ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
98 : 11

یَقْدُمُ قَوْمَهٗ یَوْمَ الْقِیٰمَةِ فَاَوْرَدَهُمُ النَّارَ ؕ— وَبِئْسَ الْوِرْدُ الْمَوْرُوْدُ ۟

९८. तो तर कयामतच्या दिवशी आपल्या जनसमूहाचा पुढाकार घेऊन त्या सर्वांना नरकात आणून उभा करील. तो मोठा वाईट घाट आहे जिथे हे लोक जाऊन पोहचतील. info
التفاسير:

external-link copy
99 : 11

وَاُتْبِعُوْا فِیْ هٰذِهٖ لَعْنَةً وَّیَوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— بِئْسَ الرِّفْدُ الْمَرْفُوْدُ ۟

९९. आणि त्यांच्यावर या जगातही धिःक्कार (चा मारा) झाला आणि कयामतच्या दिवशीही. किती वाईट इनाम (बक्षीस) आहे, जे त्यांना दिले गेले. info
التفاسير:

external-link copy
100 : 11

ذٰلِكَ مِنْ اَنْۢبَآءِ الْقُرٰی نَقُصُّهٗ عَلَیْكَ مِنْهَا قَآىِٕمٌ وَّحَصِیْدٌ ۟

१००. वस्त्यांचा हा काही समाचार, जो आम्ही तुमच्यासमोर निवेदन करीत आहोत, त्यांच्यापैकी काही अस्तित्वात आहेत आणि काही कापणी केलेल्या पिकांसारख्या झाल्या. info
التفاسير:

external-link copy
101 : 11

وَمَا ظَلَمْنٰهُمْ وَلٰكِنْ ظَلَمُوْۤا اَنْفُسَهُمْ فَمَاۤ اَغْنَتْ عَنْهُمْ اٰلِهَتُهُمُ الَّتِیْ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ مِنْ شَیْءٍ لَّمَّا جَآءَ اَمْرُ رَبِّكَ ؕ— وَمَا زَادُوْهُمْ غَیْرَ تَتْبِیْبٍ ۟

१०१. आणि आम्ही त्यांच्यावर कोणताही जुलूम-अत्याचार केला नाही, किंबहुना त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार केला आणि त्यांना त्यांच्या आराध्य दैवतांनी कसलाही लाभ पोहचविला नाही, ज्यांना ते अल्लाहखेरीज पुकारत होते, वास्तविक तुमच्या पालनकर्त्याचा आदेश येऊन पोहोचला, किंबहुना त्यांनी त्यांच्या नुकसानात भरच घातली. info
التفاسير:

external-link copy
102 : 11

وَكَذٰلِكَ اَخْذُ رَبِّكَ اِذَاۤ اَخَذَ الْقُرٰی وَهِیَ ظَالِمَةٌ ؕ— اِنَّ اَخْذَهٗۤ اَلِیْمٌ شَدِیْدٌ ۟

१०२. आणि तुमच्या पालनकर्त्याच्या पकडीचा हाच नियम आहे, जेव्हा तो वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अत्याचारी लोकांना तावडीत घेतो. निःसंशय अल्लाहची पकड दुःखदायक आणि अतिशय सक्त आहे. info
التفاسير:

external-link copy
103 : 11

اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً لِّمَنْ خَافَ عَذَابَ الْاٰخِرَةِ ؕ— ذٰلِكَ یَوْمٌ مَّجْمُوْعٌ ۙ— لَّهُ النَّاسُ وَذٰلِكَ یَوْمٌ مَّشْهُوْدٌ ۟

१०३. निश्चितच यात त्या लोकांसाठी बोध-उपदेश आहे, जे कयामतच्या भयंकर शिक्षा-यातनेचे भय राखतात. तो दिवस, ज्या दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवशी सर्व एकत्र केले जातील आणि तोच दिवस की ज्या दिवशी सर्वांना हजर केले जाईल. info
التفاسير:

external-link copy
104 : 11

وَمَا نُؤَخِّرُهٗۤ اِلَّا لِاَجَلٍ مَّعْدُوْدٍ ۟ؕ

१०४. आणि त्याला आम्ही जो विलंब करतो, तो फकत्‌ एका निर्धारीत वेळेपर्यंतच आहे. info
التفاسير:

external-link copy
105 : 11

یَوْمَ یَاْتِ لَا تَكَلَّمُ نَفْسٌ اِلَّا بِاِذْنِهٖ ۚ— فَمِنْهُمْ شَقِیٌّ وَّسَعِیْدٌ ۟

१०५. ज्या दिवशी ती (कयामत) येईल, कोणाला हिंमत होणार नाही की अल्लाहच्या अनुमतीविना काही बोलावे, तेव्हा त्यांच्यापैकी कोणी दुर्दैवी असेल आणि कोणी सुदैवी. info
التفاسير:

external-link copy
106 : 11

فَاَمَّا الَّذِیْنَ شَقُوْا فَفِی النَّارِ لَهُمْ فِیْهَا زَفِیْرٌ وَّشَهِیْقٌ ۟ۙ

१०६. तर जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील, तिथे हळू आणि उंच स्वरात ओरडतील. info
التفاسير:

external-link copy
107 : 11

خٰلِدِیْنَ فِیْهَا مَا دَامَتِ السَّمٰوٰتُ وَالْاَرْضُ اِلَّا مَا شَآءَ رَبُّكَ ؕ— اِنَّ رَبَّكَ فَعَّالٌ لِّمَا یُرِیْدُ ۟

१०७. ते तिथे सदैवकाळ राहतील, जोपर्यंत आकाश व धरती कायम असतील. मात्र त्या वेळखेरीज, जी तुमच्या पालनकर्त्याची मर्जी असेल. निःसंशय, तुमचा पालनकर्ता जे काही इच्छितो ते करतोच. info
التفاسير:

external-link copy
108 : 11

وَاَمَّا الَّذِیْنَ سُعِدُوْا فَفِی الْجَنَّةِ خٰلِدِیْنَ فِیْهَا مَا دَامَتِ السَّمٰوٰتُ وَالْاَرْضُ اِلَّا مَا شَآءَ رَبُّكَ ؕ— عَطَآءً غَیْرَ مَجْذُوْذٍ ۟

१०८. आणि ज्यांना सुदैवी केले गेले ते जन्नत (स्वर्गा) मध्ये असतील जिथे ते नेहमीकरिता राहतील, जोपर्यंत आकाश व धरती बाकी राहील, परंतु जे तुमचा पालनकर्ता इच्छिल ही कधीही न संपणारी देणगी आहे. info
التفاسير: