Qurani Kərimin mənaca tərcüməsi - Marat dilinə tərcümə - Məhəmməd Şəfi Ənsari.

Səhifənin rəqəmi: 51:50 close

external-link copy
16 : 3

اَلَّذِیْنَ یَقُوْلُوْنَ رَبَّنَاۤ اِنَّنَاۤ اٰمَنَّا فَاغْفِرْ لَنَا ذُنُوْبَنَا وَقِنَا عَذَابَ النَّارِ ۟ۚ

१६. जे असे म्हणतात की, हे आमच्या पालनर्त्या! आम्ही ईमान राखले, यास्तव आमच्या अपराधांना क्षमा कर आणि आम्हाला आगीच्या अज़ाब (शिक्षा-यातने) पासून वाचव. info
التفاسير:

external-link copy
17 : 3

اَلصّٰبِرِیْنَ وَالصّٰدِقِیْنَ وَالْقٰنِتِیْنَ وَالْمُنْفِقِیْنَ وَالْمُسْتَغْفِرِیْنَ بِالْاَسْحَارِ ۟

१७. जे धीर-संयम राखणारे, आणि सच्चे-प्रामाणिक व आज्ञाधारक आणि अल्लाहच्या मार्गात धन खर्च करणारे आहेत आणि रात्रीच्या अखेरच्या भागात (मोक्ष प्राप्तीकरिता) क्षमा-याचना करणारे आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 3

شَهِدَ اللّٰهُ اَنَّهٗ لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۙ— وَالْمَلٰٓىِٕكَةُ وَاُولُوا الْعِلْمِ قَآىِٕمًا بِالْقِسْطِ ؕ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟ؕ

१८. अल्लाह, त्याचे फरिश्ते आणि ज्ञानी विद्वानांनी साक्ष दिली आहे की अल्लाहशिवाय कोणीही माबूद (उपासना करण्यायोग्य) नाही, तो न्यायाला कायम राखणारा आहे, तोच जबरदस्त हिकमत राखणारा आहे. त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 3

اِنَّ الدِّیْنَ عِنْدَ اللّٰهِ الْاِسْلَامُ ۫— وَمَا اخْتَلَفَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ اِلَّا مِنْ بَعْدِ مَا جَآءَهُمُ الْعِلْمُ بَغْیًا بَیْنَهُمْ ؕ— وَمَنْ یَّكْفُرْ بِاٰیٰتِ اللّٰهِ فَاِنَّ اللّٰهَ سَرِیْعُ الْحِسَابِ ۟

१९. निःसंशय, अल्लाहच्या जवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे.१ (अल्लाहकरिता परिपूर्ण आत्मसमर्पण) आणि ज्यांना ग्रंथ दिला गेला, त्यांनी ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-मत्सरामुळे मतभेद केला आणि जो अल्लाहच्या आयतींना (पवित्र कुरआनाला) न मानेल तर अल्लाह लवकरच हिशोब घेईल. info

(१) इस्लाम तोच दीन-धर्म आहे, ज्याचा प्रचार-प्रसार आणि शिकवण प्रत्येक पैगंबर आपापल्या काळात देत राहिले आणि आता तो परिपूर्ण स्वरूपात आहे, जो अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यांनी जगासमोर प्रस्तुत केला आहे. ज्यात एकेश्वरवाद (तौहीद), रिसालत (प्रेषित्व) आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) वर अशा प्रकारे अटळ विश्वास राखायचा आहे जसा पैगंबर (स.) यांनी सांगितला आहे. केवळ एकेश्वरवादावर धारणा राखून काही सत्कर्मे पार पाडल्याने इस्लाम साध्य होत नाही आणि ना अशाने आखिरतमध्ये मुक्ती मिळू शकेल. अकीदा (श्रद्धा) आणि दीन (धर्म) तर हा की अल्लाहला एकमेव मानले जावे, केवळ त्याच एक अल्लाहची भक्ती-उपासना केली जावी, हजरत मुहम्मद (स.) यांच्यासमेत इतर सर्व पैगंबरांवर ईमान राखले जावे आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर प्रेषित्व समाप्त झाल्याचे मानले जावे आणि आशेसह ते ईमान व कर्म पार पाडले जावे जे कुरआन आणि पैगंबरांच्या कथनांद्वारे उल्लेखित आहे. आता या इस्लामखेरीज कोणताही दीन-धर्म अल्लाहजवळ स्वीकृत ठरणार नाही.
‘’आणि जो मनुष्य इस्लामला सोडून अन्य एखाद्या धर्माचा शोध घेईल तर त्याचा तो धर्म कबूल केला जाणार नाही आणि आखिरतमध्ये तो नुकसान भोगणाऱ्यांपैकी असेल.’’ (आले इमरान-५८)
‘’सांगा की लोक हो! मी तुम्हा सर्वांकडे अल्लाहचा रसूल (पैगंबर) आहे.’’ (सूरह आराफ-१५८)
‘’मोठा शुभ आणि समृद्धशाली आहे तो (अल्लाह) ज्याने आपल्या दासावर फुर्कान (सत्य व असत्यामधील भेद जाहीर करणारा ग्रंथ) अवतरित केला, यासाठी की जगाला सचेत करावे.’’ (अल फुर्कान-१)

التفاسير:

external-link copy
20 : 3

فَاِنْ حَآجُّوْكَ فَقُلْ اَسْلَمْتُ وَجْهِیَ لِلّٰهِ وَمَنِ اتَّبَعَنِ ؕ— وَقُلْ لِّلَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ وَالْاُمِّیّٖنَ ءَاَسْلَمْتُمْ ؕ— فَاِنْ اَسْلَمُوْا فَقَدِ اهْتَدَوْا ۚ— وَاِنْ تَوَلَّوْا فَاِنَّمَا عَلَیْكَ الْبَلٰغُ ؕ— وَاللّٰهُ بَصِیْرٌ بِالْعِبَادِ ۟۠

२०. जर ते तुमच्याशी भांडण-तंटा करतील तर तुम्ही सांगा की मी आणि माझ्या अनुयायींनी स्वतःला अल्लाहकरिता समर्पित केले आणि तुम्ही ग्रंथधारक व अशिक्षित लोकांना सांगा की काय तुम्ही इस्लामचा स्वीकार केला आहे. जर ते इस्लामचा स्वीकार करतील तर त्यांनी सरळ मार्ग प्राप्त करून घेतला आणि जर तोंड फिरवतील तर तुमची जबाबदारी केवळ (संदेश) पोहचविण्याची आहे, आणि अल्लाह आपल्या दासांना स्वतःच पाहत आहे. info
التفاسير:

external-link copy
21 : 3

اِنَّ الَّذِیْنَ یَكْفُرُوْنَ بِاٰیٰتِ اللّٰهِ وَیَقْتُلُوْنَ النَّبِیّٖنَ بِغَیْرِ حَقٍّ ۙ— وَّیَقْتُلُوْنَ الَّذِیْنَ یَاْمُرُوْنَ بِالْقِسْطِ مِنَ النَّاسِ ۙ— فَبَشِّرْهُمْ بِعَذَابٍ اَلِیْمٍ ۟

२१. निःसंशय, जे लोक अल्लाहच्या आयतींचा इन्कार करतात आणि अल्लाहच्या पैगंबरांची नाहक हत्या करतात आणि जे लोक न्यायाची गोष्ट बोलतात त्यांचीही हत्या करतात, तर (हे पैगंबर!) तुम्ही त्यांना फार मोठ्या अज़ाब (शिक्षा-यातने) ची सूचना द्या. info
التفاسير:

external-link copy
22 : 3

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ حَبِطَتْ اَعْمَالُهُمْ فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ ؗ— وَمَا لَهُمْ مِّنْ نّٰصِرِیْنَ ۟

२२. त्यांची सर्व सत्कर्मे या जगात आणि आखिरतमध्ये वाया गेलीत. आणि त्यांचा कोणीही सहाय्यक (मदत करणारा) नाही. info
التفاسير: