Vertaling van de betekenissen Edele Qur'an - De Marathi-vertaling - Mohammed Shafee Ansari

Joesoef

external-link copy
1 : 12

الٓرٰ ۫— تِلْكَ اٰیٰتُ الْكِتٰبِ الْمُبِیْنِ ۟۫

१. अलिफ. लाम. रॉ या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत. info
التفاسير:

external-link copy
2 : 12

اِنَّاۤ اَنْزَلْنٰهُ قُرْءٰنًا عَرَبِیًّا لَّعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟

२. निःसंशय, आम्ही हे अरबी कुरआन अवतरीत केले आहे, यासाठी की तुम्ही समजू शकावे. info
التفاسير:

external-link copy
3 : 12

نَحْنُ نَقُصُّ عَلَیْكَ اَحْسَنَ الْقَصَصِ بِمَاۤ اَوْحَیْنَاۤ اِلَیْكَ هٰذَا الْقُرْاٰنَ ۖۗ— وَاِنْ كُنْتَ مِنْ قَبْلِهٖ لَمِنَ الْغٰفِلِیْنَ ۟

३. आम्ही तुमच्यासमोर सर्वांत उत्तम निवेदन प्रस्तुत करतो, या कारणास्तव की आम्ही आपल्याकडे हा कुरआन वहयी (अवतरित संदेशा) द्वारे उतरविला आहे आणि निःसंशय याच्यापूर्वी तुम्ही न जाणणाऱ्यांपैकी होते.१ info

(१) पवित्र कुरआनच्या या शब्दांद्वारेही स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना अपरोक्ष (गैबचे) ज्ञान नव्हते, अन्यथा अल्लाहने त्यांना न जाणणारे म्हटले नसते. दुसरे हे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहचे सच्चे पैगंबर आहेत. कारण त्यांच्यावर वहयीद्वारेच या सत्य घटनेला सांगितले गेले आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना कोणाचे शिष्य होते की गुरूपासून शिकून सांगितले होते आणि ना कोणा दुसऱ्याशी असे नाते होते की ज्याच्यापासून ऐकून इतिहासाची ही घटना तिच्या खास अहवालासह पैगंबरांनी प्रसारित केली असती. तेव्हा यात मुळीच शंका नाही की हे सर्वश्रेष्ठ अल्लाहने वहयीच्या माध्यमाने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित केले आहे, जसे या ठिकाणी स्पष्ट केले गेले आहे.

التفاسير:

external-link copy
4 : 12

اِذْ قَالَ یُوْسُفُ لِاَبِیْهِ یٰۤاَبَتِ اِنِّیْ رَاَیْتُ اَحَدَ عَشَرَ كَوْكَبًا وَّالشَّمْسَ وَالْقَمَرَ رَاَیْتُهُمْ لِیْ سٰجِدِیْنَ ۟

४. जेव्हा यूसुफ आपल्या पित्यास म्हणाले, हे पिता! मी अकरा ताऱ्यांना आणि सूर्य-चंद्राला पाहिले की ते सर्व मला सजदा करीत आहेत. info
التفاسير: