クルアーンの対訳 - マラーティー語対訳 - Muhammad Shafi Ansari

ページ番号: 147:128 close

external-link copy
147 : 6

فَاِنْ كَذَّبُوْكَ فَقُلْ رَّبُّكُمْ ذُوْ رَحْمَةٍ وَّاسِعَةٍ ۚ— وَلَا یُرَدُّ بَاْسُهٗ عَنِ الْقَوْمِ الْمُجْرِمِیْنَ ۟

१४७. जर तो तुम्हाला खोटे ठरविल तर सांगा की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ची दया अतिशय विस्तृत आहे आणि त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) अपराधी लोकांवरून टळू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
148 : 6

سَیَقُوْلُ الَّذِیْنَ اَشْرَكُوْا لَوْ شَآءَ اللّٰهُ مَاۤ اَشْرَكْنَا وَلَاۤ اٰبَآؤُنَا وَلَا حَرَّمْنَا مِنْ شَیْءٍ ؕ— كَذٰلِكَ كَذَّبَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ حَتّٰی ذَاقُوْا بَاْسَنَا ؕ— قُلْ هَلْ عِنْدَكُمْ مِّنْ عِلْمٍ فَتُخْرِجُوْهُ لَنَا ؕ— اِنْ تَتَّبِعُوْنَ اِلَّا الظَّنَّ وَاِنْ اَنْتُمْ اِلَّا تَخْرُصُوْنَ ۟

१४८. अनेक ईश्वरांची उपासना करणारे म्हणतील, अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही आणि आमच्या वाड-वडिलांनी, अल्लाहसोबत दुसऱ्यांना उपास्य मानले नसते, ना एखाद्या वस्तूला हराम ठरविले असते अशा प्रकारे यांच्या पूर्वीच्या लोकांनी खोटे ठरविले, येथपर्यंत की आमच्या अज़ाबचा स्वाद चाखून घेतला. त्यांना सांगा, काय तुमच्याजवळ एखादे ज्ञान आहे तर ते आमच्यासाठी बाहेर काढा (जाहीर करा) तुम्ही अटकळीवर चालता आणि फक्त अनुमान लावता. info
التفاسير:

external-link copy
149 : 6

قُلْ فَلِلّٰهِ الْحُجَّةُ الْبَالِغَةُ ۚ— فَلَوْ شَآءَ لَهَدٰىكُمْ اَجْمَعِیْنَ ۟

१४९. तुम्ही सांगा, मग अल्लाहचेच प्रमाण प्रभावशाली आहे, यास्तव त्याने जर इच्छिले तर तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करू शकतो. info
التفاسير:

external-link copy
150 : 6

قُلْ هَلُمَّ شُهَدَآءَكُمُ الَّذِیْنَ یَشْهَدُوْنَ اَنَّ اللّٰهَ حَرَّمَ هٰذَا ۚ— فَاِنْ شَهِدُوْا فَلَا تَشْهَدْ مَعَهُمْ ۚ— وَلَا تَتَّبِعْ اَهْوَآءَ الَّذِیْنَ كَذَّبُوْا بِاٰیٰتِنَا وَالَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ وَهُمْ بِرَبِّهِمْ یَعْدِلُوْنَ ۟۠

१५०. तुम्ही सांगा, आपल्या त्या साक्ष देणाऱ्यांना आणा, ज्यांनी ही साक्ष द्यावी की अल्लाहने याला हरामे केले आहे, मग जर ते साक्ष देतील तर तुम्ही त्यांच्यासोबत साक्ष देऊ नका आणि त्यांच्या मनमानी इच्छा-आकांक्षांचे अनुसरण करू नका आणि ज्यांनी आमच्या आयतींना खोटे ठरविले आणि जे आखिरतवर ईमान राखत नाही आणि (इतरांना)आपल्या पालनकर्त्यासमान मानतात. info
التفاسير:

external-link copy
151 : 6

قُلْ تَعَالَوْا اَتْلُ مَا حَرَّمَ رَبُّكُمْ عَلَیْكُمْ اَلَّا تُشْرِكُوْا بِهٖ شَیْـًٔا وَّبِالْوَالِدَیْنِ اِحْسَانًا ۚ— وَلَا تَقْتُلُوْۤا اَوْلَادَكُمْ مِّنْ اِمْلَاقٍ ؕ— نَحْنُ نَرْزُقُكُمْ وَاِیَّاهُمْ ۚ— وَلَا تَقْرَبُوا الْفَوَاحِشَ مَا ظَهَرَ مِنْهَا وَمَا بَطَنَ ۚ— وَلَا تَقْتُلُوا النَّفْسَ الَّتِیْ حَرَّمَ اللّٰهُ اِلَّا بِالْحَقِّ ؕ— ذٰلِكُمْ وَصّٰىكُمْ بِهٖ لَعَلَّكُمْ تَعْقِلُوْنَ ۟

१५१. तुम्ही सांगा की, या, मी वाचून ऐकवू की तुम्हाला तुमच्या पालनकर्त्याने कशापासून मनाई केली आहे. ते हे की त्याच्यासोबत कोणत्याही चीज-वस्तूला सहभागी करू नका आणि माता पित्याशी नेक वर्तन करा आणि आपल्या संततीची गरीबीमुळे हत्या करू नका. आम्ही तुम्हाला आणि त्यांना रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि खुल्या व छुप्या निर्लज्जतेच्या जवळ जाऊ नका आणि त्या जीवाला ज्याबाबत अल्लाहने मनाई केली आहे, ठार मारू नका, परंतु धर्मशास्त्रीय (शरीअतच्या) कारणाने. तुम्हाला त्याने याचाच आदेश दिला आहे, यासाठी की तुम्ही समजून घ्यावे. info
التفاسير: