Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

external-link copy
156 : 3

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَكُوْنُوْا كَالَّذِیْنَ كَفَرُوْا وَقَالُوْا لِاِخْوَانِهِمْ اِذَا ضَرَبُوْا فِی الْاَرْضِ اَوْ كَانُوْا غُزًّی لَّوْ كَانُوْا عِنْدَنَا مَا مَاتُوْا وَمَا قُتِلُوْا ۚ— لِیَجْعَلَ اللّٰهُ ذٰلِكَ حَسْرَةً فِیْ قُلُوْبِهِمْ ؕ— وَاللّٰهُ یُحْیٖ وَیُمِیْتُ ؕ— وَاللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ بَصِیْرٌ ۟

१५६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, जे कृतघ्न झाले, आणि त्यांच्या बांधवांबद्दल, जेव्हा ते जमिनीवर प्रवासाला किंवा जिहादकरिता निघाले, तेव्हा म्हणाले की जर ते आमच्याजवळ राहिले असते तर मेले नसते, ना मारले गेले असते१ (त्यांच्या या विचाराचे कारण हे आहे की) अल्लाहने त्यांच्या मनात हळहळ निर्माण करावी. जीवन आणि मृत्यु केवळ अल्लाहच्या अवाख्यात आहे, आणि अल्लाह तुमच्या सर्व कर्मांना पाहत आहे. info

(१) ईमानधारकांना, इन्कारी व ढोंगी मुसलमानांसारखे ईमान राखण्यास मनाई केली जात आहे, कारण असे ईमान भेकडपणाचे लक्षण आहे. याउलट जेव्हा अटळ विश्वास असावा की जीवन-मृत्यु अल्लाहच्याच हाती आहे, तसेच मृत्युची वेळही निर्धारीत आहे, तर अशाने माणसाच्या अंगी निश्चय धैर्य आणि अल्लाहच्या मार्गात संघर्ष करण्याची भावना निर्माण होते.

التفاسير: