የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

ሁድ

external-link copy
1 : 11

الٓرٰ ۫— كِتٰبٌ اُحْكِمَتْ اٰیٰتُهٗ ثُمَّ فُصِّلَتْ مِنْ لَّدُنْ حَكِیْمٍ خَبِیْرٍ ۟ۙ

१. अलिफ. लाम. रॉ . हा एक असा ग्रंथ आहे की याच्या आयती मजबूत केल्या गेल्या आहेत, मग सविस्तर सांगितल्या गेल्या आहेत एका हिकमतशाली, पूर्ण ज्ञान राखणाऱ्यातर्फे. info
التفاسير:

external-link copy
2 : 11

اَلَّا تَعْبُدُوْۤا اِلَّا اللّٰهَ ؕ— اِنَّنِیْ لَكُمْ مِّنْهُ نَذِیْرٌ وَّبَشِیْرٌ ۟ۙ

२. हे की अल्लाहशिवाय कोणाचीही उपासना करू नका. मी तुम्हाला अल्लाहतर्फे भय दाखविणारा आणि खूशखबर देणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 11

وَّاَنِ اسْتَغْفِرُوْا رَبَّكُمْ ثُمَّ تُوْبُوْۤا اِلَیْهِ یُمَتِّعْكُمْ مَّتَاعًا حَسَنًا اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی وَّیُؤْتِ كُلَّ ذِیْ فَضْلٍ فَضْلَهٗ ؕ— وَاِنْ تَوَلَّوْا فَاِنِّیْۤ اَخَافُ عَلَیْكُمْ عَذَابَ یَوْمٍ كَبِیْرٍ ۟

३. आणि हे की तुम्ही आपल्या अपराधांना आपल्या पालनकर्त्याकडून माफ करवून घ्या, मग त्याच्याचकडे एकचित्त व्हा. तो तुम्हाला एका निर्धारीत वेळेपर्यंत (जीवन) सामुग्री देईल आणि प्रत्येक चांगले काम करणाऱ्यावर अधिक कृपा करील आणि जर तुम्ही लोक तोंड फिरवित राहिलात तर मला तुमच्याबाबत एका मोठ्या दिवसाच्या शिक्षेची चिंता वाटते. info
التفاسير:

external-link copy
4 : 11

اِلَی اللّٰهِ مَرْجِعُكُمْ ۚ— وَهُوَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

४. तुम्हाला अल्लाहच्याच जवळ जायचे आहे आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
5 : 11

اَلَاۤ اِنَّهُمْ یَثْنُوْنَ صُدُوْرَهُمْ لِیَسْتَخْفُوْا مِنْهُ ؕ— اَلَا حِیْنَ یَسْتَغْشُوْنَ ثِیَابَهُمْ ۙ— یَعْلَمُ مَا یُسِرُّوْنَ وَمَا یُعْلِنُوْنَ ۚ— اِنَّهٗ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟

५. लक्षात ठेवा ते लोक आपल्या छातींना दुहेरी करून घेतात, यासाठी की आपल्या गोष्टी (बोलणे) अल्लाहपासून लपवू शकावे. लक्षात ठेवा की ते लोक ज्या वेळी आपले कपडे गुंडाळतात, त्या वेळीही तो सर्व काही जाणतो जे काही लपवितात (कानगोष्टी करतात) आणि जे काही साफ- स्पष्ट बोलतात. निःसंशय तो मनातल्या गोष्टीही जाणतो. info
التفاسير: