Fassarar Ma'anonin Alqura'ni - Fassara AlMaratiyah - Muhammad Shafi' Al’ansari

Lambar shafi:close

external-link copy
77 : 2

اَوَلَا یَعْلَمُوْنَ اَنَّ اللّٰهَ یَعْلَمُ مَا یُسِرُّوْنَ وَمَا یُعْلِنُوْنَ ۟

७७. काय यांना हे नाही माहीत की सर्वश्रेष्ठ अल्लाह त्याच्या लपलेल्या व उघड अशा सर्वच गोष्टी जाणतो. info
التفاسير:

external-link copy
78 : 2

وَمِنْهُمْ اُمِّیُّوْنَ لَا یَعْلَمُوْنَ الْكِتٰبَ اِلَّاۤ اَمَانِیَّ وَاِنْ هُمْ اِلَّا یَظُنُّوْنَ ۟

७८. आणि त्यांच्यापैकी काही अशिक्षित असेही आहेत, जे आशा-अपेक्षांशिवाय ग्रंथास जाणत नाहीत आणि केवळ काल्पनिक गोष्टी करतात. info
التفاسير:

external-link copy
79 : 2

فَوَیْلٌ لِّلَّذِیْنَ یَكْتُبُوْنَ الْكِتٰبَ بِاَیْدِیْهِمْ ۗ— ثُمَّ یَقُوْلُوْنَ هٰذَا مِنْ عِنْدِ اللّٰهِ لِیَشْتَرُوْا بِهٖ ثَمَنًا قَلِیْلًا ؕ— فَوَیْلٌ لَّهُمْ مِّمَّا كَتَبَتْ اَیْدِیْهِمْ وَوَیْلٌ لَّهُمْ مِّمَّا یَكْسِبُوْنَ ۟

७९. त्या लोकांसाठी विनाश आहे, जे स्वतः आपल्या हातांनी लिहिलेल्या ग्रंथास अल्लाहचा ग्रंथ म्हणतात. आणि अशा प्रकारे या जगाची कमाई करतात. आपल्या हातांनी लिहिण्यामुळे त्यांचा सर्वनाश आहे आणि आपल्या या कमाईमुळे त्यांचा विनाश आहे. info
التفاسير:

external-link copy
80 : 2

وَقَالُوْا لَنْ تَمَسَّنَا النَّارُ اِلَّاۤ اَیَّامًا مَّعْدُوْدَةً ؕ— قُلْ اَتَّخَذْتُمْ عِنْدَ اللّٰهِ عَهْدًا فَلَنْ یُّخْلِفَ اللّٰهُ عَهْدَهٗۤ اَمْ تَقُوْلُوْنَ عَلَی اللّٰهِ مَا لَا تَعْلَمُوْنَ ۟

८०. आणि हे लोक म्हणतात की आम्ही तर काही मोजके दिवस जहन्नममध्ये राहू, (त्यांना) सांगा की, काय तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून एखादे वचन घेतले आहे जर घेतले आहे तर खात्रीने सर्वश्रेष्ठ अल्लाह आपल्या वचनाचा भंग करणार नाही किंवा तुम्ही अल्लाहच्या संबंधाने अशा गोष्टी सांगता ज्या तुम्ही जाणत नाही. info
التفاسير:

external-link copy
81 : 2

بَلٰی مَنْ كَسَبَ سَیِّئَةً وَّاَحَاطَتْ بِهٖ خَطِیْٓـَٔتُهٗ فَاُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ النَّارِ ۚ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟

८१. निःसंशय, ज्यानेदेखील अपराध केला आणि त्याच्या अपराधाने त्याला घेरले तो जहन्नमी आहे. तो नेहमीकरिता जहन्नममध्ये राहील. info
التفاسير:

external-link copy
82 : 2

وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ اُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ الْجَنَّةِ ۚ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟۠

८२. आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, ते जन्नती आहेत. ते नेहमीकरिता जन्नतमध्ये राहतील. info
التفاسير:

external-link copy
83 : 2

وَاِذْ اَخَذْنَا مِیْثَاقَ بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ لَا تَعْبُدُوْنَ اِلَّا اللّٰهَ ۫— وَبِالْوَالِدَیْنِ اِحْسَانًا وَّذِی الْقُرْبٰی وَالْیَتٰمٰی وَالْمَسٰكِیْنِ وَقُوْلُوْا لِلنَّاسِ حُسْنًا وَّاَقِیْمُوا الصَّلٰوةَ وَاٰتُوا الزَّكٰوةَ ؕ— ثُمَّ تَوَلَّیْتُمْ اِلَّا قَلِیْلًا مِّنْكُمْ وَاَنْتُمْ مُّعْرِضُوْنَ ۟

८३. आणि जेव्हा आम्ही इस्राईलच्या पुत्रांकडून वचन घेतले की तुम्ही अल्लाहच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही भक्ती-उपासना करू नका आणि आई-बापाशी चांगले वर्तन राखा आणि त्याचप्रमाणे जवळचे नातेवाईक, अनाथ आणि गरीब लोकांशी सद्‌व्यवहार करा आणि लोकांना चांगल्या- भल्या गोष्टी सांगा. नमाज कायम करा आणि जकात (कर्तव्य दान) देत राहा. परंतु काही लोक वगळता, तुम्ही सर्व मुकरले आणि तोंड फिरविले. info
التفاسير: