१४. आणि त्यांनी इन्कार केला, वास्तिवक त्यांच्या मनात विश्वास बसला होता केवळ अत्याचार व घमेंडीमुळे (त्यांनी इन्कार केला) तर पाहा, त्या दुराचारी लोकांचा काय शेवट झाला!
१५. आणि निःसंशय, आम्ही दाऊद आणि सुलेमानला ज्ञान प्रदान केले होते आणि दोघे म्हणाले, सर्व प्रशंसा त्या अल्लाहकरिता आहे, ज्याने आम्हाला आपल्या अनेक ईमानधारक दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे.
१६. आणि दाऊदचे वारस सुलेमान झाले आणि म्हणाले, लोकांनो! आम्हाला पक्ष्यांची बोली (भाषा) शिकिवली गेली आहे. आणि आम्हाला सर्व काही दिले गेले आहेे. निःसंशय हा (अल्लाहचा) मोठा उघड उपकार आहे.
१८. जेव्हा ते मुंग्यांच्या मैदानात पोहोचले, तेव्हा एक मुंगी म्हणाली, हे मुंग्यानो! आपापल्या बिळात पटकन घुसा (असे न व्हावे की) असावधानीमुळे सुलेमान आणि त्यांच्या सैन्याने तुम्हाला पायाखाली तुडवावे.
१९. तिच्या या बोलण्यावर (हजरत सुलेमान) यांनी स्मितहास्य केले आणि दुआ (प्रार्थना) करू लागले की हे माझ्या पालनकर्त्या! तू मला तौफिक (सुबुद्धी) प्रदान कर की मी तुझ्या या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, ज्या तू माझ्यावर केल्या आहेत आणि माझ्या माता-पित्यांवर आणि मी अशी सत्कर्मे करीत राहावे, ज्यामुळे तू प्रसन्न राहावे आणि मला आपल्या दया- कृपेने आपल्या नेक- सदाचारी दासांमध्ये सामील कर.
२२. काही जास्त वेळ झाला नव्हता, तेवढ्यात तो (येऊन) म्हणाला, मी अशा गोष्टीची खबर आणली आहे की ज्याविषयी तुम्ही जाणतच नाही. मी ‘सबा’ची अगदी विश्वसनीय बातमी घेऊन तुमच्याजवळ आलो आहे.