Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

Lambar shafi:close

external-link copy
43 : 38

وَوَهَبْنَا لَهٗۤ اَهْلَهٗ وَمِثْلَهُمْ مَّعَهُمْ رَحْمَةً مِّنَّا وَذِكْرٰی لِاُولِی الْاَلْبَابِ ۟

४३. आणि आम्ही त्याला त्याचे संपूर्ण कुटुंब प्रदान केले, किंबहुना तेवढेच आणखीही त्यासोबत आपल्या खास कृपेने, आणि बुद्धिमानांकरिता बोधप्राप्तीसाठी. info
التفاسير:

external-link copy
44 : 38

وَخُذْ بِیَدِكَ ضِغْثًا فَاضْرِبْ بِّهٖ وَلَا تَحْنَثْ ؕ— اِنَّا وَجَدْنٰهُ صَابِرًا ؕ— نِّعْمَ الْعَبْدُ ؕ— اِنَّهٗۤ اَوَّابٌ ۟

४४. आणि आपल्या हातात काड्यांचा गुच्छा घेऊन त्याने मार आणि शपथ तोडू नको.१ खरे तर असे की आम्हाला तो मोठा सहनशील दास आढळला. तो मोठा नेक सदाचारी दास होता आणि (अल्लाहकडे) मोठा रुजू करणारा. info

(१) आजारपणाच्या दिवसात शुश्रुषा करणाऱ्या पत्नीशी कसल्या तरी गोष्टीवर नाराज होऊन हजरत अय्यूब यांनी तिला शंभर कोडे (ंहंटर) मारण्याची शपथ घेतली होती. रोगमुक्त झाल्यानंतर अल्लाहने सांगितले की शंभर काड्यांचा एक झाडू घेऊन तिला मार, म्हणजे तुझी शपथ पूर्ण होईल.

التفاسير:

external-link copy
45 : 38

وَاذْكُرْ عِبٰدَنَاۤ اِبْرٰهِیْمَ وَاِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ اُولِی الْاَیْدِیْ وَالْاَبْصَارِ ۟

४५. आणि आमचे दास इब्राहीम, इसहाक आणि याकूब यांचीही (लोकांमध्ये) चर्चा करा जे हात आणि डोळे राखणारे होते. info
التفاسير:

external-link copy
46 : 38

اِنَّاۤ اَخْلَصْنٰهُمْ بِخَالِصَةٍ ذِكْرَی الدَّارِ ۟ۚ

४६. आम्ही त्यांना एक विशेष गोष्ट अर्थात आखिरतच्या स्मरणासोबत खासरित्या संबंधित करून घेतले होते. info
التفاسير:

external-link copy
47 : 38

وَاِنَّهُمْ عِنْدَنَا لَمِنَ الْمُصْطَفَیْنَ الْاَخْیَارِ ۟ؕ

४७. आणि हे सर्व आमच्याजवळ निवडक आणि सर्वाधिक चांगल्या लोकांपैकी होते. info
التفاسير:

external-link copy
48 : 38

وَاذْكُرْ اِسْمٰعِیْلَ وَالْیَسَعَ وَذَا الْكِفْلِ ؕ— وَكُلٌّ مِّنَ الْاَخْیَارِ ۟ؕ

४८. आणि इस्माईल, यसअ आणि जुलकिफ्ल यांचेही वर्णन करा. हे सर्व नेक लोक होते. info
التفاسير:

external-link copy
49 : 38

هٰذَا ذِكْرٌ ؕ— وَاِنَّ لِلْمُتَّقِیْنَ لَحُسْنَ مَاٰبٍ ۟ۙ

४९. हा उपदेश आहे आणि विश्वास करा की नेक सदाचारी लोकांसाठी सर्वांत उत्तम स्थान आहे. info
التفاسير:

external-link copy
50 : 38

جَنّٰتِ عَدْنٍ مُّفَتَّحَةً لَّهُمُ الْاَبْوَابُ ۟ۚ

५०. अर्थात सदैव काळ राहणारी जन्नत, ज्यांची दारे त्यांच्यासाठी खुली आहेत. info
التفاسير:

external-link copy
51 : 38

مُتَّكِـِٕیْنَ فِیْهَا یَدْعُوْنَ فِیْهَا بِفَاكِهَةٍ كَثِیْرَةٍ وَّشَرَابٍ ۟

५१. ज्यांच्यात ते (मोठ्या चैनीने) तक्के लावून बसले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे मेवे (फळे) आणि अनेक प्रकारची पेये मागत असतील. info
التفاسير:

external-link copy
52 : 38

وَعِنْدَهُمْ قٰصِرٰتُ الطَّرْفِ اَتْرَابٌ ۟

५२. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या समवयस्क हूर (पऱ्या) असतील. info
التفاسير:

external-link copy
53 : 38

هٰذَا مَا تُوْعَدُوْنَ لِیَوْمِ الْحِسَابِ ۟

५३. हीच ती गोष्ट जिचा वायदा तुम्हाला हिशोबाच्या दिवसाकरिता दिला जात होता. info
التفاسير:

external-link copy
54 : 38

اِنَّ هٰذَا لَرِزْقُنَا مَا لَهٗ مِنْ نَّفَادٍ ۟ۚۖ

५४. निःसंशय, ही आजिविका, आमचा (विशेष) उपहार आहे, जी कधीही संपणार नाही. info
التفاسير:

external-link copy
55 : 38

هٰذَا ؕ— وَاِنَّ لِلطّٰغِیْنَ لَشَرَّ مَاٰبٍ ۟ۙ

५५. हा तर झाला मोबदला (लक्षात ठेवा की) विद्रोही लोकांकरिता मोठे वाईट स्थान आहे. info
التفاسير:

external-link copy
56 : 38

جَهَنَّمَ ۚ— یَصْلَوْنَهَا ۚ— فَبِئْسَ الْمِهَادُ ۟

५६. जहन्नम आहे, ज्यात ते दाखल होतील (अरेरे!) किती वाईट बिछोना आहे. info
التفاسير:

external-link copy
57 : 38

هٰذَا ۙ— فَلْیَذُوْقُوْهُ حَمِیْمٌ وَّغَسَّاقٌ ۟ۙ

५७. हे आहे, त्यांनी ते चाखावे, गरम (उकळते) पाणी आणि पू. info
التفاسير:

external-link copy
58 : 38

وَّاٰخَرُ مِنْ شَكْلِهٖۤ اَزْوَاجٌ ۟ؕ

५८. आणि काही इतर प्रकारच्या शिक्षा. info
التفاسير:

external-link copy
59 : 38

هٰذَا فَوْجٌ مُّقْتَحِمٌ مَّعَكُمْ ۚ— لَا مَرْحَبًا بِهِمْ ؕ— اِنَّهُمْ صَالُوا النَّارِ ۟

५९. हा एक समुदाय आहे, जो तुमच्यासोबत (आगीत) जाणार आहे. त्यांच्यासाठी कसलीही स्वागत नाही. हेच जहन्नममध्ये जाणार आहेत. info
التفاسير:

external-link copy
60 : 38

قَالُوْا بَلْ اَنْتُمْ ۫— لَا مَرْحَبًا بِكُمْ ؕ— اَنْتُمْ قَدَّمْتُمُوْهُ لَنَا ۚ— فَبِئْسَ الْقَرَارُ ۟

६०. (ते) म्हणतील की, किंबहुना तुम्हीच ते आहात ज्यांच्यासाठी कसलेही स्वागत नाही. तुम्हीच तर यास आधीपासूनच आमच्यासमोर आणून ठेवले होते. तेव्हा राहण्याचे मोठे वाईट स्थान आहे. info
التفاسير:

external-link copy
61 : 38

قَالُوْا رَبَّنَا مَنْ قَدَّمَ لَنَا هٰذَا فَزِدْهُ عَذَابًا ضِعْفًا فِی النَّارِ ۟

६१. (ते) म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! ज्याने ती (कुप्रची प्रथा) आमच्यासाठी सर्वांत प्रथम सुरू केली असेल, त्याच्यासाठी जहन्नमची शिक्षा दुप्पट कर. info
التفاسير: