የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

አል ፉርቃን

external-link copy
1 : 25

تَبٰرَكَ الَّذِیْ نَزَّلَ الْفُرْقَانَ عَلٰی عَبْدِهٖ لِیَكُوْنَ لِلْعٰلَمِیْنَ نَذِیْرَا ۟ۙ

१. मोठा बरकतशाली (समृद्धशाली) आहे तो अल्लाह ज्याने आपल्या दासावर फुरक़ान१ अवतिरत केले. यासाठी की तो समस्त लोकांकरिता खबरदार करणारा ठरावा. info

(१) ‘फुरक़ान’चा अर्थ आहे, सत्य आणि असत्य, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद, आणि न्याय-अन्याय यांच्या दरम्यान फरक करणारा. या कुरआनने अगदी उघडपणे या गोष्टींना स्पष्ट केले आहे. यास्तव याला ‘फुरक़ान’ म्हटले आहे.

التفاسير: