Qurani Kərimin mənaca tərcüməsi - Marat dilinə tərcümə - Məhəmməd Şəfi Ənsari.

əl-Cinn

external-link copy
1 : 72

قُلْ اُوْحِیَ اِلَیَّ اَنَّهُ اسْتَمَعَ نَفَرٌ مِّنَ الْجِنِّ فَقَالُوْۤا اِنَّا سَمِعْنَا قُرْاٰنًا عَجَبًا ۟ۙ

१. (हे मुहम्मद स.) तुम्ही सांगा की मला वहयी (प्रकाशना) केली गेली आहे की जिन्नांच्या एका समूहाने (कुरआन) ऐकले आणि म्हटले की आम्ही मोठे आश्चर्यकारक कुरआन ऐकले आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 72

یَّهْدِیْۤ اِلَی الرُّشْدِ فَاٰمَنَّا بِهٖ ؕ— وَلَنْ نُّشْرِكَ بِرَبِّنَاۤ اَحَدًا ۟ۙ

२. जो सत्य मार्ग दाखवितो आम्ही तर त्यावर ईमान राखले, (आता) आम्ही कधीही आपल्या पालनकर्त्याचा दुसऱ्या एखाद्याला सहभागी बनविणार नाही. info
التفاسير:

external-link copy
3 : 72

وَّاَنَّهٗ تَعٰلٰی جَدُّ رَبِّنَا مَا اتَّخَذَ صَاحِبَةً وَّلَا وَلَدًا ۟ۙ

३. आणि निःसंशय, आमच्या पालनकर्त्याची शान (महानता) अति उच्च आहे, त्याने ना कोणाला (आपली) पत्नी बनविले आहे आणि ना संतती. info
التفاسير:

external-link copy
4 : 72

وَّاَنَّهٗ كَانَ یَقُوْلُ سَفِیْهُنَا عَلَی اللّٰهِ شَطَطًا ۟ۙ

४. आणि निःसंशय, आमच्यातला मूर्ख, अल्लाहविषयी खोट्या गोष्टी बोलत होता. info
التفاسير:

external-link copy
5 : 72

وَّاَنَّا ظَنَنَّاۤ اَنْ لَّنْ تَقُوْلَ الْاِنْسُ وَالْجِنُّ عَلَی اللّٰهِ كَذِبًا ۟ۙ

५. आणि आम्ही तर हेच समजत राहिलो की मनुष्य आणि जिन्न अल्लाहविषयी कधीही खोटे बोलणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
6 : 72

وَّاَنَّهٗ كَانَ رِجَالٌ مِّنَ الْاِنْسِ یَعُوْذُوْنَ بِرِجَالٍ مِّنَ الْجِنِّ فَزَادُوْهُمْ رَهَقًا ۟ۙ

६. वस्तुतः काही माणसे, काही जिन्नांकडे शरण मागत होते, ज्यामुळे जिन्नांच्या उदंडतेत अधिकच भर पडली. info
التفاسير:

external-link copy
7 : 72

وَّاَنَّهُمْ ظَنُّوْا كَمَا ظَنَنْتُمْ اَنْ لَّنْ یَّبْعَثَ اللّٰهُ اَحَدًا ۟ۙ

७. आणि (मानवां) नी देखील जिन्नांप्रमाणे हे गृहीत धरले होते की अल्लाह कधीही कोणाला पाठविणार नाही (किंवा कोणाला दुसऱ्यांदा जिवंत करणार नाही). info
التفاسير:

external-link copy
8 : 72

وَّاَنَّا لَمَسْنَا السَّمَآءَ فَوَجَدْنٰهَا مُلِئَتْ حَرَسًا شَدِیْدًا وَّشُهُبًا ۟ۙ

८. आणि आम्ही आकाशाचे निरीक्षण करून पाहिले तेव्हा ते सक्त पहारेकऱ्यांनी आणि प्रखर अग्नि-शिखांनी (ज्वालांनी) भरलेले आढळले. info
التفاسير:

external-link copy
9 : 72

وَّاَنَّا كُنَّا نَقْعُدُ مِنْهَا مَقَاعِدَ لِلسَّمْعِ ؕ— فَمَنْ یَّسْتَمِعِ الْاٰنَ یَجِدْ لَهٗ شِهَابًا رَّصَدًا ۟ۙ

९. आणि याच्यापूर्वी आम्ही गोष्टी (बोलणे) ऐकण्याकरिता आकाशात ठिकठिकाणी बसत असू, आता जो देखील कान लावतो, त्याला एक ज्वाला आपल्यावर टपून असल्याचे आढळते. info
التفاسير:

external-link copy
10 : 72

وَّاَنَّا لَا نَدْرِیْۤ اَشَرٌّ اُرِیْدَ بِمَنْ فِی الْاَرْضِ اَمْ اَرَادَ بِهِمْ رَبُّهُمْ رَشَدًا ۟ۙ

१०. आणि आम्ही नाही जाणत की धरतीवर राहणाऱ्यांशी एखाद्या वाईट गोष्टीचा इरादा केला गेला आहे की त्यांच्या पालनकर्त्याचा इरादा त्यांच्याशी भलाईचा आहे. info
التفاسير:

external-link copy
11 : 72

وَّاَنَّا مِنَّا الصّٰلِحُوْنَ وَمِنَّا دُوْنَ ذٰلِكَ ؕ— كُنَّا طَرَآىِٕقَ قِدَدًا ۟ۙ

११. आणि हे की (निःसंशय) आमच्यापैकी काही तर नेक सदाचारी आहेत आणि काही त्याच्या विपरीत आहेत. आम्ही अनेक प्रकारे विभागलेलो आहोत. info
التفاسير:

external-link copy
12 : 72

وَّاَنَّا ظَنَنَّاۤ اَنْ لَّنْ نُّعْجِزَ اللّٰهَ فِی الْاَرْضِ وَلَنْ نُّعْجِزَهٗ هَرَبًا ۟ۙ

१२. आणि आम्हाला (आता) पूर्ण खात्री झाली की आम्ही अल्लाहला धरतीत कधीही विवश करू शकत नाही आणि ना आम्ही पळून जाऊन त्याला परास्त करू शकतो. info
التفاسير:

external-link copy
13 : 72

وَّاَنَّا لَمَّا سَمِعْنَا الْهُدٰۤی اٰمَنَّا بِهٖ ؕ— فَمَنْ یُّؤْمِنْ بِرَبِّهٖ فَلَا یَخَافُ بَخْسًا وَّلَا رَهَقًا ۟ۙ

१३. आणि आम्ही मार्गदर्शनाची गोष्ट ऐकताच तिच्यावर ईमान राखले आणि जो देखील आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखेल, त्याला ना एखाद्या हानीचे भय आहे ना अत्याचारा (व दुःखा) चे. info
التفاسير: