Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

Ghafir

external-link copy
1 : 40

حٰمٓ ۟ۚ

१. हा. मीम info
التفاسير:

external-link copy
2 : 40

تَنْزِیْلُ الْكِتٰبِ مِنَ اللّٰهِ الْعَزِیْزِ الْعَلِیْمِ ۟ۙ

२. या ग्रंथाचे अवतरित करणे, त्या अल्लाहतर्फे आहे जो वर्चस्वशाली आणि ज्ञान बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 40

غَافِرِ الذَّنْۢبِ وَقَابِلِ التَّوْبِ شَدِیْدِ الْعِقَابِ ذِی الطَّوْلِ ؕ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ؕ— اِلَیْهِ الْمَصِیْرُ ۟

३. अपराधांना माफ करणारा आणि तौबा (क्षमा -यातना) कबूल करणारा, कठोर शिक्षा - यातना देणारा, उपकार (कृपा) आणि सामर्थ्य बाळगणारा, ज्याच्याखेरीज कोणी उपास्य नाही, त्याच्याचकडे परतावयाचे आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 40

مَا یُجَادِلُ فِیْۤ اٰیٰتِ اللّٰهِ اِلَّا الَّذِیْنَ كَفَرُوْا فَلَا یَغْرُرْكَ تَقَلُّبُهُمْ فِی الْبِلَادِ ۟

४. अल्लाहच्या आयतींमध्ये तेच लोक वाद घालतात, जे काफिर आहेत तेव्हा त्या लोकांचे शहरांमध्ये हिंडणे फिरणे तुम्हाला धोक्यात न टाकावे. info
التفاسير:

external-link copy
5 : 40

كَذَّبَتْ قَبْلَهُمْ قَوْمُ نُوْحٍ وَّالْاَحْزَابُ مِنْ بَعْدِهِمْ ۪— وَهَمَّتْ كُلُّ اُمَّةٍ بِرَسُوْلِهِمْ لِیَاْخُذُوْهُ وَجٰدَلُوْا بِالْبَاطِلِ لِیُدْحِضُوْا بِهِ الْحَقَّ فَاَخَذْتُهُمْ ۫— فَكَیْفَ كَانَ عِقَابِ ۟

५. त्यांच्यापूर्वी नूहच्या जनसमूहाने आणि त्यांच्या नंतरच्या इतर जनसमूहांनी देखील खोटे ठरविले होते आणि प्रत्येक जनसमुदायाने आपल्या पैगंबराला बंदिस्त बनविण्याचा इरादा केला आणि असत्याद्वआरे हटवादीपणा केला, यासाठी की त्याद्वारे सत्याला नष्ट करून टाकावे, तेव्हा मी त्यांना पकडीत घेतले, तर बघा कशी होती माझी शिक्षा! info
التفاسير:

external-link copy
6 : 40

وَكَذٰلِكَ حَقَّتْ كَلِمَتُ رَبِّكَ عَلَی الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اَنَّهُمْ اَصْحٰبُ النَّارِ ۟

६. आणि या प्रकारे तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान लोकांवरही लागू झाले. ज्यांनी कुप्र (इन्कार) केला की ते जहन्नमी आहेत. info
التفاسير:

external-link copy
7 : 40

اَلَّذِیْنَ یَحْمِلُوْنَ الْعَرْشَ وَمَنْ حَوْلَهٗ یُسَبِّحُوْنَ بِحَمْدِ رَبِّهِمْ وَیُؤْمِنُوْنَ بِهٖ وَیَسْتَغْفِرُوْنَ لِلَّذِیْنَ اٰمَنُوْا ۚ— رَبَّنَا وَسِعْتَ كُلَّ شَیْءٍ رَّحْمَةً وَّعِلْمًا فَاغْفِرْ لِلَّذِیْنَ تَابُوْا وَاتَّبَعُوْا سَبِیْلَكَ وَقِهِمْ عَذَابَ الْجَحِیْمِ ۟

७. अर्श (अल्लाहच्या सिंहासना) ला उचलून धरणारे आणि त्याच्याभोवती असणारे फरिश्ते आपल्या पालनकर्त्याच्या पवित्रतेचे गुणगान, प्रशंसेसह करतात आणि त्याच्यावर ईमान राखतात आणि ईमान राखणाऱ्यांसाठी क्षमा - याचनेची प्रार्थना करतात, (म्हणतात) की हे आमच्या स्वामी व पालनकर्त्या! तू प्रत्येक गोष्टीला आपल्या दया आणि ज्ञानाने घेरून ठेवले आहे, तेव्हा तू त्यांना माफ कर, जे माफी मागतील आणि तुझ्या मार्गाचे अनुसरण करतील, आणि तू त्यांना जहन्नमच्या शिक्षा - यातनेपासूनही सुरक्षित ठेव. info
التفاسير: