(१) अर्थात अल्लाहच्या माफीस पात्र होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. कुप्र आणि शिर्कपासून पश्चात्ताप (तौबा) ईमान, नेकीचेकाम आणि सत्य-मार्गावर चालत राहणे अर्थात सन्मार्गावर चालत असताना त्याला मरण यावे. अन्यथा उघड आहे की क्षमा याचना व ईमान नंतर त्याने शिर्क आणि कुप्र मार्ग पत्करला, येथपावेतो की तो त्याच अवस्थेत मरण पावला तर अल्लाहची माफी लाभण्याऐवजी तो अल्लाहच्या प्रकोपास व शिक्षा यातनेस पात्र ठरेल.