Қуръони Карим маъноларининг таржимаси - Маратийча таржима - Муҳаммад Шафий Ансорий

Қалам

external-link copy
1 : 68

نٓ وَالْقَلَمِ وَمَا یَسْطُرُوْنَ ۟ۙ

१. नून. शपथ आहे कलम (लेखणी) ची,१ आणि त्या गोष्टीची, जी काही ते (फरिश्ते) लिहितात. info

(१) कलमची शपथ घेतली, जिचे एक महत्त्व यासाठी आहे की याद्वारे वर्णन आणि भाष्य केले जाते. काहींच्या मते यास अभिप्रेत तो खास कलम होय, ज्याला अल्लाहने सर्वांत प्रथम निर्माण केले आणि त्यास भाग्य लिहिण्याचा आदेश दिला. यास्तव त्याने शेवटपावेतो घडणाऱ्या सर्व गोष्टी लिहिल्या. (तिर्मिजी, तफसीर सूरह नून वल कलम आणि अलबानी यांनी यास उचित म्हटले आहे.)

التفاسير:

external-link copy
2 : 68

مَاۤ اَنْتَ بِنِعْمَةِ رَبِّكَ بِمَجْنُوْنٍ ۟ۚ

२. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत. info
التفاسير:

external-link copy
3 : 68

وَاِنَّ لَكَ لَاَجْرًا غَیْرَ مَمْنُوْنٍ ۟ۚ

३. आणि निःसंशय, तुमच्यासाठी कधीही न संपणारा मोबदला आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 68

وَاِنَّكَ لَعَلٰی خُلُقٍ عَظِیْمٍ ۟

४. आणि निःसंशय, तुम्ही फार (उत्तम) स्वभावा (चारित्र्या) वर आहात. १ info

(१) ‘खुल्के अज़ीम’शी अभिप्रेत इस्लाम धर्म किंवा पवित्र कुरआन होय. अर्थात तुम्ही त्या पद्धतीवर आहात, ज्याचा आदेश तुम्हाला अल्लाहने कुरआनात किंवा इस्लाम धर्मात दिला आहे किंवा यास अभिप्रेत ती सभ्यता, शिष्टाचार, नरमी, स्नेहशीलता, विश्वस्तता, सचोटी, गांभीर्य, श्रेष्ठता आणि इतर नैतिक गुण आहेत. हे गुण पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लाम) यांच्या चारित्र्यात त्यांच्या पैगंबर होण्यापूर्वीच होते आणि पैगंबर झाल्यानंतर ही गुणवत्ता आणखी उंचावली व विस्तृत झाली. यास्तव जेव्हा हजरत आयेशा (रजि.) यांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या चारित्र्याबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी फर्मावले, ‘‘काय तुम्ही कुरआन वाचले नाही?’’ (मुस्लिम, किताबुल मुसाफिरीन, बाबु जामेअ सलातिल लैले व मन नाम अन्हु मरेज) हजरत आयेशा यांचे उत्तर ‘खुल्के अज़ीम’च्या वर उल्लेखित दोन्ही अर्थांनी युक्त आहे.

التفاسير:

external-link copy
5 : 68

فَسَتُبْصِرُ وَیُبْصِرُوْنَ ۟ۙ

५. तेव्हा आता तुम्हीही पाहाल आणि हे देखील पाहतील info
التفاسير:

external-link copy
6 : 68

بِاَیِّىكُمُ الْمَفْتُوْنُ ۟

६. की तुमच्यापैकी उपद्रवग्रस्त कोण आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 68

اِنَّ رَبَّكَ هُوَ اَعْلَمُ بِمَنْ ضَلَّ عَنْ سَبِیْلِهٖ ۪— وَهُوَ اَعْلَمُ بِالْمُهْتَدِیْنَ ۟

७. निःसंशय, तुमचा पालनकर्ता आपल्या मार्गापासून भटकणाऱ्यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि तो, मार्गदर्शन प्राप्त केलेल्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
8 : 68

فَلَا تُطِعِ الْمُكَذِّبِیْنَ ۟

८. तेव्हा तुम्ही खोटे ठरविणाऱ्यांचे (म्हणणे) मान्य करू नका. info
التفاسير:

external-link copy
9 : 68

وَدُّوْا لَوْ تُدْهِنُ فَیُدْهِنُوْنَ ۟

९. ते तर इच्छितात की तुम्ही थोडे सुस्त पडावे तर हे देखील ढीले पडतील. info
التفاسير:

external-link copy
10 : 68

وَلَا تُطِعْ كُلَّ حَلَّافٍ مَّهِیْنٍ ۟ۙ

१०. आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाचेही म्हणणे मान्य करू नका, जो अधिक शपथ घेणारा तुच्छ (अपमानित) असेल. info
التفاسير:

external-link copy
11 : 68

هَمَّازٍ مَّشَّآءٍ بِنَمِیْمٍ ۟ۙ

११. नीच (क्षुद्र), व्यंग दोष काढणारा, आणि चहाडी करणारा असेल. info
التفاسير:

external-link copy
12 : 68

مَّنَّاعٍ لِّلْخَیْرِ مُعْتَدٍ اَثِیْمٍ ۟ۙ

१२. भलेपणापासून रोखणारा, मर्यादेचे उल्लंघन करणारा, अपराधी असेल. info
التفاسير:

external-link copy
13 : 68

عُتُلٍّۢ بَعْدَ ذٰلِكَ زَنِیْمٍ ۟ۙ

१३. घमेंडी, मग त्याचसोबत वंशहीन असेल. info
التفاسير:

external-link copy
14 : 68

اَنْ كَانَ ذَا مَالٍ وَّبَنِیْنَ ۟ؕ

१४. (त्याची घमेंड) केवळ यासाठी आहे की तो धनवान आणि अनेक पुत्र बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 68

اِذَا تُتْلٰی عَلَیْهِ اٰیٰتُنَا قَالَ اَسَاطِیْرُ الْاَوَّلِیْنَ ۟

१५. जेव्हा त्याच्यासमोर आमच्या आयती वाचून ऐकविल्या जातात, तेव्हा हा म्हणतो की या तर पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा-कहाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
16 : 68

سَنَسِمُهٗ عَلَی الْخُرْطُوْمِ ۟

१६. आम्हीही त्याच्या सोंडे (नाका) वर डाग देऊ. info
التفاسير:

external-link copy
17 : 68

اِنَّا بَلَوْنٰهُمْ كَمَا بَلَوْنَاۤ اَصْحٰبَ الْجَنَّةِ ۚ— اِذْ اَقْسَمُوْا لَیَصْرِمُنَّهَا مُصْبِحِیْنَ ۟ۙ

१७. निःसंशय, आम्ही त्यांची तशीच परीक्षा घेतली जशी आम्ही बागवाल्यांची घेतली होती, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळ होताच त्या (बागे) ची फळे तोडून घेऊ. info
التفاسير:

external-link copy
18 : 68

وَلَا یَسْتَثْنُوْنَ ۟

१८. आणि इन्शा अल्लाह (जर अल्लाहने इच्छिले) म्हटले नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 68

فَطَافَ عَلَیْهَا طَآىِٕفٌ مِّنْ رَّبِّكَ وَهُمْ نَآىِٕمُوْنَ ۟

१९. तेव्हा त्या (बागे) वर तुमच्या पालनकर्त्यातर्फे एक आपत्ती चारी बाजूंनी फिरून गेली आणि ते झोपतच राहिले. info
التفاسير:

external-link copy
20 : 68

فَاَصْبَحَتْ كَالصَّرِیْمِ ۟ۙ

२०. तर ती (बाग) अशी झाली, जणू कापणी केलेले शेत. info
التفاسير:

external-link copy
21 : 68

فَتَنَادَوْا مُصْبِحِیْنَ ۟ۙ

२१. आता सकाळ होताच त्यांनी एकमेकांना हाक मारली info
التفاسير:

external-link copy
22 : 68

اَنِ اغْدُوْا عَلٰی حَرْثِكُمْ اِنْ كُنْتُمْ صٰرِمِیْنَ ۟

२२. की जर तुम्हाला फळे तोडायची आहेत तर आपल्या शेतावर सकाळीच निघा. info
التفاسير:

external-link copy
23 : 68

فَانْطَلَقُوْا وَهُمْ یَتَخَافَتُوْنَ ۟ۙ

२३. मग हे सर्व हळू हळू बोलत निघाले info
التفاسير:

external-link copy
24 : 68

اَنْ لَّا یَدْخُلَنَّهَا الْیَوْمَ عَلَیْكُمْ مِّسْكِیْنٌ ۟ۙ

२४. की आजच्या दिवशी कोणा गरिबाने तुमच्याजवळ येऊ नये. info
التفاسير:

external-link copy
25 : 68

وَّغَدَوْا عَلٰی حَرْدٍ قٰدِرِیْنَ ۟

२५. आणि घाईघाईने सकाळीच पोहोचले (समजत होते) की आम्ही काबू मिळविला. info
التفاسير:

external-link copy
26 : 68

فَلَمَّا رَاَوْهَا قَالُوْۤا اِنَّا لَضَآلُّوْنَ ۟ۙ

२६. मग जेव्हा त्यांनी बाग पाहिली, तेव्हा म्हणू लागले की, निश्चितच आम्ही रस्ता विसरलो. info
التفاسير:

external-link copy
27 : 68

بَلْ نَحْنُ مَحْرُوْمُوْنَ ۟

२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो. info
التفاسير:

external-link copy
28 : 68

قَالَ اَوْسَطُهُمْ اَلَمْ اَقُلْ لَّكُمْ لَوْلَا تُسَبِّحُوْنَ ۟

२८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत? info
التفاسير:

external-link copy
29 : 68

قَالُوْا سُبْحٰنَ رَبِّنَاۤ اِنَّا كُنَّا ظٰلِمِیْنَ ۟

२९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो. info
التفاسير:

external-link copy
30 : 68

فَاَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلٰی بَعْضٍ یَّتَلَاوَمُوْنَ ۟

३०. मग ते एकमेकांकडे तोंड करून बरे-वाईट बोलू लागले. info
التفاسير:

external-link copy
31 : 68

قَالُوْا یٰوَیْلَنَاۤ اِنَّا كُنَّا طٰغِیْنَ ۟

३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो. info
التفاسير:

external-link copy
32 : 68

عَسٰی رَبُّنَاۤ اَنْ یُّبْدِلَنَا خَیْرًا مِّنْهَاۤ اِنَّاۤ اِلٰی رَبِّنَا رٰغِبُوْنَ ۟

३२. काय नवल की आमचा पालनकर्ता आम्हाला यापेक्षा चांगला मोबदला प्रदान करील. निःसंशय, आम्ही आता आपल्या पालनकर्त्याशीच आशा राखतो. info
التفاسير:

external-link copy
33 : 68

كَذٰلِكَ الْعَذَابُ ؕ— وَلَعَذَابُ الْاٰخِرَةِ اَكْبَرُ ۘ— لَوْ كَانُوْا یَعْلَمُوْنَ ۟۠

३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते). info
التفاسير:

external-link copy
34 : 68

اِنَّ لِلْمُتَّقِیْنَ عِنْدَ رَبِّهِمْ جَنّٰتِ النَّعِیْمِ ۟

३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत. info
التفاسير:

external-link copy
35 : 68

اَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِیْنَ كَالْمُجْرِمِیْنَ ۟ؕ

३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू? info
التفاسير:

external-link copy
36 : 68

مَا لَكُمْ ۫— كَیْفَ تَحْكُمُوْنَ ۟ۚ

३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात? info
التفاسير:

external-link copy
37 : 68

اَمْ لَكُمْ كِتٰبٌ فِیْهِ تَدْرُسُوْنَ ۟ۙ

३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता? info
التفاسير:

external-link copy
38 : 68

اِنَّ لَكُمْ فِیْهِ لَمَا تَخَیَّرُوْنَ ۟ۚ

३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत? info
التفاسير:

external-link copy
39 : 68

اَمْ لَكُمْ اَیْمَانٌ عَلَیْنَا بَالِغَةٌ اِلٰی یَوْمِ الْقِیٰمَةِ ۙ— اِنَّ لَكُمْ لَمَا تَحْكُمُوْنَ ۟ۚ

३९. किंवा आमच्याकडून तुम्ही काही अशा शपथा घेतल्या आहेत, ज्या कयामत पर्यंत बाकी राहतील, की तुमच्यासाठी ते सर्व आहे, जे तुम्ही आपल्यातर्फे निर्धारित करून घ्यावे? info
التفاسير:

external-link copy
40 : 68

سَلْهُمْ اَیُّهُمْ بِذٰلِكَ زَعِیْمٌ ۟ۚۛ

४०. त्यांना विचारा की त्यांच्यापैकी कोण या गोष्टीस जबाबदार (आणि दावेदार आहे? info
التفاسير:

external-link copy
41 : 68

اَمْ لَهُمْ شُرَكَآءُ ۛۚ— فَلْیَاْتُوْا بِشُرَكَآىِٕهِمْ اِنْ كَانُوْا صٰدِقِیْنَ ۟

४१. काय त्यांचे काही भागीदार आहेत? (असे असेल) तर त्यांनी आपल्या आपल्या भागीदारांना घेऊन यावे, जर ते सच्चे आहेत. info
التفاسير:

external-link copy
42 : 68

یَوْمَ یُكْشَفُ عَنْ سَاقٍ وَّیُدْعَوْنَ اِلَی السُّجُوْدِ فَلَا یَسْتَطِیْعُوْنَ ۟ۙ

४२. ज्या दिवशी पोटरी उघड केली जाईल, आणि सजदा करण्यासाठी त्यांना बोलाविले जाईल (परंतु ते सजदा) करू शकणार नाहीत.१ info
التفاسير:

external-link copy
43 : 68

خَاشِعَةً اَبْصَارُهُمْ تَرْهَقُهُمْ ذِلَّةٌ ؕ— وَقَدْ كَانُوْا یُدْعَوْنَ اِلَی السُّجُوْدِ وَهُمْ سٰلِمُوْنَ ۟

४३. त्यांचे डोळे (नजरा) १ झुकलेले असतील, आणि त्यांच्यावर अपमान आच्छादित होत असेल, वस्तुतः यांना सजदा करण्याकरिता (त्या वेळीही) बोलाविले जात होते, जेव्हा ते धडधाकट होते. info

(१) काहींनी पोटरी उघडण्याचा अर्थ कयामतची भयानकता असा घेतला आहे. परंतु एका सहीह हदीसमध्ये याचे भाष्य अशा प्रकारे केले गेले आहे की कयामतच्या दिवशी अल्लाह आपली पोटरी उघडी करील (जसे त्याच्या शान-प्रतिष्ठेस योग्य आहे) तेव्हा प्रत्येक ईमानधारक पुरुष आणि स्त्री त्याच्या पुढे सजद्यात पडतील. परंतु ते लोक बाकी राहतील, जे लोकांना दाखविण्यासाठी आणि नावाला सजदे करीत असत. ते सजदा करू इच्छितील, परंतु त्यांचा पाठीचा कणा लाकडी तक्त्यासारखा होईल, ज्यामुळे सजद्यासाठी झुकणे त्यांना अशक्य होईल. (सहीह बुखआरी, तफसीर सूरह नून वल कलम) अल्लाह ही पोटरी कशी उघडेल आणि ती कशी असेल? हे तर आम्ही जाणू शकत नाही, ना त्याचे वर्णन करू शकतो, यास्तव ज्याप्रमाणे कसल्याही उपमेविना आम्ही त्याचे कान, डोळे आणि हात वगैरे वर विश्वास राखतो, तद्‌वतच पोटरीची बाबही कुरआन व हदीसमध्ये उल्लेखित आहे, ज्यावर कसलेही भाष्य न करता विश्वास राखणे आवश्यक आहे. हेच सलफ आणि हदीसच्या विद्वानांचे मत आहे.

التفاسير:

external-link copy
44 : 68

فَذَرْنِیْ وَمَنْ یُّكَذِّبُ بِهٰذَا الْحَدِیْثِ ؕ— سَنَسْتَدْرِجُهُمْ مِّنْ حَیْثُ لَا یَعْلَمُوْنَ ۟ۙ

४४. तेव्हा मला आणि या गोष्टीस खोटे ठरविणाऱ्यांना सोडून द्या. आम्ही त्यांना अशा प्रकारे हळू हळू खेचून घेऊ की त्यांना खबरही नसेल. info
التفاسير:

external-link copy
45 : 68

وَاُمْلِیْ لَهُمْ ؕ— اِنَّ كَیْدِیْ مَتِیْنٌ ۟

४५. आणि मी त्यांना ढील देईन (सैल सोडेन), निःसंशय, माझी उपाययोजना मोठी मजबूत आहे. info
التفاسير:

external-link copy
46 : 68

اَمْ تَسْـَٔلُهُمْ اَجْرًا فَهُمْ مِّنْ مَّغْرَمٍ مُّثْقَلُوْنَ ۟ۚ

४६. काय तुम्ही त्यांच्याकडून एखादे पारिश्रमिक इच्छिता, ज्याच्या ओझ्याने हे दबले जात असावेत? info
التفاسير:

external-link copy
47 : 68

اَمْ عِنْدَهُمُ الْغَیْبُ فَهُمْ یَكْتُبُوْنَ ۟

४७. किंवा काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे, ज्यास हे लिहीत असावेत? info
التفاسير:

external-link copy
48 : 68

فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تَكُنْ كَصَاحِبِ الْحُوْتِ ۘ— اِذْ نَادٰی وَهُوَ مَكْظُوْمٌ ۟ؕ

४८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाची धैर्यपूर्वक प्रतीक्षा करा आणि मासेवाल्यासारखे होऊ नका, जेव्हा त्याने दुःखाच्या अवस्थेत (आपल्या पालनकर्त्यास) पुकारले. info
التفاسير:

external-link copy
49 : 68

لَوْلَاۤ اَنْ تَدٰرَكَهٗ نِعْمَةٌ مِّنْ رَّبِّهٖ لَنُبِذَ بِالْعَرَآءِ وَهُوَ مَذْمُوْمٌ ۟

४९. जर त्यास त्याच्या पालनकर्त्या (अल्लाह) च्या कृपेने प्राप्त करून घेतले नसते, तर निःसंशय, तो वाईट अवस्थेत उघड्या जमिनीवर टाकला गेला असता. info
التفاسير:

external-link copy
50 : 68

فَاجْتَبٰىهُ رَبُّهٗ فَجَعَلَهٗ مِنَ الصّٰلِحِیْنَ ۟

५०. मग त्याला त्याच्या पालनकर्त्याने निवडले आणि त्याला नेक सदाचारी लोकांमध्ये सामील केले. info
التفاسير:

external-link copy
51 : 68

وَاِنْ یَّكَادُ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَیُزْلِقُوْنَكَ بِاَبْصَارِهِمْ لَمَّا سَمِعُوا الذِّكْرَ وَیَقُوْلُوْنَ اِنَّهٗ لَمَجْنُوْنٌ ۟ۘ

५१. आणि निकट आहे की (या) काफिरांनी आपल्या (तीक्ष्ण) नजरेने तुम्हाला घसरून टाकले.१ हे जेव्हा जेव्हा कुरआन ऐकतात आणि म्हणतात की हा तर खात्रीने वेडा आहे! info

(१) जर तुम्हाला अल्लाहची मदत आणि संरक्षण लाभले नसते तर या काफिर लोकांच्या मत्सरपूर्ण नजरेला तुम्ही वाईटरित्या बळी पडला असता अर्थात त्यांची वाईट नजर तुम्हाला लागली असती. इमाम इब्ने कसीर यांनी याचा हाच अर्थ सांगितला आहे. पुढे ते लिहितात की हे या गोष्टीचे प्रमाण आहे की दृष्ट लागणे आणि अल्लाहच्या अनुमतीने त्याचा दुसऱ्यांवर वाईट प्रभाव पडणे सत्य आहे. जसे की अनेक हदीस वचनांनी हे सिद्ध आहे आणि हदीस वचनांमध्ये त्यापासून सुरक्षित राहण्याकरिता दुआ (प्रार्थना) सांगितल्या आहेत आणि हेही सांगितले आहे की तुम्हाला जर एखादी वस्तू चांगली वाटली तर ‘माशा अल्लाह’ किंवा ‘बारकल्लाह’ म्हणत जा, यासाठी की त्यास दृष्ट न लागावी. तसेच जर कोणाला दृष्टी लागली जर फर्माविले की त्याला आंघोळ घालून त्याचे पाणी त्यावर टाकले जावे, ज्याची दृष्ट त्याला लागली आहे. (विवरणाकरिता पाहा तफसीर इब्ने कसीर आणि हदीसचे ग्रंथ) काहींनी याचा अर्थ असा केला आहे की यांनी तुम्हाला धर्माचा प्रचार करण्यापासून परावृत्त केले असते.

التفاسير:

external-link copy
52 : 68

وَمَا هُوَ اِلَّا ذِكْرٌ لِّلْعٰلَمِیْنَ ۟۠

५२. आणि वास्तविक हा (कुरआन) तर समस्त जगातील लोकांकरिता पूर्ण बोध-उपदेश आहे. info
التفاسير: