Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Нуҳ

external-link copy
1 : 71

اِنَّاۤ اَرْسَلْنَا نُوْحًا اِلٰی قَوْمِهٖۤ اَنْ اَنْذِرْ قَوْمَكَ مِنْ قَبْلِ اَنْ یَّاْتِیَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟

१. निःसंशय, आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले की आपल्या जनसमूहाला खबरदार करा (आणि सावध करा) यापूर्वी की त्यांच्याजवळ दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) येऊन पोहचावा. info
التفاسير:

external-link copy
2 : 71

قَالَ یٰقَوْمِ اِنِّیْ لَكُمْ نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟ۙ

२. (नूह अलै.) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुम्हाला स्पष्टपणे खबरदार करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 71

اَنِ اعْبُدُوا اللّٰهَ وَاتَّقُوْهُ وَاَطِیْعُوْنِ ۟ۙ

३. की तुम्ही अल्लाहची उपासना करा आणि त्याचेच भय बाळगा आणि माझे म्हणणे मान्य करा. info
التفاسير:

external-link copy
4 : 71

یَغْفِرْ لَكُمْ مِّنْ ذُنُوْبِكُمْ وَیُؤَخِّرْكُمْ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ؕ— اِنَّ اَجَلَ اللّٰهِ اِذَا جَآءَ لَا یُؤَخَّرُ ۘ— لَوْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते!) info

(१) अर्थात ईमान राखण्याच्या स्थितीत, तुमच्या मृत्युचा आणि जो निर्धारित आहे, तो टळून तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करील आणि तो अज़ाब तुमच्यावरून दूर करील, जो ईमान न राखण्याच्या स्थितीत तुमच्या नशिबी होता. या आयतीद्वारे हे सांगितले गेले आहे की, आज्ञापालन, सत्कर्म व सदाचरण, नातेवाईकांशी सद्‌व्यवहार केल्याने आयुष्य वाढते. हदीसमधील उल्लेखानुसार ‘मिल्लतुर्रहीमी तज़िजुफील उमुर.’ ‘‘नातेवाईकांशी सद्‌व्यवहार आयुष्य वाढण्याचे कारण आहे.’’ (इब्ने कसीर)

التفاسير:

external-link copy
5 : 71

قَالَ رَبِّ اِنِّیْ دَعَوْتُ قَوْمِیْ لَیْلًا وَّنَهَارًا ۟ۙ

५. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या जनसमूहाच्या लोकांना रात्रंदिवस तुझ्याकडे बोलाविले आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 71

فَلَمْ یَزِدْهُمْ دُعَآءِیْۤ اِلَّا فِرَارًا ۟

६. तथापि माझ्या बोलाविण्याने हे लोक पळ काढण्यात आणखी वाढतच गेले. info
التفاسير:

external-link copy
7 : 71

وَاِنِّیْ كُلَّمَا دَعَوْتُهُمْ لِتَغْفِرَ لَهُمْ جَعَلُوْۤا اَصَابِعَهُمْ فِیْۤ اٰذَانِهِمْ وَاسْتَغْشَوْا ثِیَابَهُمْ وَاَصَرُّوْا وَاسْتَكْبَرُوا اسْتِكْبَارًا ۟ۚ

७. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला. info
التفاسير:

external-link copy
8 : 71

ثُمَّ اِنِّیْ دَعَوْتُهُمْ جِهَارًا ۟ۙ

८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले. info
التفاسير:

external-link copy
9 : 71

ثُمَّ اِنِّیْۤ اَعْلَنْتُ لَهُمْ وَاَسْرَرْتُ لَهُمْ اِسْرَارًا ۟ۙ

९. आणि निःसंशय, मी त्यांना उघडपणेही सांगितले व गुपचुपरित्याही. info
التفاسير:

external-link copy
10 : 71

فَقُلْتُ اسْتَغْفِرُوْا رَبَّكُمْ ۫— اِنَّهٗ كَانَ غَفَّارًا ۟ۙ

१०. आणि मी म्हणालो की आपल्या पालनकर्त्याकडून आपले अपराध माफ करवून घ्या (आणि क्षमा-याचना करा). निःसंशय, तो मोठा माफ करणारा आहे. info
التفاسير: