Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

Pagina nummer:close

external-link copy
135 : 2

وَقَالُوْا كُوْنُوْا هُوْدًا اَوْ نَصٰرٰی تَهْتَدُوْا ؕ— قُلْ بَلْ مِلَّةَ اِبْرٰهٖمَ حَنِیْفًا ؕ— وَمَا كَانَ مِنَ الْمُشْرِكِیْنَ ۟

१३५. हे म्हणतात की यहूदी (ज्यू) आणि ख्रिश्चन व्हाल तर मार्गदर्शन लाभेल. तुम्ही सांगा की सरळ आणि उचित मार्गावर तर इब्राहीमच्या मार्गाचे अनुसरण करणारे आहेत आणि इब्राहीम केवळ अल्लाहचे आज्ञाधारक होते. ते मूर्तीपूजक नव्हते. info
التفاسير:

external-link copy
136 : 2

قُوْلُوْۤا اٰمَنَّا بِاللّٰهِ وَمَاۤ اُنْزِلَ اِلَیْنَا وَمَاۤ اُنْزِلَ اِلٰۤی اِبْرٰهٖمَ وَاِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ وَالْاَسْبَاطِ وَمَاۤ اُوْتِیَ مُوْسٰی وَعِیْسٰی وَمَاۤ اُوْتِیَ النَّبِیُّوْنَ مِنْ رَّبِّهِمْ ۚ— لَا نُفَرِّقُ بَیْنَ اَحَدٍ مِّنْهُمْ ؗ— وَنَحْنُ لَهٗ مُسْلِمُوْنَ ۟

१३६. (हे ईमानधारकांनो!) तुम्ही सर्व सांगा, आम्ही अल्लाहवर ईमान राखले आणि त्यावरही जे आमच्याकडे उतरविले गेले आणि जे इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब आणि त्यांच्या संततीवर उतरविले गेले आणि जे काही अल्लाहच्या तर्फे मूसा, ईसा आणि अन्य पैगंबरांना दिले गेले. आम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही दरम्यान फरक करीत नाही. आम्ही अल्लाहचे ताबेदार आहोत.१ info

(१) अर्थात ईमानची व्यापक व्याख्या ही की सर्व पैगंबरांना अल्लाहतर्फे जे काही मिळाले किंवा त्यांच्यावर अवतरीत झाले, त्या सर्वांवर ईमान राखले जावे. कोणत्याही ग्रंथाचा किंवा पैगंबराचा इन्कार केला जाऊ नये. एखाद्या ग्रंथाला किंवा पैगंबराला मानणे, आणि दुसऱ्याचा नकार दर्शविणे ही गोष्ट पैगंबरांच्या दरम्यान फरक जाहीर करते, जी इस्लामच्या मते उचित नाही. तथापि आता आचरण मात्र पवित्र कुरआनच्या नियम आणि आदेशांना अनुसरून होईल. पूर्वीच्या अवतरीत ग्रंथातील आदेशानुसार नव्हे. कारण प्रथम तर ते ग्रंथ आपल्या मूळ स्वरूपात नाहीत. फेरबदल झालेले आहेत आणि दुसरे हे की कुरआनने त्या सर्वांच्या आदेशांना रद्द केले आहे.

التفاسير:

external-link copy
137 : 2

فَاِنْ اٰمَنُوْا بِمِثْلِ مَاۤ اٰمَنْتُمْ بِهٖ فَقَدِ اهْتَدَوْا ۚ— وَاِنْ تَوَلَّوْا فَاِنَّمَا هُمْ فِیْ شِقَاقٍ ۚ— فَسَیَكْفِیْكَهُمُ اللّٰهُ ۚ— وَهُوَ السَّمِیْعُ الْعَلِیْمُ ۟ؕ

१३७. जर ते तुमच्यासारखे ईमान राखतील तर मार्गदर्शन प्राप्त करतील आणि जर तोंड फिरवतील तर विरोधात आहेत. अल्लाह त्या सर्वांच्या विरोधात भविष्यात तुमची मदत करील. अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकणारा आणि जाणणारा आहे. info

(१) या आयतीत पुन्हा लाभ आणि आचरणाची श्रेष्ठता विशद करून थोर बुजुर्ग आणि महात्मा वगैरेंशी नाते किंवा त्यांच्यावर भरोसा व्यर्थ सांगितला गेला आहे. कारण, (‘‘ज्याला त्याच्या कर्माने मागे सोडले, त्याचा वंश त्याला पुढे नेणार नाही.’’) (सहीह मुस्लिम) अर्थात थोर बुजुर्गांच्या चांगल्या कामाने तुम्हाला काही फायदा आणि त्यांच्या वाईट कर्मांविषयी तुम्हाला काही विचारले जाणार नाही, किंबहुना त्यांच्या कर्मांविषयी तुम्हाला किंवा तुमच्या आचरणाबाबत त्यांना विचारणा केली जाणार नाही.
“कोणीही कोणाचे ओझे उचलणार नाही.’’ (सूरह फातिर-१८)
“माणसाकरिता तेच काही आहे, ज्याच्यासाठी त्याने प्रयत्न केला.’’ (सूरह अल नजम-३९)

التفاسير:

external-link copy
138 : 2

صِبْغَةَ اللّٰهِ ۚ— وَمَنْ اَحْسَنُ مِنَ اللّٰهِ صِبْغَةً ؗ— وَّنَحْنُ لَهٗ عٰبِدُوْنَ ۟

१३८. अल्लाहचा रंग धारण करा, आणि अल्लाहपेक्षा उत्तम रंग आणि कोणाचा असेल? आम्ही तर त्याचीच उपासना करणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
139 : 2

قُلْ اَتُحَآجُّوْنَنَا فِی اللّٰهِ وَهُوَ رَبُّنَا وَرَبُّكُمْ ۚ— وَلَنَاۤ اَعْمَالُنَا وَلَكُمْ اَعْمَالُكُمْ ۚ— وَنَحْنُ لَهٗ مُخْلِصُوْنَ ۟ۙ

१३९. (तुम्ही) सांगा, काय तुम्ही आमच्याशी अल्लाहबाबत वाद घालता, जो आमचा आणि तुमचा पालनकर्ता आहे. आमच्यासाठी आमची कर्मे आहेत, तुमच्यासाठी तुमची कर्मे. आम्ही तर केवळ अल्लाहशीच सच्चे, प्रामाणिक आहोत. info
التفاسير:

external-link copy
140 : 2

اَمْ تَقُوْلُوْنَ اِنَّ اِبْرٰهٖمَ وَاِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ وَالْاَسْبَاطَ كَانُوْا هُوْدًا اَوْ نَصٰرٰی ؕ— قُلْ ءَاَنْتُمْ اَعْلَمُ اَمِ اللّٰهُ ؕ— وَمَنْ اَظْلَمُ مِمَّنْ كَتَمَ شَهَادَةً عِنْدَهٗ مِنَ اللّٰهِ ؕ— وَمَا اللّٰهُ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُوْنَ ۟

१४०. काय तुम्ही असे म्हणता की इब्राहीम, इस्माईल, इसहाक आणि याकूब व त्यांची संतती यहूदी किंवा ख्रिश्चन होती? सांगा, काय तुम्ही जास्त जाणता की अल्लाह? अल्लाहच्या जवळ पुरावा लपविणाऱ्यांपेक्षा जास्त अत्याचारी आणखी कोण आहे? आणि अल्लाह तुमच्या कर्मांपासून गाफील नाही. info
التفاسير:

external-link copy
141 : 2

تِلْكَ اُمَّةٌ قَدْ خَلَتْ ۚ— لَهَا مَا كَسَبَتْ وَلَكُمْ مَّا كَسَبْتُمْ ۚ— وَلَا تُسْـَٔلُوْنَ عَمَّا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟۠

१४१. हा एक जनसमूह होता जो होऊन गेला, त्यांनी जे (कर्म) केले ते त्यांच्यासाठी आहे आणि जे तुम्ही केले ते तुमच्यासाठी. तुम्हाला त्यांच्या कर्मांविषयी विचारले जाणार नाही.१ info
التفاسير: