የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

external-link copy
34 : 2

وَاِذْ قُلْنَا لِلْمَلٰٓىِٕكَةِ اسْجُدُوْا لِاٰدَمَ فَسَجَدُوْۤا اِلَّاۤ اِبْلِیْسَ ؕ— اَبٰی وَاسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ الْكٰفِرِیْنَ ۟

३४. आणि जेव्हा आम्ही फरिश्त्यांना फर्माविले की आदमला सजदा करा. तेव्हा इब्लीसशिवाय सर्वांनी सजदा केला. त्याने इन्कार केला आणि घमेंड दाखविली १ आणि तो काफिरां (इन्कारी लोकां) पैकीच होता. info

(१) इब्लीसने आदमला सजदा करण्यास म्हणजे आदमपुढे माथा टेकण्यास नकार दर्शविला आणि अपमानित झाला. कुरआनानुसार इब्लीस जिन्नांपैकी होता, परंतु अल्लाहने त्याला सन्मानपूर्वक फरिश्त्यांमध्ये सामील करून घेतले होते, यास्तव अल्लाहच्या आदेशानुसार त्यानेदेखील सजदा केला पाहिजे होता, परंतु द्वेष आणि घमेंडीमुळे त्याने सजदा करण्यास इन्कार केला. अर्थात द्वेष, गर्व आणि घमेंड ते पाप होय, जे मानवविश्वात सर्वांत प्रथम केले गेले आणि ते करणारा इब्लीस होता.

التفاسير: