আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
27 : 4

وَاللّٰهُ یُرِیْدُ اَنْ یَّتُوْبَ عَلَیْكُمْ ۫— وَیُرِیْدُ الَّذِیْنَ یَتَّبِعُوْنَ الشَّهَوٰتِ اَنْ تَمِیْلُوْا مَیْلًا عَظِیْمًا ۟

२७. आणि अल्लाह इच्छितो की तुमची तौबा कबूल करावी आणि जे लोक कामवासनेच्या मागे लागले आहेत, ते इच्छितात की तुम्ही सन्मार्गापासून खूप दूर हटावे. info
التفاسير:

external-link copy
28 : 4

یُرِیْدُ اللّٰهُ اَنْ یُّخَفِّفَ عَنْكُمْ ۚ— وَخُلِقَ الْاِنْسَانُ ضَعِیْفًا ۟

२८. अल्लाह तुमचा सर्व भार हलका करू इच्छितो आणि माणूस मोठा कमकुवत निर्माण केला गेला आहे. info
التفاسير:

external-link copy
29 : 4

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا تَاْكُلُوْۤا اَمْوَالَكُمْ بَیْنَكُمْ بِالْبَاطِلِ اِلَّاۤ اَنْ تَكُوْنَ تِجَارَةً عَنْ تَرَاضٍ مِّنْكُمْ ۫— وَلَا تَقْتُلُوْۤا اَنْفُسَكُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ بِكُمْ رَحِیْمًا ۟

२९. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपसात एकमेकांची धन-संपत्ती नाहक हडप करू नका, परंतु आशा पध्दतीने की तुम्ही आपसात राजीखुशीने व्यापार-उद्योग करा. आणि स्वतःला जीवे ठार करू नका. निःसंशय अल्लाह तुमच्यावर दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
30 : 4

وَمَنْ یَّفْعَلْ ذٰلِكَ عُدْوَانًا وَّظُلْمًا فَسَوْفَ نُصْلِیْهِ نَارًا ؕ— وَكَانَ ذٰلِكَ عَلَی اللّٰهِ یَسِیْرًا ۟

३०. आणि जे मनुष्य ही सीमा ओलांडून आणखी अत्याचार करील तर फार लवकर आम्ही त्याला आगीत टाकू आणि हे अल्लाहकरिता फार सोपे आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 4

اِنْ تَجْتَنِبُوْا كَبَآىِٕرَ مَا تُنْهَوْنَ عَنْهُ نُكَفِّرْ عَنْكُمْ سَیِّاٰتِكُمْ وَنُدْخِلْكُمْ مُّدْخَلًا كَرِیْمًا ۟

३१. जर तुम्ही या मोठ्या अपराधांपासून स्वतःला वाचवाल, ज्यांच्याविषयी तुम्हाला मनाई केली जात आहे तर आम्ही तुमच्या लहान सहान अपराधांना माफ करू आणि मान सन्मानाच्या दरवाज्यात दाखल करू. info
التفاسير:

external-link copy
32 : 4

وَلَا تَتَمَنَّوْا مَا فَضَّلَ اللّٰهُ بِهٖ بَعْضَكُمْ عَلٰی بَعْضٍ ؕ— لِلرِّجَالِ نَصِیْبٌ مِّمَّا اكْتَسَبُوْا ؕ— وَلِلنِّسَآءِ نَصِیْبٌ مِّمَّا اكْتَسَبْنَ ؕ— وَسْـَٔلُوا اللّٰهَ مِنْ فَضْلِهٖ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمًا ۟

३२. आणि त्या गोष्टीची इच्छा धरू नका, जिच्यामुळे अल्लाहने तुमच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठता प्रदान केली आहे. पुरुषांचा हिस्सा तो आहे, जो त्यांनी कमविला आणि स्त्रियांसाठी तो हिस्सा आहे जो त्यांनी कमवीला अल्लाहजवळ त्याच्या दया-कृपेची याचना करा. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्टीचे ज्ञान राखतो. info
التفاسير:

external-link copy
33 : 4

وَلِكُلٍّ جَعَلْنَا مَوَالِیَ مِمَّا تَرَكَ الْوَالِدٰنِ وَالْاَقْرَبُوْنَ ؕ— وَالَّذِیْنَ عَقَدَتْ اَیْمَانُكُمْ فَاٰتُوْهُمْ نَصِیْبَهُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ شَهِیْدًا ۟۠

३३. आणि आई-बाप किंवा जवळचे नातेवाईक आपल्या मागे जे काही सोडून मरतील, त्याचे वारसदार आम्ही प्रत्येकाचे निश्चित केले आहेत आणि ज्यांच्याशी तुम्ही स्वतः वचन-करार केला आहे. त्यांना त्यांचा हिस्सा देऊन टाका. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्ट पाहात आहे. info
التفاسير: