የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
56 : 51

وَمَا خَلَقْتُ الْجِنَّ وَالْاِنْسَ اِلَّا لِیَعْبُدُوْنِ ۟

५६. मी जिन्नांना आणि मानवांना फक्त अशासाठी निर्माण केले आहे की त्यांनी केवळ माझी उपासना करावी.१ info

(१) यात अल्लाहच्या त्या इराद्यास जाहीर केले गेले आहे, जो शरिअतीनुसार तो आपल्या दासांकडून इच्छितो की समस्त जिन्न आणि मानवांनी केवळ एक अल्लाहचीच उपासना करावी व आज्ञापालनही त्याच एकाचे करावे. जर याचा संबंध उत्पत्तीच्या इराद्याशी असता तर सर्वच त्याची उपासना व आज्ञापालन करण्यास विवश झाले असते, मग कोणी अवज्ञा करण्याचे सामर्थ्य राखू शकला नसता. अर्थात यात जिन्न आणि मानवांना त्याच्या जीवन उद्देशाची आठवण करून दिली गेली आहे, ज्याचा त्यांनी विसर पाडल्यास आखिरतमध्ये सक्तीने विचारपूस होईल. परिणामी ते त्या कसोटीत असफल ठरतील, ज्यात अल्लाहने त्यांना संकल्प आणि पसंतीचे स्वातंत्र्य देऊन ठेवले आहे.

التفاسير: