Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

Lambar shafi:close

external-link copy
21 : 24

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَتَّبِعُوْا خُطُوٰتِ الشَّیْطٰنِ ؕ— وَمَنْ یَّتَّبِعْ خُطُوٰتِ الشَّیْطٰنِ فَاِنَّهٗ یَاْمُرُ بِالْفَحْشَآءِ وَالْمُنْكَرِ ؕ— وَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكُمْ وَرَحْمَتُهٗ مَا زَكٰی مِنْكُمْ مِّنْ اَحَدٍ اَبَدًا ۙ— وَّلٰكِنَّ اللّٰهَ یُزَكِّیْ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَاللّٰهُ سَمِیْعٌ عَلِیْمٌ ۟

२१. हे ईमान राखणाऱ्यांनो! सैतानाच्या पाऊलखुणांवर चालू नका, जो मनुष्य सैतानाच्या पाऊलखुणांवर चालेल, तर तो निर्लज्जता आणि वाईट कामांचाच आदेश देईल आणि जर अल्लाहची दया- कृपा तुमच्यावर नसती तर तुमच्यापैकी कोणीही, कधीही स्वच्छ- शुद्ध झाला नसता. परंतु अल्लाह ज्याला पाक (स्वच्छ-शुद्ध) करू इच्छितो, करतो. आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 24

وَلَا یَاْتَلِ اُولُوا الْفَضْلِ مِنْكُمْ وَالسَّعَةِ اَنْ یُّؤْتُوْۤا اُولِی الْقُرْبٰی وَالْمَسٰكِیْنَ وَالْمُهٰجِرِیْنَ فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ ۪ۖ— وَلْیَعْفُوْا وَلْیَصْفَحُوْا ؕ— اَلَا تُحِبُّوْنَ اَنْ یَّغْفِرَ اللّٰهُ لَكُمْ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

२२. आणि तुमच्यापैकी जे लोक मोठे आणि संपन्न अवस्था राखणारे आहेत त्यांनी अशी शपथ घेऊ नये की आपल्या जवळच्या नातेवाईकांची आणि गोरगरिबांची आणि अल्लाहच्या मार्गात देशत्याग करणाऱ्यांची मदत करणार नाही, किंबहुना माफ केले पाहिजे आणि तहे दिल पाहिजे. काय तुम्ही नाही इच्छित की अल्लाहने तुमचे अपराध (चुका) माफ करावेत. आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 24

اِنَّ الَّذِیْنَ یَرْمُوْنَ الْمُحْصَنٰتِ الْغٰفِلٰتِ الْمُؤْمِنٰتِ لُعِنُوْا فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ ۪— وَلَهُمْ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟ۙ

२३. जे लोक सत्शील भोळ्या-भाबड्या ईमानधारक स्त्रियांवर आरोप ठेवतात, ते या जगात आणि आखिरतमध्ये धिःक्कारले जाणारे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी अतिशय कठोर शिक्षा-यातना आहे. info
التفاسير:

external-link copy
24 : 24

یَّوْمَ تَشْهَدُ عَلَیْهِمْ اَلْسِنَتُهُمْ وَاَیْدِیْهِمْ وَاَرْجُلُهُمْ بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

२४. जेव्हा त्यांच्या समक्ष त्यांच्या जीभा आणि त्यांचे हात-पाय, त्यांनी केलेल्या कर्मांची साक्ष देतील. info
التفاسير:

external-link copy
25 : 24

یَوْمَىِٕذٍ یُّوَفِّیْهِمُ اللّٰهُ دِیْنَهُمُ الْحَقَّ وَیَعْلَمُوْنَ اَنَّ اللّٰهَ هُوَ الْحَقُّ الْمُبِیْنُ ۟

२५. त्या दिवशी अल्लाह त्यांना पुरेपूर मोबदला सत्य आणि न्यायासह प्रदान करेल आणि ते जाणून घेतील की अल्लाहच सत्य आहे, तोच जाहीर करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
26 : 24

اَلْخَبِیْثٰتُ لِلْخَبِیْثِیْنَ وَالْخَبِیْثُوْنَ لِلْخَبِیْثٰتِ ۚ— وَالطَّیِّبٰتُ لِلطَّیِّبِیْنَ وَالطَّیِّبُوْنَ لِلطَّیِّبٰتِ ۚ— اُولٰٓىِٕكَ مُبَرَّءُوْنَ مِمَّا یَقُوْلُوْنَ ؕ— لَهُمْ مَّغْفِرَةٌ وَّرِزْقٌ كَرِیْمٌ ۟۠

२६. अशुद्ध घाणेरड्या स्त्रिया अशुद्ध घाणेरड्या पुरुषांच्या योग्य आहेत, आणि अशुद्ध घाणेरडे पुरुष अशुद्ध घाणेरड्या स्त्रियांच्या योग्य आहेत, आणि स्वच्छ- शुद्ध स्त्रिया, स्वच्छ- शुद्ध पुरुषांच्या लायक आहेत आणि स्वच्छ- शुद्ध पुरुष स्वच्छ- शुद्ध स्त्रियांच्या योग्य आहेत. अशा पवित्र, स्वच्छ- शुद्ध लोकांविषयी जी काही वाह्यात बडबड हे (आरोप ठेवणारे) करीत आहेत, ते त्यापासून निर्दोष आहेत. त्यांच्यासाठी क्षमा आहे, आणि मोठी सन्मानपूर्ण आजिविका आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 24

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَدْخُلُوْا بُیُوْتًا غَیْرَ بُیُوْتِكُمْ حَتّٰی تَسْتَاْنِسُوْا وَتُسَلِّمُوْا عَلٰۤی اَهْلِهَا ؕ— ذٰلِكُمْ خَیْرٌ لَّكُمْ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُوْنَ ۟

२७. हे ईमान राखणाऱ्यांनो आपल्या घरांखेरीज दुसऱ्यांच्या घरात जाऊ नका, जोपर्यंत (आत येण्याची) परवानगी न घ्याल आणि तिथल्या राहणाऱ्यांना सलाम न कराल. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे, यासाठी की तुम्ही बोध प्राप्त करावा. info
التفاسير: