ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ: 227:221 close

external-link copy
54 : 11

اِنْ نَّقُوْلُ اِلَّا اعْتَرٰىكَ بَعْضُ اٰلِهَتِنَا بِسُوْٓءٍ ؕ— قَالَ اِنِّیْۤ اُشْهِدُ اللّٰهَ وَاشْهَدُوْۤا اَنِّیْ بَرِیْٓءٌ مِّمَّا تُشْرِكُوْنَ ۟ۙ

५४. किंबहुना आम्ही तर म्हणतो की तुला आमच्या एखाद्या दैवताने झपाटून टाकले आहे. हूद म्हणाले, मी अल्लाहला साक्षी बनवितो आणि तुम्हीदेखील साक्षी राहा की मी तर अल्लाहखेरीज त्या सर्वांपासून वेगळा आहे, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी बनवित आहात. info
التفاسير:

external-link copy
55 : 11

مِنْ دُوْنِهٖ فَكِیْدُوْنِیْ جَمِیْعًا ثُمَّ لَا تُنْظِرُوْنِ ۟

५५. ठीक, तुम्ही सर्व मिळून माझ्याविरूद्ध वाईट कारवाई करून टाका, आणि मला कधीही सवड देऊ नका. info
التفاسير:

external-link copy
56 : 11

اِنِّیْ تَوَكَّلْتُ عَلَی اللّٰهِ رَبِّیْ وَرَبِّكُمْ ؕ— مَا مِنْ دَآبَّةٍ اِلَّا هُوَ اٰخِذٌ بِنَاصِیَتِهَا ؕ— اِنَّ رَبِّیْ عَلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

५६. माझा भरोसा केवळ अल्लाहवरच आहे, जो माझा पालनकर्ता आणि तुम्हा सर्वांचा पालनकर्ता आहे. जेवढेदेखील चालणारे फिरणारे आहेत, त्या सर्वांचे मस्तिष्क (कपाळ) त्यानेच धरून ठेवले आहे. निःसंशय माझा पालनकर्ता अगदी सरळ मार्गावर आहे. info
التفاسير:

external-link copy
57 : 11

فَاِنْ تَوَلَّوْا فَقَدْ اَبْلَغْتُكُمْ مَّاۤ اُرْسِلْتُ بِهٖۤ اِلَیْكُمْ ؕ— وَیَسْتَخْلِفُ رَبِّیْ قَوْمًا غَیْرَكُمْ ۚ— وَلَا تَضُرُّوْنَهٗ شَیْـًٔا ؕ— اِنَّ رَبِّیْ عَلٰی كُلِّ شَیْءٍ حَفِیْظٌ ۟

५७. तरीही तुम्ही तोंड फिरवित असाल तर फिरवा. मी तर तुम्हाला तो संदेश पोहचता केला, जो देऊन मला तुमच्याकडे पाठविले गेले होते. माझा पालनकर्ता तुमच्या जागी दुसऱ्या लोकांना आणील आणि तुम्ही त्याचे काहीच बिघडवू शकणार नाहीत. निःसंशय माझा पालनकर्ता प्रत्येक चीज वस्तूचा संरक्षक आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 11

وَلَمَّا جَآءَ اَمْرُنَا نَجَّیْنَا هُوْدًا وَّالَّذِیْنَ اٰمَنُوْا مَعَهٗ بِرَحْمَةٍ مِّنَّا ۚ— وَنَجَّیْنٰهُمْ مِّنْ عَذَابٍ غَلِیْظٍ ۟

५८. आणि जेव्हा आमचा आदेश येऊन पोहोचला, तेव्हा आम्ही हूदला आणि त्याच्या ईमानधारक साथीदारांना आपल्या खास दया-कृपेने सुटका प्रदान केली आणि आम्ही त्या सर्वांना भयंकर (सक्त) शिक्षा-यातनेपासून वाचविले.१ info

(१) सक्त शिक्षेशी अभिप्रेत तीच वादळाची शिक्षा होय, ज्याद्वारे हजरत हूद (अलै.) यांचा जनसमूह आदला नष्ट केले गेले आणि ज्यापासून हजरत हूद आणि त्यांच्यावर ईमान राखणाऱ्यांना वाचविले गेले.

التفاسير:

external-link copy
59 : 11

وَتِلْكَ عَادٌ جَحَدُوْا بِاٰیٰتِ رَبِّهِمْ وَعَصَوْا رُسُلَهٗ وَاتَّبَعُوْۤا اَمْرَ كُلِّ جَبَّارٍ عَنِیْدٍ ۟

५९. हा होता आदचा जनसमूह, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याच्या आयतींचा इन्कार केला आणि त्याच्या पैगंबरांची अवज्ञा केली आणि प्रत्येक विद्रोही अवज्ञाकारीच्या आदेशांचे पालन केले. info
التفاسير:

external-link copy
60 : 11

وَاُتْبِعُوْا فِیْ هٰذِهِ الدُّنْیَا لَعْنَةً وَّیَوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— اَلَاۤ اِنَّ عَادًا كَفَرُوْا رَبَّهُمْ ؕ— اَلَا بُعْدًا لِّعَادٍ قَوْمِ هُوْدٍ ۟۠

६०. आणि या जगातही त्यांचा धिःक्कार व निर्भत्सना होत राहिली आणि कयामतच्या दिवशीही १ पाहा, आदच्या जनसमूहाने आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला. हूदचा जनसमूह आदचा धिःक्कार असो. info

(१) मूळ शब्द लानत अर्थात अल्लाहतर्फे धिःक्कार, त्याच्या दया-कृपेपासून वंचितता सत्कर्मांपासून दुरावणे आणि लोकांतर्फे धिःक्कार निर्भत्सना जगातही लानत अशा प्रकारे की ईमान राखणाऱ्यांमध्ये यांची चर्चा नेहमी धिःक्कार आणि निर्भत्सनेच्या स्वरूपात होईल आणि कयामतमध्ये अशा प्रकारे की तिथे सर्वांच्याच समोर अपमानला तोंड देतील आणि अल्लाहच्या महाभयंकर शिक्षा-यातनेस पात्र ठरतील.

التفاسير:

external-link copy
61 : 11

وَاِلٰی ثَمُوْدَ اَخَاهُمْ صٰلِحًا ۘ— قَالَ یٰقَوْمِ اعْبُدُوا اللّٰهَ مَا لَكُمْ مِّنْ اِلٰهٍ غَیْرُهٗ ؕ— هُوَ اَنْشَاَكُمْ مِّنَ الْاَرْضِ وَاسْتَعْمَرَكُمْ فِیْهَا فَاسْتَغْفِرُوْهُ ثُمَّ تُوْبُوْۤا اِلَیْهِ ؕ— اِنَّ رَبِّیْ قَرِیْبٌ مُّجِیْبٌ ۟

६१. आणि समूदच्या जनसमूहाकडे त्यांचे भाऊ सॉलेह यांना पाठविले. सॉलेह म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहचीच भक्ती उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही उपास्य नाही. त्यानेच तुम्हाला जमिनीपासून निर्माण केले आहे, आणि त्याने या धरतीवर तुम्हाला आबाद केले आहे. यास्तव तुम्ही त्याच्याजवळ माफी मागा आणि त्याच्याचकडे तौबा (क्षमा-याचना) करा. निःसंशय माझा पालनकर्ता तौबा कबूल करणारा समीप आहे. info
التفاسير:

external-link copy
62 : 11

قَالُوْا یٰصٰلِحُ قَدْ كُنْتَ فِیْنَا مَرْجُوًّا قَبْلَ هٰذَاۤ اَتَنْهٰىنَاۤ اَنْ نَّعْبُدَ مَا یَعْبُدُ اٰبَآؤُنَا وَاِنَّنَا لَفِیْ شَكٍّ مِّمَّا تَدْعُوْنَاۤ اِلَیْهِ مُرِیْبٍ ۟

६२. जनसमूहाचे लोक म्हणाले, हे सॉलेह! याच्या पूर्वी आम्ही तुमच्याकडून अनेक आशा अपेक्षा बाळगून होतो. काय तुम्ही आम्हाला त्यांच्या भक्तीपासून रोखता, ज्यांची भक्ती आराधना आमचे वाडवडील करत आले, आम्हाला तर या धर्माबाबत शंका आहे, ज्याकडे तुम्ही आम्हाला बोलावित आहात. info
التفاسير: