আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
20 : 4

وَاِنْ اَرَدْتُّمُ اسْتِبْدَالَ زَوْجٍ مَّكَانَ زَوْجٍ ۙ— وَّاٰتَیْتُمْ اِحْدٰىهُنَّ قِنْطَارًا فَلَا تَاْخُذُوْا مِنْهُ شَیْـًٔا ؕ— اَتَاْخُذُوْنَهٗ بُهْتَانًا وَّاِثْمًا مُّبِیْنًا ۟

२०. आणि जर एका पत्नीच्या ठिकाणी तुम्ही दुसरी पत्नी करू इच्छित असाल तर त्यांच्यापैकी एखादीला तुम्ही धन-संपत्तीचा खजिना देऊन ठेवला असेल, तरीही त्यातून काही (परत) घेऊ नका. काय तुम्ही तिला बदनाम करून उघड अशा अपराधाने परत घ्याल? info
التفاسير:

external-link copy
21 : 4

وَكَیْفَ تَاْخُذُوْنَهٗ وَقَدْ اَفْضٰی بَعْضُكُمْ اِلٰی بَعْضٍ وَّاَخَذْنَ مِنْكُمْ مِّیْثَاقًا غَلِیْظًا ۟

२१. आणि तुम्ही ते कसे परत घ्याल? यानंतरही की तुम्ही एकमेकांशी सहवास केलेला आहे आणि त्या स्त्रियांनी तुमच्याकडून पक्का वायदा-करार घेतला आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 4

وَلَا تَنْكِحُوْا مَا نَكَحَ اٰبَآؤُكُمْ مِّنَ النِّسَآءِ اِلَّا مَا قَدْ سَلَفَ ؕ— اِنَّهٗ كَانَ فَاحِشَةً وَّمَقْتًا ؕ— وَسَآءَ سَبِیْلًا ۟۠

२२. आणि त्या स्त्रियांशी विवाह करू नका, ज्यांच्याशी तुमच्या पित्यांनी विवाह केला असेल, परंतु यापूर्वी जे झाले ते झाले हे निर्लज्जतेचे काम आणि कपटीपणामुळे आहे आणि मोठा वाईट (आचरणाचा) मार्ग आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 4

حُرِّمَتْ عَلَیْكُمْ اُمَّهٰتُكُمْ وَبَنٰتُكُمْ وَاَخَوٰتُكُمْ وَعَمّٰتُكُمْ وَخٰلٰتُكُمْ وَبَنٰتُ الْاَخِ وَبَنٰتُ الْاُخْتِ وَاُمَّهٰتُكُمُ الّٰتِیْۤ اَرْضَعْنَكُمْ وَاَخَوٰتُكُمْ مِّنَ الرَّضَاعَةِ وَاُمَّهٰتُ نِسَآىِٕكُمْ وَرَبَآىِٕبُكُمُ الّٰتِیْ فِیْ حُجُوْرِكُمْ مِّنْ نِّسَآىِٕكُمُ الّٰتِیْ دَخَلْتُمْ بِهِنَّ ؗ— فَاِنْ لَّمْ تَكُوْنُوْا دَخَلْتُمْ بِهِنَّ فَلَا جُنَاحَ عَلَیْكُمْ ؗ— وَحَلَآىِٕلُ اَبْنَآىِٕكُمُ الَّذِیْنَ مِنْ اَصْلَابِكُمْ ۙ— وَاَنْ تَجْمَعُوْا بَیْنَ الْاُخْتَیْنِ اِلَّا مَا قَدْ سَلَفَ ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟ۙ

२३. तुमच्यावर हराम (निषिद्ध) केल्या गेल्या तुमच्या माता आणि कन्या, आणि तुमच्या बहिणी तुमच्या आत्या तुमच्या मावश्या , भावाच्या मुली, बहिणीच्या मुली आणि तुमच्या त्या माता, ज्यांनी तुम्हाला आपले दूध पाजले असेल आणि तुमच्या (आईच्या) दुधात सहभागी असलेल्या बहिणी, तुमची सासू आणि तुम्ही ज्यांचे पालनपोषण केले त्या मुली ज्या तुमच्या कुशीत (कडेवर) आहेत तुमच्या त्या स्त्रियांपासून ज्यांच्याशी तुम्ही सहवास केलेला आहे, परंतु जर तुम्ही त्यांच्याशी सहवास केला नसेल तर तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही, आणि तुमच्या सख्या पुत्रांच्या पत्न्यासुद्धा हराम आहेत आणि दोन बहिणींना एकाच वेळा (एकत्रपणे) निकाहमध्ये जमा करणे हेदेखील हराम आहे. मात्र यापूर्वी जे झाले ते झाले. निःसंशय अल्लाह मोठा माफ करणारा, मेहरबान, दयावान आहे. info
التفاسير: