबागृहाचे बांधकाम करताना हजरत इब्राहीम उभे राहात) इथे जो कोणी दाखल झाला, त्याला शांती लाभली. अल्लाहने त्या लोकांवर, जे या घरापर्यंत येण्याचे सामर्थ्य राखतात, १ या घराचे हज्ज आवश्यक ठरविले आहे आणि जो कोणी इन्कार करील तर सर्वश्रेष्ठ अल्लाहला सर्व जगाच्या लोकांची काही पर्वा नाही. info

(१) ‘सामर्थ्य राखतात’चा अर्थ असा की प्रवास-खर्चाची ऐपत असावी, म्हणजे इतके धन असावे की जाण्या-येण्याचा खर्च सहजपणे पूर्ण व्हावा याशिवाय हेही आहे की मार्गात शांती व सुरक्षितता असावी आणि प्राण-वित्त सुरक्षित राहावे. तसेच तब्येत प्रवास मानवेल अशी असावी. याखेरीज स्त्रीच्या सोबत, ज्याच्याशी लग्नसंबंध होऊ शकत नाही असा एखादा नातेवाईक असावा.

التفاسير: