የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
62 : 2

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَالَّذِیْنَ هَادُوْا وَالنَّصٰرٰی وَالصّٰبِـِٕیْنَ مَنْ اٰمَنَ بِاللّٰهِ وَالْیَوْمِ الْاٰخِرِ وَعَمِلَ صَالِحًا فَلَهُمْ اَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ ۪ۚ— وَلَا خَوْفٌ عَلَیْهِمْ وَلَا هُمْ یَحْزَنُوْنَ ۟

६२. निःसंशय, जो मुस्लिम असो, यहूदी (ज्यू) असो, नसारा (ख्रिश्चन) असो किंवा साबी १ असो, जो कोणी सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि कयामतीच्या दिवसावर ईमान राखील आणि सत्कर्मे करील तर त्याचा मोबदला त्याच्या पालनकर्त्याजवळ आहे. त्यांना ना कसलेही भय राहील, आणि ना कसले दुःख राहील. info

(१) अर्थात ते लोक, जे जरूर सुरवातीच्या काळात एखादा सत्य-धर्म मानणारे असतील. यास्तव कुरआनात यहूदी, ख्रिश्चनांसोबत त्यांचा उल्लेख आला आहे परंतु नंतरच्या काळात, त्याच्यात फरिश्त्यांची पूजा करण्याची प्रथा पडली किंवा ते नास्तिक झाले. या कारणास्तव धर्महीन लोकांना साबी म्हटले जाऊ लागले.

التفاسير: