আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
60 : 4

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ یَزْعُمُوْنَ اَنَّهُمْ اٰمَنُوْا بِمَاۤ اُنْزِلَ اِلَیْكَ وَمَاۤ اُنْزِلَ مِنْ قَبْلِكَ یُرِیْدُوْنَ اَنْ یَّتَحَاكَمُوْۤا اِلَی الطَّاغُوْتِ وَقَدْ اُمِرُوْۤا اَنْ یَّكْفُرُوْا بِهٖ ؕ— وَیُرِیْدُ الشَّیْطٰنُ اَنْ یُّضِلَّهُمْ ضَلٰلًا بَعِیْدًا ۟

६०. काय तुम्ही त्यांना नाही पाहिले, जे दावा करतात की, जे काही तुमच्यावर उतरविले गेले आहे आणि जे काही तुमच्या पूर्वी उतरविले गेले त्यावर ते ईमान राखतात, परंतु आपसातले तंटे सोडविण्यासाठी, अल्लाहऐवजी ते दुसऱ्यांजवळ जाऊ इच्छितात, वास्तविक त्यांना आदेश दिला गेला आहे की त्यांनी, त्याचा (सैतानाचा) इन्कार करावा. सैतान तर हे इच्छितोच की त्यांना बहकवून दूर फेकून द्यावे. info
التفاسير:

external-link copy
61 : 4

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ تَعَالَوْا اِلٰی مَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ وَاِلَی الرَّسُوْلِ رَاَیْتَ الْمُنٰفِقِیْنَ یَصُدُّوْنَ عَنْكَ صُدُوْدًا ۟ۚ

६१. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जो (पवित्र ग्रंथ) अवतरित केला आहे, त्याच्याकडे आणि पैगंबराकडे या, तेव्हा तुम्ही पाहाल की हे मुनाफिक (संधीसाधू) तुमच्याकडून तोंड फिरवून थांबतात. info
التفاسير:

external-link copy
62 : 4

فَكَیْفَ اِذَاۤ اَصَابَتْهُمْ مُّصِیْبَةٌ بِمَا قَدَّمَتْ اَیْدِیْهِمْ ثُمَّ جَآءُوْكَ یَحْلِفُوْنَ ۖۗ— بِاللّٰهِ اِنْ اَرَدْنَاۤ اِلَّاۤ اِحْسَانًا وَّتَوْفِیْقًا ۟

६२. मग काय कारण आहे की जेव्हा त्यांच्यावर त्यांच्या वाईट कर्मांमुळे एखादे संकट येऊन कोसळते तर मग हे तुमच्याजवळ येऊन अल्लाहची शपथ घेतात, आणि सांगतात, आमचा इरादा तर केवळ भलाईचा आणि चांगले संबंध घडवून आणण्याचाच होता. info
التفاسير:

external-link copy
63 : 4

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ یَعْلَمُ اللّٰهُ مَا فِیْ قُلُوْبِهِمْ ۗ— فَاَعْرِضْ عَنْهُمْ وَعِظْهُمْ وَقُلْ لَّهُمْ فِیْۤ اَنْفُسِهِمْ قَوْلًا بَلِیْغًا ۟

६३. हे असे लोक आहेत, ज्यांच्या मनातील रहस्यभेद, अल्लाहला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, मात्र त्यांना शिकवण देत राहा, आणि त्यांना अशी गोष्ट बोला जी त्यांच्या मनावर प्रभाव टाकणारी असेल. info
التفاسير:

external-link copy
64 : 4

وَمَاۤ اَرْسَلْنَا مِنْ رَّسُوْلٍ اِلَّا لِیُطَاعَ بِاِذْنِ اللّٰهِ ؕ— وَلَوْ اَنَّهُمْ اِذْ ظَّلَمُوْۤا اَنْفُسَهُمْ جَآءُوْكَ فَاسْتَغْفَرُوا اللّٰهَ وَاسْتَغْفَرَ لَهُمُ الرَّسُوْلُ لَوَجَدُوا اللّٰهَ تَوَّابًا رَّحِیْمًا ۟

६४. आणि आम्ही प्रत्येक पैगंबर केवळ यासाठी पाठविला की अल्लाहच्या आदेशान्वये, त्याच्या आदेशाचे पालन केले जावे, आणि जर हे लोक, ज्यांनी स्वतःच्या प्राणांवर अत्याचार केला, तुमच्याजवळ आले असते आणि त्यांनी अल्लाहजवळ तौबा (क्षमा-याचना) केली असती आणि पैगंबरांनीही त्यांच्यासाठी माफी मागितली असती तर निःसंशय, अल्लाह या लोकांना मोठा माफ करणारा, दया करणारा आढळला असता. info
التفاسير:

external-link copy
65 : 4

فَلَا وَرَبِّكَ لَا یُؤْمِنُوْنَ حَتّٰی یُحَكِّمُوْكَ فِیْمَا شَجَرَ بَیْنَهُمْ ثُمَّ لَا یَجِدُوْا فِیْۤ اَنْفُسِهِمْ حَرَجًا مِّمَّا قَضَیْتَ وَیُسَلِّمُوْا تَسْلِیْمًا ۟

६५. तेव्हा शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची, हे लोक (तोपर्यंत) ईमानधारक होऊ शकत नाही, जोपर्यंत सर्व आपसातील मतभेदात तुम्हाला न्याय-निवाडा करणारा स्वीकारीत नाही, मग जो फैसला तुम्ही कराल, त्यावर मनातून नाराजही नसावेत आणि आज्ञाधारकाप्रमाणे त्यांनी तो मान्य करून घ्यावा. info
التفاسير: