Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

external-link copy
253 : 2

تِلْكَ الرُّسُلُ فَضَّلْنَا بَعْضَهُمْ عَلٰی بَعْضٍ ۘ— مِنْهُمْ مَّنْ كَلَّمَ اللّٰهُ وَرَفَعَ بَعْضَهُمْ دَرَجٰتٍ ؕ— وَاٰتَیْنَا عِیْسَی ابْنَ مَرْیَمَ الْبَیِّنٰتِ وَاَیَّدْنٰهُ بِرُوْحِ الْقُدُسِ ؕ— وَلَوْ شَآءَ اللّٰهُ مَا اقْتَتَلَ الَّذِیْنَ مِنْ بَعْدِهِمْ مِّنْ بَعْدِ مَا جَآءَتْهُمُ الْبَیِّنٰتُ وَلٰكِنِ اخْتَلَفُوْا فَمِنْهُمْ مَّنْ اٰمَنَ وَمِنْهُمْ مَّنْ كَفَرَ ؕ— وَلَوْ شَآءَ اللّٰهُ مَا اقْتَتَلُوْا ۫— وَلٰكِنَّ اللّٰهَ یَفْعَلُ مَا یُرِیْدُ ۟۠

२५३. हे सर्व रसूल (पैगंबर) आहेत, ज्यांच्यापैकी आम्ही काहींना, काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे. त्यांच्यापैकी काहींशी सर्वश्रेष्ठ अल्लाहने संभाषण केले आहे, आणि काहींचा दर्जा उंचाविला आहे आणि आम्ही मरियमचे पुत्र ईसा यांना चमत्कार (मोजिजा) प्रदान केला आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांना समर्थन दिले१ अल्लाहने इच्छिले असते तर त्यांच्यानंतर आलेले लोक, स्पष्ट निशाण्या येऊन पोहोचल्यावरही आपसात लढले नसते. परंतु त्या लोकांनी मतभेद केला. त्यांच्यापैकी काहींनी ईमान राखले आणि काही काफिर (इन्कारी) झाले आणि अल्लाहने इच्छिले असते तर हे आपसात लढले नसते, परंतु अल्लाह जे काही इच्छितो ते करतो. info

(१) ‘मोजिजा’ म्हणजे अल्लाहने केलेले चमत्कार जे हजरत ईसा यांना प्रदान केले गेले होते. उदा. मृताला जिवंत करणे वगैरे. ज्याचे स्पष्टीकरण सूरह आले इमरानमध्ये येईल. ‘पवित्र आत्म्या’शी अभिप्रेत जिब्रील होय, जसे की पूर्वीही उल्लेख आला आहे.

التفاسير: