(१) हजरत नूह यांनी आपल्या कौटुंबिक सान्निध्यापायी त्याला आपला पुत्र म्हटले होते. परंतु अल्लाहने ईमानाच्या आधारावर, धर्मनिष्ठ नियमानुसार या गोष्टीस नकार दर्शविला की तो तुमच्या कुटुंबियांपैकी आहे कारण एका पैगंबराचा खरा परिवार तर तोच आहे, जो त्याच्यावर ईमान राखेल. मग तो कोणीही असो आणि जर ईमान न राखेल तर मग तो पैगंबराचा पिता असो, पुत्र असो, किंवा पत्नी असो. पैगंबराच्या कुटुंबाचा सदस्य ठरू शकत नाही.