Übersetzung der Bedeutungen von dem heiligen Quran - Marathi-Übersetzung - Muhammad Shafi Ansari

Nummer der Seite:close

external-link copy
96 : 7

وَلَوْ اَنَّ اَهْلَ الْقُرٰۤی اٰمَنُوْا وَاتَّقَوْا لَفَتَحْنَا عَلَیْهِمْ بَرَكٰتٍ مِّنَ السَّمَآءِ وَالْاَرْضِ وَلٰكِنْ كَذَّبُوْا فَاَخَذْنٰهُمْ بِمَا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟

९६. आणि जर त्या शहरांच्या रहिवाशींनी ईमान राखले असते आणि अल्लाहचे भय राखून आचरण केले असते तर आम्ही त्यांच्याकरिता आकाश व जमिनीच्या समृद्धीचे दरवाजे उघडले असते. परंतु त्यांनी खोटे ठरविले, तेव्हा आम्ही त्यांना त्यांच्या दुराचारापायी धरले. info
التفاسير:

external-link copy
97 : 7

اَفَاَمِنَ اَهْلُ الْقُرٰۤی اَنْ یَّاْتِیَهُمْ بَاْسُنَا بَیَاتًا وَّهُمْ نَآىِٕمُوْنَ ۟ؕ

९७. काय तरीही या वस्त्यांचे रहिवाशी या गोष्टीपासून निश्चिंत झाले की त्यांच्यावर आमचा अज़ाब रात्रीच्या वेळी येऊन कोसळावा, ज्या वेळी ते झोपेत असावेत. info
التفاسير:

external-link copy
98 : 7

اَوَاَمِنَ اَهْلُ الْقُرٰۤی اَنْ یَّاْتِیَهُمْ بَاْسُنَا ضُحًی وَّهُمْ یَلْعَبُوْنَ ۟

९८. आणि काय त्या वस्त्यांचे रहिवाशी या गोष्टीपासून बेफिकीर झाले आहेत की त्यांच्यावर आमचा अज़ाब दिवस चढता यावा, ज्या वेळी ते खेळ-तमाशात मग्न असावेत. info
التفاسير:

external-link copy
99 : 7

اَفَاَمِنُوْا مَكْرَ اللّٰهِ ۚ— فَلَا یَاْمَنُ مَكْرَ اللّٰهِ اِلَّا الْقَوْمُ الْخٰسِرُوْنَ ۟۠

९९. काय ते अल्लाहच्या योजनेपासून निडर झालेत? तर अल्लाहच्या योजनेपासून नुकसान भोगणारेच निडर होतात.१ info

(१) या आयतीमध्ये अल्लाहने सर्वांत प्रथम हे सांगितले आहे की ईमान (श्रद्धा) आणि तकवा (अल्लाहचे भय राखून केलेले आचरण) ही अशी बाब आहे की ज्या वस्तीचे लोक तिचा अंगिकार करतील तर त्या वस्तीवर अल्लाह आकाश व धरतीचे सुख-समृद्धीचे, धन-संपत्तीचे दरवाजे उघडतो. अर्थात गरजेनुसार आकाशातून पाऊस पाडतो आणि जमिनीला त्याद्वारे सिंचित करून शेतीचे उत्पन्न वाढवितो, परिणामी विकास आणि संपन्न अवस्था उदयास येते. याउलट खोटे ठरविणारे आणि अल्लाहचा इन्कार करण्याचा मार्ग पत्करणारे जनसमूह अल्लाहच्या प्रकोपास पात्र ठरतात, मग रात्री किंवा दिवसा केव्हा प्रकोप कोसळेल हे कळून येत नाही, परिणामी सुखा-समाधानाने आबाद असलेली वस्ती एका क्षणात निर्जन व नामशेष होते. यास्तव अल्लाहच्या प्रकोपापासून निर्धास्त राहू नये. या बेफिकीरीचा परिणाम फक्त विनाश आहे. याखेरीज आणखी काही नाही.

التفاسير:

external-link copy
100 : 7

اَوَلَمْ یَهْدِ لِلَّذِیْنَ یَرِثُوْنَ الْاَرْضَ مِنْ بَعْدِ اَهْلِهَاۤ اَنْ لَّوْ نَشَآءُ اَصَبْنٰهُمْ بِذُنُوْبِهِمْ ۚ— وَنَطْبَعُ عَلٰی قُلُوْبِهِمْ فَهُمْ لَا یَسْمَعُوْنَ ۟

१००. तर काय जे लोक धरतीत, तिच्या रहिवाशांच्या विनाशानंतर वारस बनले आहेत, त्यांना हे माहीत झाले नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांपायी त्यांना संकटात टाकू आणि त्यांच्या मनांवर मोहर लावू मग ते ऐकू न शकावेत. info
التفاسير:

external-link copy
101 : 7

تِلْكَ الْقُرٰی نَقُصُّ عَلَیْكَ مِنْ اَنْۢبَآىِٕهَا ۚ— وَلَقَدْ جَآءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَیِّنٰتِ ۚ— فَمَا كَانُوْا لِیُؤْمِنُوْا بِمَا كَذَّبُوْا مِنْ قَبْلُ ؕ— كَذٰلِكَ یَطْبَعُ اللّٰهُ عَلٰی قُلُوْبِ الْكٰفِرِیْنَ ۟

१०१. या शहरांच्या काही घटना आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि त्यांचे पैगंबर त्यांच्याजवळ प्रमाणासह आले, तरीही ज्याला त्यांनी अगोदर मानले नाही त्याला नंतर मानण्यायोग्य झाले नाहीत. अशा प्रकारे अल्लाह इन्कारी लोकांच्या हृदयांवर मोहर लावून देतो. info
التفاسير:

external-link copy
102 : 7

وَمَا وَجَدْنَا لِاَكْثَرِهِمْ مِّنْ عَهْدٍ ۚ— وَاِنْ وَّجَدْنَاۤ اَكْثَرَهُمْ لَفٰسِقِیْنَ ۟

१०२. आणि आम्हाला त्यांच्यातले अधिकांश लोक वचनाचे पालन करताना आढळले नाहीत, आणि आम्हाला त्यांच्यातले अधिकांश लोक दुराचारी दिसले. info
التفاسير:

external-link copy
103 : 7

ثُمَّ بَعَثْنَا مِنْ بَعْدِهِمْ مُّوْسٰی بِاٰیٰتِنَاۤ اِلٰی فِرْعَوْنَ وَمَلَاۡىِٕهٖ فَظَلَمُوْا بِهَا ۚ— فَانْظُرْ كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُفْسِدِیْنَ ۟

१०३. मग त्यांच्यानंतर आम्ही (पैगंबर) मूसा यांना आपल्या निशाण्यांसह फिरऔन आणि त्याच्या सरदारांजवळ पाठविले तर त्यांनी त्या निशाण्यांचा हक्क अदा केला नाही. मग पाहा, दुराचारी लोकांचा कसा शेवट झाला! info
التفاسير:

external-link copy
104 : 7

وَقَالَ مُوْسٰی یٰفِرْعَوْنُ اِنِّیْ رَسُوْلٌ مِّنْ رَّبِّ الْعٰلَمِیْنَ ۟ۙ

१०४. आणि मूसा म्हणाले, हे फिरऔन! मी साऱ्या जगाच्या पालनकर्त्यातर्फे पैगंबर आहे. info
التفاسير: