クルアーンの対訳 - マラーティー語対訳 - Muhammad Shafi Ansari

ページ番号:close

external-link copy
125 : 6

فَمَنْ یُّرِدِ اللّٰهُ اَنْ یَّهْدِیَهٗ یَشْرَحْ صَدْرَهٗ لِلْاِسْلَامِ ۚ— وَمَنْ یُّرِدْ اَنْ یُّضِلَّهٗ یَجْعَلْ صَدْرَهٗ ضَیِّقًا حَرَجًا كَاَنَّمَا یَصَّعَّدُ فِی السَّمَآءِ ؕ— كَذٰلِكَ یَجْعَلُ اللّٰهُ الرِّجْسَ عَلَی الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१२५. ज्याला अल्लाह सरळ मार्ग दाखवू इच्छितो त्याची छाती (हृदय) इस्लाम (धर्मा) करिता खुली करतो आणि ज्याला मार्गभ्रष्ट करू इच्छितो, त्याची छाती आणखी जास्त संकुचित करतो, जणू काही तो आकाशात चढत आहे. अशा प्रकारे अल्लाह त्यांना घाणीत टाकतो जे ईमान राखत नाही. info
التفاسير:

external-link copy
126 : 6

وَهٰذَا صِرَاطُ رَبِّكَ مُسْتَقِیْمًا ؕ— قَدْ فَصَّلْنَا الْاٰیٰتِ لِقَوْمٍ یَّذَّكَّرُوْنَ ۟

१२६. हा तुमच्या पालनकर्त्याचा सरळ मार्ग आहे आम्ही आयतींचे सविस्तर वर्णन त्या जनसमूहाकरिता दिले आहे, जे बोध प्राप्त करतात. info
التفاسير:

external-link copy
127 : 6

لَهُمْ دَارُ السَّلٰمِ عِنْدَ رَبِّهِمْ وَهُوَ وَلِیُّهُمْ بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१२७. यांच्याचसाठी त्यांच्या पालनकर्त्याच्या ठिकाणी सलामतीचे घर आहे आणि तोच त्यांच्या सत्कर्मांच्या आधारावर त्यांचा मित्र आहे. info
التفاسير:

external-link copy
128 : 6

وَیَوْمَ یَحْشُرُهُمْ جَمِیْعًا ۚ— یٰمَعْشَرَ الْجِنِّ قَدِ اسْتَكْثَرْتُمْ مِّنَ الْاِنْسِ ۚ— وَقَالَ اَوْلِیٰٓؤُهُمْ مِّنَ الْاِنْسِ رَبَّنَا اسْتَمْتَعَ بَعْضُنَا بِبَعْضٍ وَّبَلَغْنَاۤ اَجَلَنَا الَّذِیْۤ اَجَّلْتَ لَنَا ؕ— قَالَ النَّارُ مَثْوٰىكُمْ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اِلَّا مَا شَآءَ اللّٰهُ ؕ— اِنَّ رَبَّكَ حَكِیْمٌ عَلِیْمٌ ۟

१२८. आणि ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना एकत्र करील (आणि फर्माविल) हे जिन्न-समूह! तुम्ही मानवांपैकी बहुतेकांना आत्मसात केले आणि मानवांपैकी त्यांचे मित्र म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपसात लाभ पोहचव आणि आम्ही तुझ्या निर्धारीत वेळेस, जी तू आमच्यासाठी निश्चित केली, जाऊन पोहोचलो. (अल्लाह) फर्माविल, की तुमची जागा जहन्नममध्ये आहे, ज्यात तुम्ही सदैव राहाल, परंतु अल्लाह इच्छिल, निःसंशय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली, ज्ञानी आहे. info
التفاسير:

external-link copy
129 : 6

وَكَذٰلِكَ نُوَلِّیْ بَعْضَ الظّٰلِمِیْنَ بَعْضًا بِمَا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟۠

१२९. अशाच प्रकारे आम्ही अत्याचारी लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी एकमेकांचे दोस्त बनवितो. info
التفاسير:

external-link copy
130 : 6

یٰمَعْشَرَ الْجِنِّ وَالْاِنْسِ اَلَمْ یَاْتِكُمْ رُسُلٌ مِّنْكُمْ یَقُصُّوْنَ عَلَیْكُمْ اٰیٰتِیْ وَیُنْذِرُوْنَكُمْ لِقَآءَ یَوْمِكُمْ هٰذَا ؕ— قَالُوْا شَهِدْنَا عَلٰۤی اَنْفُسِنَا وَغَرَّتْهُمُ الْحَیٰوةُ الدُّنْیَا وَشَهِدُوْا عَلٰۤی اَنْفُسِهِمْ اَنَّهُمْ كَانُوْا كٰفِرِیْنَ ۟

१३०. हे जिन्न आणि मानवांच्या समूहांनो! काय तुमच्याजवळ तुमच्यामधून रसूल (पैगंबर) नाही आलेत? जे तुमच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकवित होते आणि तुम्हाला या (कयामतच्या) दिवसाचा सामना करण्याबाबत सचेत करीत राहिले. ते म्हणतील, आम्ही स्वतःविरूद्ध साक्षी आहोत आणि ऐहिक जीवनाने त्यांना धोक्यात ठेवले आणि ते स्वतःविरूद्धच साक्ष देतील की ते काफिर (इन्कारी) होते. info
التفاسير: