Qurani Kərimin mənaca tərcüməsi - Marat dilinə tərcümə - Məhəmməd Şəfi Ənsari.

Səhifənin rəqəmi:close

external-link copy
89 : 27

مَنْ جَآءَ بِالْحَسَنَةِ فَلَهٗ خَیْرٌ مِّنْهَا ۚ— وَهُمْ مِّنْ فَزَعٍ یَّوْمَىِٕذٍ اٰمِنُوْنَ ۟

८९. जो मनुष्य सत्कर्म घेऊन येईल, त्याला त्याहून चांगला मोबदला मिळेल आणि असे लोक त्या दिवसाच्या दहशतीपासून निर्धास्त असतील. info
التفاسير:

external-link copy
90 : 27

وَمَنْ جَآءَ بِالسَّیِّئَةِ فَكُبَّتْ وُجُوْهُهُمْ فِی النَّارِ ؕ— هَلْ تُجْزَوْنَ اِلَّا مَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟

९०. आणि जे लोक दुष्कर्म घेऊन येतील त्यांना अधोमुखी (जहन्नमच्या) आगीत झोकले जाईल. तुम्हाला केवळ त्याचाच मोबदला दिला जाईल, जे तुम्ही करीत राहिले. info
التفاسير:

external-link copy
91 : 27

اِنَّمَاۤ اُمِرْتُ اَنْ اَعْبُدَ رَبَّ هٰذِهِ الْبَلْدَةِ الَّذِیْ حَرَّمَهَا وَلَهٗ كُلُّ شَیْءٍ ؗ— وَّاُمِرْتُ اَنْ اَكُوْنَ مِنَ الْمُسْلِمِیْنَ ۟ۙ

९१. मला तर केवळ हाच आदेश दिला गेला आहे की मी या शहराच्या पालनकर्त्याची उपासना करीत राहावे, ज्याने यास आदर सन्मानपूर्ण बनविले आहे आणि जो प्रत्येक वस्तूचा स्वामी आहे आणि मला हा आदेशही दिला गेला आहे की मी मुस्लमान (आज्ञाधारकां) पैकी व्हावे. info
التفاسير:

external-link copy
92 : 27

وَاَنْ اَتْلُوَا الْقُرْاٰنَ ۚ— فَمَنِ اهْتَدٰی فَاِنَّمَا یَهْتَدِیْ لِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ ضَلَّ فَقُلْ اِنَّمَاۤ اَنَا مِنَ الْمُنْذِرِیْنَ ۟

९२. आणि मी कुरआनाचे पठण करीत राहावे, तेव्हा जो मार्गदर्शन अंगीकारील, आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर सांगा, मी केवळ सावधान करणाऱ्यांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
93 : 27

وَقُلِ الْحَمْدُ لِلّٰهِ سَیُرِیْكُمْ اٰیٰتِهٖ فَتَعْرِفُوْنَهَا ؕ— وَمَا رَبُّكَ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُوْنَ ۟۠

९३. आणि सांगा, समस्त प्रशंसा अल्लाहकरिताच आहे. तो लवकरच तुम्हाला आपल्या निशाण्या दाखविल, ज्या तुम्ही स्वतः ओळखून घ्याल, आणि जे काही तुम्ही करीत आहात, तुमचा पालनकर्ता त्यापासून अनभिज्ञ (अजाण) नाही. info
التفاسير: