Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

An-Noer

external-link copy
1 : 24

سُوْرَةٌ اَنْزَلْنٰهَا وَفَرَضْنٰهَا وَاَنْزَلْنَا فِیْهَاۤ اٰیٰتٍۢ بَیِّنٰتٍ لَّعَلَّكُمْ تَذَكَّرُوْنَ ۟

१. ही आहे ती सूरह (अध्याय) जी आम्ही अवतरित केली आहे आणि निर्धारित केली आहे आणि ज्यात आम्ही स्पष्ट आदेश अवतरित केले आहेत, यासाठी की तुम्ही स्मरणात राखावे. info
التفاسير:

external-link copy
2 : 24

اَلزَّانِیَةُ وَالزَّانِیْ فَاجْلِدُوْا كُلَّ وَاحِدٍ مِّنْهُمَا مِائَةَ جَلْدَةٍ ۪— وَّلَا تَاْخُذْكُمْ بِهِمَا رَاْفَةٌ فِیْ دِیْنِ اللّٰهِ اِنْ كُنْتُمْ تُؤْمِنُوْنَ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ ۚ— وَلْیَشْهَدْ عَذَابَهُمَا طَآىِٕفَةٌ مِّنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟

२. व्यभिचार करणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी प्रत्येकाला शंभर कोडे मारा. त्यांना अल्लाहच्या (दंड) नियमानुसार शिक्षा देताना तुम्हाला कदापी कीव वाटू नये, जर तुम्ही अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखत असाल. त्यांना शिक्षा देतेवेळी ईमान राखणाऱ्यांचा एक समूह हजर असला पाहिजे. info
التفاسير:

external-link copy
3 : 24

اَلزَّانِیْ لَا یَنْكِحُ اِلَّا زَانِیَةً اَوْ مُشْرِكَةً ؗ— وَّالزَّانِیَةُ لَا یَنْكِحُهَاۤ اِلَّا زَانٍ اَوْ مُشْرِكٌ ۚ— وَحُرِّمَ ذٰلِكَ عَلَی الْمُؤْمِنِیْنَ ۟

३. व्यभिचारी पुरुष, व्यभिचारी स्त्री किंवा अनेकेश्वरवादी स्त्रीशिवाय दुसऱ्या स्त्रीशी विवाह करीत नाही आणि व्यभिचार करणारी स्त्री देखील, व्यभिचारी पुरुष किंवा अनेकेश्वरवादी पुरुषाखेरीज दुसऱ्याशी विवाह करीत नाही आणि ईमान राखणाऱ्यांवर हे हराम (अवैध) केले गेले आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 24

وَالَّذِیْنَ یَرْمُوْنَ الْمُحْصَنٰتِ ثُمَّ لَمْ یَاْتُوْا بِاَرْبَعَةِ شُهَدَآءَ فَاجْلِدُوْهُمْ ثَمٰنِیْنَ جَلْدَةً وَّلَا تَقْبَلُوْا لَهُمْ شَهَادَةً اَبَدًا ۚ— وَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْفٰسِقُوْنَ ۟ۙ

४. आणि जे लोक पावित्र्यशील स्त्रीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील, मग चार साक्षी सादर करू शकत नसतील तर त्यांना ऐंशी कोडे मारा आणि त्यांची साक्ष कधीही मान्य करू नका, हे दुराचारी लोक आहेत. info
التفاسير:

external-link copy
5 : 24

اِلَّا الَّذِیْنَ تَابُوْا مِنْ بَعْدِ ذٰلِكَ وَاَصْلَحُوْا ۚ— فَاِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

५. परंतु जे लोक यानंतर माफी मागून आपला सुधार करून घेतील, तर सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा आणि दया- कृपा करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 24

وَالَّذِیْنَ یَرْمُوْنَ اَزْوَاجَهُمْ وَلَمْ یَكُنْ لَّهُمْ شُهَدَآءُ اِلَّاۤ اَنْفُسُهُمْ فَشَهَادَةُ اَحَدِهِمْ اَرْبَعُ شَهٰدٰتٍۢ بِاللّٰهِ ۙ— اِنَّهٗ لَمِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

६. आणि जे लोक आपल्या पत्नीवर व्यभिचाराचा आरोप ठेवतील आणि त्यांचा साक्षी त्यांच्याखेरीज दुसरा कोणी नसेल तर अशा लोकांपैकी प्रत्येकाचा पुरावा हा आहे की त्यांनी चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की ते सच्चा लोकांपैकी आहेत. info
التفاسير:

external-link copy
7 : 24

وَالْخَامِسَةُ اَنَّ لَعْنَتَ اللّٰهِ عَلَیْهِ اِنْ كَانَ مِنَ الْكٰذِبِیْنَ ۟

७. आणि पाचव्या खेपेस हे की अल्लाहतर्फे धिःक्कार असो त्याचा, जर तो खोट्यांपैकी असेल. info
التفاسير:

external-link copy
8 : 24

وَیَدْرَؤُا عَنْهَا الْعَذَابَ اَنْ تَشْهَدَ اَرْبَعَ شَهٰدٰتٍۢ بِاللّٰهِ ۙ— اِنَّهٗ لَمِنَ الْكٰذِبِیْنَ ۟ۙ

८. आणि त्या (स्त्री) वरून शिक्षा अशा प्रकारे टाळली जाऊ शकते की तिने चार वेळा अल्लाहची शपथ घेऊन म्हणावे की निःसंशय तिचा पती खोटे बोलणाऱ्यांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 24

وَالْخَامِسَةَ اَنَّ غَضَبَ اللّٰهِ عَلَیْهَاۤ اِنْ كَانَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

९. आणि पाचव्या खेपेस म्हणावे की तिच्यावर अल्लाहचा प्रकोप होवो जर तिचा पती सत्य बोलणाऱ्यांपैकी असेल. info
التفاسير:

external-link copy
10 : 24

وَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكُمْ وَرَحْمَتُهٗ وَاَنَّ اللّٰهَ تَوَّابٌ حَكِیْمٌ ۟۠

१०. आणि जर अल्लाहची दया- कृपा तुमच्यावर नसती (तर तुमच्यावर दुःख कोसळले असते) आणि अल्लाह क्षमा-याचना कबूल करणारा हिकमतशाली आहे. info
التفاسير: