(१) अर्थात जन्नतमध्ये जाणारे प्रत्येक क्षणी अल्लाहची महानता आणि त्याची प्रशंसा करण्यात मग्न असतील, ज्याप्रमाणे हदीसमध्ये उल्लेख आहे.... जन्नतवाल्यांच्या मुखातून अल्लाहची महानता आणि प्रशंसा अशा प्रकारे निघेल, ज्याप्रमाणे श्वास निघतो.
(१) अर्थात हा शिर्क (अनेकेश्वरवाद) लोकांनी स्वतः निर्माण केला आहे आणि सुरुवातीला याचे अस्तित्वही नव्हते, समस्त लोक एकाच दीन (धर्मा) च्या मार्गावर अर्थात इस्लामवर होते, ज्यात तौहीद (एकेश्वरवादा) ला विशेष स्थान आहे. पैगंबर हजरत नूह पर्यंत लोक याच तौहीदच्या मार्गावर चालत राहिले, पुढे त्यांच्यात मतभेद झाले परिणामी काही लोकांनी अल्लाहच्या सोबत इतरांनाही उपास्य आराध्य देवता आणि कष्टिनिवारक (मुश्किल कुशा) मानायला सुरुवात केली.
(१) पहिल्या आयतीत जन्नतमध्ये राहणाऱ्या लोकांचे वर्णन होते. त्यात असे सांगितले गेले की त्यांना आपल्या सत्कर्मांचा मोबदला अनेक पटींनी मिळेल आणि याहून जास्त अल्लाहच्या दर्शनाने सन्मानित होतील. नंतरच्या आयतीत हे सांगितले जात आहे की वाईट कर्माचे फळ त्या कर्माच्या प्रमाणातच मिळेल. अरबीत ‘सिकत’चा अर्थ (अधर्म) आणि शिर्क व इतर दुराचार होय.
(१) अवज्ञाकारी लोकांनंतर अल्लाह आपल्या आज्ञाधारकांबद्दल सांगत आहे अर्थात औलिया अल्लाहबद्दल. औलिया वली (मित्र) चे अनेकवचन आहे. वलीचा मूल अर्थ निकटचा, तेव्हा औलिया अल्लाहचा अर्थ होईल. अल्लाहचे ते सच्चे आणि निःस्वार्थ ईमानधारक ज्यांनी अल्लाहचे आज्ञापालन करून, दुष्कर्मांचा त्याग करून अल्लाहचे जवळीक प्राप्त केले. यास्तव अल्लाहने पुढच्या आयतीत फर्माविले, ज्यांनी ईमान राखले व ज्यांनी अल्लाहचे भय मनात राखले आणि याच दोन्ही गोष्टी अल्लाहचे जवळीक प्राप्त करण्याचा आधार व महत्त्वपूर्ण माध्यम आहेत. या कारणाने अल्लाहचे भय राखणारा प्रत्येक ईमानधारक अल्लाहचा वली आहे. वली असण्यासाठी लोकांना चमत्कार दाखविणे आवश्यक वाटते. मग ते आपल्या वलीच्या खऱ्या खोट्या चमत्कारांचा प्रचार करतात, हा विचार अगदी चुकीचा आहे. चमत्कार आणि वली यांचा काडीमात्र संबंध नाही. अल्लाहच्या मर्जीने एखाद्याकडून काही चमत्कार जाहीर झाला तर ती गोष्ट वेगळी. यात वलीची मर्जी सामील नाही. तथापि अल्लाहचे भय राखणाऱ्या एखाद्या ईमानधारक आणि सुन्नतचे अनुसरण करणाऱ्याकडून चमत्कार दिसून येवो किंवा न येवो तो अल्लाहचा वली असण्यात काहीच शंका नाही.
(१) जगात खूशखबर म्हणजे पुण्यकर्म होय, अथवा ती खूशखबर होय जी मृत्युसमयी फरिश्ते एका ईमानधारकाला देतात, जसे की कुरआन व हदीसद्वारे सिद्ध आहे.
(१) अर्थात अल्लाहसोबत एखाद्याला सहभागी ठरविणे, कसल्याही पुराव्यावर आधारित नाही, किंबहुना एक अटकळ अनुमानाची देणगी आहे. आज जर मनुष्य आपल्या अकलेचा उचितरित्या उपयोग करील तर निःसंशय त्याला हे स्पष्टपणे उमजू शकते की अल्लाहचा कोणीही सहभागी नाही आणि ज्याप्रमाणे तो आकाशांना व धरतीला निर्माण करण्यात एकटा आहे, कोणी त्यात भागीदार नाही तर मग भक्ती- आराधनेत त्याचे अन्य इतर सहभागी कशा प्रकारे असू शकतात?