३६. यास्तव (राजदूत) जेव्हा (हजरत) सुलेमानजवळ पोहोचला, तेव्हा सुलेमान म्हणाले, काय तुम्ही लोक धन देऊन माझी मदत करू इच्छिता? मला तर माझ्या पालनकर्त्याने याहून खूप जास्त देऊन ठेवले आहे, जे त्याने तुम्हाला दिले आहे. तेव्हा आपल्या नजराण्याने तुम्हीच खूश राहा.
३७. जा, परत जा, त्यांच्याकडे आम्ही त्यांच्यावर असे सैन्य पाठवू की ज्याचा सामना करण्याची त्यांच्यात ताकत नाही आणि आम्ही त्यांना अपमानित व पराभूत करून तिथून बाहेर घालवू.
३९. एक बलाढ्य जिन्न म्हणाला, तुम्ही आपल्या जागेवरून उठण्यापूर्वीच मी ते तुमच्याजवळ आणतो. विश्वास राखा, मी याचे सामर्थ्य राखतो. आणि मी अमानतदार (विस्वस्त) ही आहे.
४०. ज्याच्याजवळ ग्रंथाचे ज्ञान होते, तो म्हणाले, की तुमची पापणी लवण्यापूर्वीच मी त्यास तुमच्याजवळ पोहचवू शकतो. जेव्हा पैगंबर (सुलेमान) ने ते (सिंहासन) आपल्याजवळ हजर असलेले पाहिले, तेव्हा म्हणाले, हा माझ्या पालनकर्त्याचा उपकार आहे. यासाठी की त्याने माझी कसोटी घ्यावी की मी कृतज्ञता दर्शवितो की कृतघ्नता. कृतज्ञता व्यक्त करणारा आपल्या फायद्यासाठीच कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जो कृतघ्नता दर्शवील तर माझा पालनकर्ता मोठा निःस्पृह आणि मोठा मेहेरबान आहे.
४१. (हजरत सुलेमानने) आदेश दिला की राणीच्या सिंहासनाचे स्वरूप काहीसे बदलून टाका. मग पाहू या, ती मार्गदर्शन प्राप्त करते की त्या लोकांपैकी ठरते जे मार्गदर्शन प्राप्त करीत नाही.
४२. मग जेव्हा ती हजर झाली तेव्हा तिला विचारले गेले की तुमचे सिंहासन असेच आहे? तिने उत्तर दिले, हे जणू तेच आहे आम्हाला याच्यापूर्वीच ज्ञान दिले गेले होते आणि आम्ही मुस्लिम होतो.
४४. तिला सांगितले गेले की महालात प्रवेश करा. जेव्हा तिने पाहिले तेव्हा तिला असे वाटले की हा जलाशय (हौद) आहे, तिने आपल्या पोटऱ्या उघड्या केल्या (सुलेमान) म्हणाले, हा तर काचेचा बनलेला आहे. ती म्हणाली, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या प्राणावर अत्याचार केला. आता मी सुलेमानसोबत, सर्व विश्वांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारक बनते.